महाराष्ट्रातील 50 वाघ इतरत्र हलवणार, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनखात्याकडून लवकरच निर्णय

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी याबाबतचा निर्णय वनखाते घेण्याच्या तयारीत आहे. (Maharashtra Tiger shifted elsewhere)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:23 PM, 23 May 2020
महाराष्ट्रातील 50 वाघ इतरत्र हलवणार, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनखात्याकडून लवकरच निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील 50 वाघ राज्यात इतरत्र हलवण्यात येणार  (Maharashtra Tiger shifted elsewhere)  आहेत. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी याबाबतचा निर्णय वनखाते घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या (Maharashtra Tiger shifted elsewhere) या महामारीनंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना वाघांबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 50 वाघ इतरत्र हलवण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनखात्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 160 वाघ आहेत. तर चंद्रपूर शहराच्या हद्दीत 12 वाघ आहेत. येत्या काळातील धोका टाळण्यासाठी वाघांना राज्यात हलवण्यात येणार आहे. लवकरच यासंदर्भात कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी (Maharashtra Tiger shifted elsewhere) दिली.

संबंधित बातम्या : 

भारतातही वाघाची कोरोना चाचणी; वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची महाराष्ट्रात टेस्ट