AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ‘या’ लोकांना मेट्रोतून 25 टक्के सवलतीत प्रवास करता येणार; राज्य सरकारची मोठी घोषणा..महाराष्ट्र दिनापासून सुरुवात

मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांना सरकारने गुड न्यूज दिली आहे.

आता 'या' लोकांना मेट्रोतून 25 टक्के सवलतीत प्रवास करता येणार; राज्य सरकारची मोठी घोषणा..महाराष्ट्र दिनापासून सुरुवात
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 29, 2023 | 4:05 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांना आता मुंबई मेट्रोमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. येत्या एक मे पासून म्हणजेच महाराष्ट्र (1 st May) दिनापासून त्यांना 25 टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज (good news) आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे राज्यातील जनतेला ही महाराष्ट्र दिनाची ठरणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई वन पासावर ही सवलत मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांसदर्भात सांगितले. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्याची तसेच राज्यातील महिलांनाही एसटी बसेसमधून 50 टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कोणाला सवलत मिळेल?

– ही सुविधा 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे.

– या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

– दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन कार्ड (विद्यार्थी किंवा पालकांचे पॅन कार्ड) सोबत शाळेचे ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

कुठे मिळणार सवलत ?

– या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील.

– नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील.

मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.