Nanded Gram Panchayat Election Results 2021: … म्हणून ‘या’ गावात निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

Nanded Gram Panchayat Election Results 2021: ... म्हणून 'या' गावात निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर मुतण्याळ गाव आता रिकामे झाले आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: बिलोली तालुक्यातील मुतण्याळ या गावात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी वादावादी झाली. त्यानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाली.

Rohit Dhamnaskar

|

Jan 18, 2021 | 8:37 AM

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल (Gram Panchayat Election Results) सोमवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या नांदेडमधील एक गाव चांगलेच चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मुतण्याळ या गावातील प्रतिस्पर्धी गटांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकाल पाहायला या गावात कोणीही उरलेले नाही. (Major fighting between villagers in Nanded over Gram Panchyat Election results 2021)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर मुतण्याळ गाव आता रिकामे झाले आहे. हाणामारी करणाऱ्या 38 जणांना पोलिसांनी अटक केली. तर अटकेच्या भीतीने काही लोक गावातून पसार झाले आहेत.

बिलोली तालुक्यातील मुतण्याळ या गावात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी वादावादी झाली. त्यानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाली. या हाणामारीत अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. सध्या पोलिसांनी या गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पोलिसांकडून या हाणामारीत सहभागी असलेल्या आरोपांची कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सध्या बिलोली तालुक्यात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात आणखीनच वाढ केली आहे.

राज्यातील 12,711 ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी

राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी शुक्र वारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी होणार असून, एकूण 2 लाख, 14हजार उमेदवारांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण 14,234ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर कि वा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात.

तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

https://www.tv9marathi.com/ वर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला निकाल पाहता येईल. मराठीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीची अपडेट सकाळपासूनच दाखवली जाईल. वेबसाईटच्या फ्रंट पेजवरच महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचा विशेष लाईव्ह ब्लॉग सुरु असेल. टीव्ही 9 मराठीला तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर आणखी चांगल्या पद्धतीने अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | ग्रामपंचायत निवडणूक 2021 निकाल लाईव्ह

🛑निकाल पाहण्यासाठी काय कराल?🛑

💠सर्वात अगोदर https://www.tv9marathi.com या वेबसाईटर जा.

💠त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या. याची आकडेवारी पाहता येईल.

💠भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर असे पाच रकाने तुम्हाला दिसतील. या रकान्यात तुम्हाला याची सर्व अपडेट मिळेल.

🛑घरबसल्या फोनवर संपूर्ण निकाल पाहा🛑

प्रत्येकाला दिवसभर टीव्हीसमोर बसणं शक्य होत नाही. त्यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल हे निकाल पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. टीव्ही 9 मराठीवर सकाळी 6 वाजल्यापासून निकालाचं लाईव्ह प्रक्षेपण असेल. http://tv9marathi.com/live-tv या लिंकवर चॅनलही तुम्ही पाहू शकता. शिवाय आमच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह प्रक्षेपण असेल.

संबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

(Major fighting between villagers in Nanded over Gram Panchyat Election results 2021)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें