AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? छगन भुजबळांनी दिली मोठी अपडेट

महाराष्ट्रात इंधनटंचाईच्या अफवा असल्या तरी, मंत्री छगन भुजबळ यांनी पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. अनावश्यक खरेदीमुळे मे महिन्यात इंधन विक्री 20 % वाढली. नागरिकांनी घाबरून साठा करू नये; सरकार इंधन पुरवण्यास सक्षम आहे. संयम राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन भुजबळांनी केले.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? छगन भुजबळांनी दिली मोठी अपडेट
छगन भुजबळ
| Updated on: May 22, 2026 | 1:11 PM
Share

आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात तसेच महाराष्ट्रात राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून लोकंही चिंतेत आहे. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

” राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये”, असं माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले. ” गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली ” अशी माहिती त्यांनी दिली.

अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही

“देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पेट्रोल डिझेल बाबत प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शेतीसाठी डिझेलचा वापर होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल देण्याचे आदेशच दिले असून तसं प्लानिंग करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे, असं सांगतानाच कुणीही पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करू नका. आवश्यकतेनुसार डिझेल देण्याचे नियोजन केले गेले आहे. सर्वदूर तणावाची परिस्थिती नाही. एखादी घटना घडते ती हायलाईट होते. आपण 660 बिलियन डॉलर्समध्ये आहोत. सिंगापूर आणि दुबईच्या अर्थव्यवस्थेला आपण काही वर्षात मागे टाकू शकतो, अशी स्थिती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ