AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार? गृहखात्याऐवजी ‘ही’ दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा झाली. यावेळी कोण-कोणती मंत्रिपदे दिली जाणार, याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच गृहमंत्रिपदाचे काय करायचे यावरही चर्चा झाली.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार? गृहखात्याऐवजी 'ही' दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता
Devendra Fadnavis Eknath ShindeImage Credit source: ANI
Updated on: Dec 04, 2024 | 8:35 AM
Share

Maharashtra Government formation : महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरु असताना दुसरीकडे सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला. तर भाजपकडून गृहमंत्रिपदाचा दावा सोडणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यातच काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत गृहमंत्रिपदावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शिंदेंना गृहखात्याऐवजी नगरविकास आणि एक महत्त्वाचे खाते दिले जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा झाली. यावेळी कोण-कोणती मंत्रिपदे दिली जाणार, याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच गृहमंत्रिपदाचे काय करायचे यावरही चर्चा झाली. यानंतर भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. शिंदेंनी ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदेंना गृहखात्याऐवजी नगरविकास आणि एक महत्त्वाचे खातं देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.

काल नेमंक काय काय घडलं?

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते गेल्या काही दिवसांपासून आराम करत होते. यानंतर काल ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदेंच्या काही चाचण्या करण्यात आल्या. यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. यानंतर ते थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदेंनी बैठकांचा सपाटा सुरु केला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यानंतर भाजप नेते गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले.

गिरीश महाजनांनी एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना कळवला. गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर थेट देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यानंतर अवघ्या १५ मिनिटात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्याबाहेर आले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप सत्तास्थापनेचा पेच सुटला की नाही, याची माहिती समोर आलेली नाही.

महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी.
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक.