Maharashtra Corona Update | राज्यात 4,787 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 74 हजार 761 वर

राज्यात आज दिवसभरात 1 हजार 951 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Maharashtra Corona Update | राज्यात 4,787 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 74 हजार 761 वर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज (Maharashtra Corona Total Cases) 5 हजारच्या वर नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, आज (30 जून) राज्यात दिवसभरात 4 हजार 787 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. ही संख्याही कमी नाही. मात्र, रोजच्या तुलनेत ती कमी असल्याने प्रशासनाला आणि नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आजची आकडेवारी मिळून सध्या राज्यात कोरोनाचे 1 लाख 74 हजार 761 रुग्ण आहेत (Maharashtra Corona Total Cases).

दिवसभरात 1 हजार 951 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज दिवसभरात 1 हजार 951 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 90 हजार 911 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 52.02 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 75 हजार 979 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे 7,855 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 245 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 95 रुग्णांचा मृत्यू गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर 4.49 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 7 हजार 855 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Maharashtra Corona Latest Update).

मुंबईत दिवसभरात 893 नवे रुग्ण

मुंबईत आज दिवसभरात 893 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 77 हजार 658 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 36 जणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 4 हजार 556 इतकी झाली आहे. मृतांमध्ये ठाणे, औरंगाबाद, पुण्यातून मुंबईत दाखल झालेल्यांचाही समावेश आहे.

5 लाख 78 हजार 033 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात 5 लाख 78 हजार 033 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 38 हजार 866 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई79145447914631
पुणे (शहर+ग्रामीण)2331711545783
ठाणे (शहर+ग्रामीण)39316156211019
पालघर 60642654111
रायगड45632186102
नाशिक (शहर +ग्रामीण)43762322222
अहमदनगर (शहर+ग्रामीण)43227614
धुळे109659456
जळगाव 35072006245
नंदूरबार 178727
सोलापूर26521563268
सातारा111773043
कोल्हापूर 85871711
सांगली39622811
सिंधुदुर्ग2211545
रत्नागिरी61444527
औरंगाबाद56512460256
जालना58334417
हिंगोली 27024113
परभणी105764
लातूर 35019519
उस्मानाबाद 22317112
बीड118953
नांदेड 36423414
अकोला 1544107978
अमरावती 57841928
यवतमाळ 29620910
बुलडाणा 25115212
वाशिम 106743
नागपूर1506119815
वर्धा 19121
भंडारा87750
गोंदिया 1311021
चंद्रपूर95560
गडचिरोली66581
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)94023
एकूण180298931548053

Maharashtra Corona Total Cases

संबंधित बातम्या :

Pandharpur Corona | आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात सात नवे रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

Virar Corona : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, अर्नाळ्यात कडक निर्बंध

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *