AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election Results 2021: पश्चिम महाराष्ट्रात कुणाचं वर्चस्व?, भाजप मोठा, की आघाडीचे प्राबल्य?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: पश्चिम महाराष्ट्रात एकूण 2870 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काही ग्रामपंचायतींवर भाजपने बाजी मारली तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला.

Gram Panchayat Election Results 2021:  पश्चिम महाराष्ट्रात कुणाचं वर्चस्व?, भाजप मोठा, की आघाडीचे प्राबल्य?
| Updated on: Jan 18, 2021 | 4:59 PM
Share

मुंबई : मतदान प्रकिया पार पडल्यानंतर ग्रामपंचायतींवर कोणाचं वर्चस्व असेल याची गणितं दोन दिवसांपासून बांधली जात होती. त्यानंर आता अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 2870 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काही ग्रामपंचायतींवर भाजपने बाजी मारली तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला. काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्वतंत्ररित्या लढणं पसंत केलं. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींवर कोणत्याही एका पक्षाचे प्राबल्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (West maharashtra Gram Panchayat election result)

पुणे 

पुण्यात  एकूण 748  ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायतींमध्ये 11007 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील हवेली तालूक्यातील सर्व 54 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत.

हवेली तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. तर 54 पैकी 30 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. तर 3 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. या सर्व निकालांवरुन हवेली तालुक्यात ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचेच वचर्स्व राहील्याचे आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन दिसत आहे.

शिरूर तालुक्यात आमदार अशोक पवार धक्का

शिरुर तालुक्यात आमदार अशोप पवारांना स्वत:च्याच गावात धक्का बसला आहे. त्यांच्या रासई गावात राष्ट्रवादी काँग्रेसला 15 पैकी फक्त 03 जागा मिळाल्या तर स्थानिक जनसंघर्ष पॅनलने 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला.

सोलापूर 

सोलापुरात एकूण 658 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी 67 ग्रामपंचाय निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. 16 जानेवारी रोजी येथे एकूण 588 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. येथे एकूण 12225 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम कायम राहिली. येथे 17 जागांपैकी 13 जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटाचे वर्चस्व कायम राहिले. या निवडणुकीत जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील विरूध्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी लढत झाली होती. या लढतीत 16 जागांपैकी 14 जागा विजयसिंह मोहिते गटाने जिंकल्या आहेत. तर 3 जागा धवलसिंह मोहिते पाटील गटाने जिकंल्या आहेत. दरम्यान येथील अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील यांचे म्हणजेच भाजपचे वर्चर्स्व कायम राहिले.

सांगली

सांगली जिल्ह्यात एकूण 152 जागांवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यापैकी आतापर्यंत 84 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 37 ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा विजय झाला. तर राष्ट्रवादीप्रणित 13 पॅनलने ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेने एकूण 19 ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने सांगली जिल्ह्यात फक्त 7 जगा जिंकल्या आहेत.सातारा

सातारा

सातारा जिल्ह्यात एकूण 879 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्या होत्या. तर 221 ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडणुका झाल्या. एकूण 7266 जागांसाठी मतदान झाले होते.

महाबळेश्वर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. 6 ग्रामपंचायतींपैकी येथे 4 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर 2 ग्रामपंचायतीं राष्ट्रवादीने खिशात घातल्या आहेत. तर शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेलार यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले.

संबंधित बातम्या :

निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 | ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांची धडक, पालोद ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा झेंडा

(West maharashtra Gram Panchayat election result)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.