SSC-HSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये घेण्याचा विचार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

SSC-HSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये घेण्याचा विचार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. सरकार कोरोना साथीरोगाचा विचार करता फेब्रुवारीत होणाऱ्या 12 वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी हा विचार केला जात असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं (Maharashtra  Education Minister Varsha Gaikwad on SSC HSC Exam in April and May 2021).

वर्षा गायकवाड म्हणाल्या, “सर्वसाधारणपणे दहावीची परीक्षा मार्चमध्ये असते आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात असते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाची परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील शाळा देखील सुरु होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरील विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर आणणं आणि 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यावर विचार सुरु आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा हाच यामागे उद्देश आहे. त्यामुळेच आपण बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत आहोत.”

दरम्यान, याआधी राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. (SSC HSC ATKT Exam Postpone ) दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.

या परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जातोय. मात्र कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

संबंधित बातम्या :

दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा

CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

संबंधित व्हिडीओ पाहा : 

Maharashtra  Education Minister Varsha Gaikwad on SSC HSC Exam in April and May 2021

Published On - 8:16 pm, Sun, 29 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI