IAS Transfer | तुकाराम मुंढे यांची बदली, नागपूर महापालिका आयुक्तपदी कोण?

IAS Transfer | तुकाराम मुंढे यांची बदली, नागपूर महापालिका आयुक्तपदी कोण?

राधाकृष्णन बी. हे आता नागपूरचे नवीन मनपा आयुक्त असतील

अनिश बेंद्रे

|

Aug 26, 2020 | 6:45 PM

मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सचिव म्हणून बदली झाली. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन मनपा आयुक्त असतील. (Maharashtra IAS Officers Transfer including Tukaram Mundhe)

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदली

1) ए. बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे करण्यात आली आहे.

2) लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे करण्यात आली आहे.

3) अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे.

4) दीपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.

5) एस. एम देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव (प्र.सु. व र.व का.) या पदावर केली आहे.

6) नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली. राधाकृष्णन बी. नागपूरचे नवीन मनपा आयुक्त.

गेल्याच आठवड्यात चार आयएएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्स्फर करण्यात आल्या होत्या. तर त्याआधी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली होती. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव – ट्रान्सफर मंत्रालय” अशी टीका केली होती. (Maharashtra IAS Officers Transfer including Tukaram Mundhe)

संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटलांकडून सकाळी ‘ट्रान्सफर मंत्रालय’ खिल्ली, दुपारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली

मिलिंद म्हैसकर यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली

पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी

(Maharashtra IAS Officers Transfer including Tukaram Mundhe)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें