पूरग्रस्त भागात आरोग्य समस्यांची भीती, 496 गावात आरोग्य कॅम्प सुरु, औषधांसाठी जिल्ह्याकडून निधीही सुपूर्द – आरोग्यमंत्री

496 गावांत आरोग्य कॅम्प सुरु केले आहेत. तिथे आरोग्य सेवेचं पथकही दिलं आहे. लहान गावांसाठी 1 डॉक्टर, 1 नर्स, तर मोठ्या गावांसाठी 2 डॉक्टर आणि 4 आरोग्य कर्मचारी दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पूरग्रस्त भागात आरोग्य समस्यांची भीती, 496 गावात आरोग्य कॅम्प सुरु, औषधांसाठी जिल्ह्याकडून निधीही सुपूर्द - आरोग्यमंत्री
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 1:58 PM

मुंबई : राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये पुराने हाहा:कार माजवला होता. आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तर पूरग्रस्त भागात साथीचे आजार आणि आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. पूरग्रस्त जिल्ह्यात एक आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडला आहे. तो कक्ष आरोग्य विभागाशी समन्वय राखत आहे. 496 गावांत आरोग्य कॅम्प सुरु केले आहेत. तिथे आरोग्य सेवेचं पथकही दिलं आहे. लहान गावांसाठी 1 डॉक्टर, 1 नर्स, तर मोठ्या गावांसाठी 2 डॉक्टर आणि 4 आरोग्य कर्मचारी दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Fear of epidemic in flood-hit areas, health system deployed)

पुराचा विळखा पडलेल्या गावात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे किटकनाशक आणि जंतूनाशक फवारणी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. औषधांसाठी तातडीचा निधी या जिल्ह्यांना दिला आहे. या ठिकाणी लसीकरणाच्या कामावर जास्त भर द्यावा लागणार आहे. हे सगळी जिल्हे कोरोनाग्रस्त आहेत. राज्याच्या पॉझिटिव्हीटी दरापेक्षा या जिल्ह्याचा दर जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या सगळ्या उपाययोजना सुरु ठेवण्यात आल्या आहेत. काल 3.5 लाख लसीचे डोस दिले आहेत. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. मागणी मोठी आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं टोपे म्हणाले.

लॉकडाऊनमधील शिथिलतेबाबत विचार सुरु

केंद्राने जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करावा. मी त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहे. लॉकडाऊन शिथिलता देण्याच्या मागण्याही येत आहे. ज्या जिल्ह्याचा कोरोना वाढीचा दर नगण्य असेल त्या जिल्ह्यात काही शिथिलता देता येईल का याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा केली आहे. त्याबाबत आरोग्य सचिवांवर जबाबदारी देण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. आमचा जो प्लॅन आहे तो मुख्यमंत्र्यांना पाठवू. मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतील. याबाबत ICMR ने काहीही म्हटलेलं नाही. डेल्टासाठी लस परिणामकारक नाही असं ICMR ने अद्याप सांगितलं नाही. डेल्टा व्हेरिएंट वाढलेला नाही, असंही टोपे यांनी आवर्जुन सांगितलं.

मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी त्यामुळे चिखल आणि घाणीचं साम्राज्य प्रत्येक शहर, गावात पाहायला मिळत आहे. त्यामुळे या महापुरानंतर आता रोगराई वाढण्याची भीती आहे. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar : महाराष्ट्राला महापुराचा तडाखा; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Fear of epidemic in flood-hit areas, health system deployed

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.