Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 24, 2022 | 7:20 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज बुधवार, 23 नोव्हेंबर, 2022. वरळीचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर असणार आहेत. ते बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. बिहारमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आदित्य ठाकरे यांचा हा बिहार दौरा आणि तेजस्वी यांच्यासोबत होणारी भेट महत्त्वाची मानली जातेय. या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलंय. या सोबतच सिनेटची निवडणूक, ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यातील संघर्ष या घडामोडींवरही आपली नजर असेल. मुंबईसह राज्यात गोवरच्या साथीने डोकं वर काढलंय. त्याचेही अपडेट जाणून घेणार आहोत. तर राज्यातील कोणत्या भागात नेमकी किती थंडी आहे, याचा देखील आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. शिवाय श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आज नेमकी काय माहिती समोर येते, यावरही आपली नजर असेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Nov 2022 08:19 PM (IST)

    Crypto करन्सीतील गुंतवणूक ठरु शकते डोकेदुखी

    Marathi News LIVE Update Crypto करन्सीतील गुंतवणूक ठरु शकते डोकेदुखी

    FTX प्रकरणामुळे गुंतवणूकदार हादरले

    आज क्रिप्टो मार्केटमध्ये 4 टक्क्यांची तेजी

    क्रिप्टो करन्सी व्यवहारांवर केंद्र सरकारचेही लक्ष

  • 23 Nov 2022 08:02 PM (IST)

    केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे 25 तारखेला पुणे दौऱ्यावर

    केंद्रीय विमान व नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे 25 तारखेला पुणे दौऱ्यावर

    पुणे विमानतळाच्या वाहन पार्किंगचं होणार उद्घाटन

    खासदार गिरीश बापट यांच्या प्रयत्नातून उभं राहतंय मल्टीलेवल पार्किंग

    संध्याकाळी 6 वाजता होणार उद्घाटन

    पुण्यात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण

  • 23 Nov 2022 06:49 PM (IST)

    मदत अपुरी, तुपकर आंदोलनावर ठाम

    Marathi News LIVE Update

    मदत अपुरी, तुपकर आंदोलनावर ठाम

    शेतकऱ्यांना 157 कोटींच्या मदतीची घोषणा

    बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा

    मदत अपुरी असल्याचा रवीकांत तुपकर यांचा दावा

    अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यावर ठाम

  • 23 Nov 2022 06:46 PM (IST)

    स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचा बिगूल

    Marathi News LIVE Update

    स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचा बिगूल

    हिवाळी अधिवेशनात विदर्भवादी आक्रमक

    हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करणार आंदोलन

    19 डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन

    अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा नारा गुंजणार

  • 23 Nov 2022 05:45 PM (IST)

    राज्य सरकार 40 आमदारांचा हट्ट पुरविण्यात व्यस्त

    Marathi News LIVE Update राज्य सरकार 40 आमदारांचा हट्ट पुरविण्यात व्यस्त

    रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

    सरकारला राज्यातील इतर प्रश्नांची काळजी नाही

    राज्यपालांच्या मुद्यावर ही राज्य सरकारला सुनावले

  • 23 Nov 2022 05:28 PM (IST)

    बाल आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य

    Marathi News LIVE Update बाल आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य

    भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ट्विट करत दिली माहिती

    5 -15 वर्षांच्या मुलांच्या बाल आधार कार्डमध्ये बायोमॅट्रिक अपडेट आवश्यक

    जवळच्या आधार कार्ड केंद्रावर ही सेवा उपलब्ध

    या सेवेसाठी प्राधिकरणाने कोणतेही शुल्क आकारणार नाही

  • 23 Nov 2022 04:54 PM (IST)

    सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ

    Marathi News LIVE Update

    सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ

    सोन्याचे भाव 56,000 हजारांवर पोहचण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

    सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम 52,731 रुपयांवर पोहचला

    तर चांदीने 856 रुपयांची उसळी घेतली

    चांदीचा भाव आज 61,518 प्रति किलोग्रॅम झाला

  • 23 Nov 2022 01:53 PM (IST)

    भुसावळमध्ये मण्णपुरम गोल्ड फायनान्समधून कोट्यवधी रुपयांचे सुमारे दोन किलो सोने लंपास झाल्याची घटना उघड

    घटनेनंतर मण्णपुरम गोल्ड फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक फरार असल्याने पोलिसांचा व्यवस्थापकावर संशय

    कंपनीच्या ऑडिटमध्ये उघड झाला प्रकार

    संशयित व्यवस्थापक विशाल रॉय याच्या शोधासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशकडे रवाना

  • 23 Nov 2022 01:47 PM (IST)

    2020 ला श्रद्धा वालकरने तिच्या जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्र पोलिसांना लिहिलं होतं

    ते पत्र माझ्याकडे पण आलंय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    अत्यंत गंभीर पत्र होतं. पण त्याच्यावर कारवाई का झाली नाही? याची माहिती नाही.

    याची चौकशी व्हायला हवी. अशाप्रकाकच्या पत्रावर कारवाई का होत नाही?

    त्या पत्रावर कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता

  • 23 Nov 2022 01:20 PM (IST)

    पुण्यात मावळ येथे अपघात

    मावळातील एकविरा गडावरून उतरताना कार झाली पलटी,

    सहा जण जखमी मात्र जीवित हानी नाही

    मावळातील कार्ला एकविरा देवीच्या गडावरुन दर्शन घेऊन खाली उतरताना अपघात

    चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक कार पलटी झाल्याने यात सहा भाविक जखमी झाले आहेत

  • 23 Nov 2022 12:54 PM (IST)

    बुलढाणा- रविकांत तुपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

    रविकांत तुपकर यांनी शेतकरी आंदोलकांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय

    मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून नोटीस

    आंदोलन केल्यास 149 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटीस

  • 23 Nov 2022 12:24 PM (IST)

    कराडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्यासह 10 आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

    यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिवशी कराडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश कार्यक्रम

    राजेंद्रसिंह यादव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड पालिकेतील यशवंत जनशक्ती आघाडीचे सदस्य

    शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी नगरसेवकांची बैठक सुरु

    बैठकीनंतर नेमके कितीजण प्रवेश करणार हे होणार स्पष्ट

  • 23 Nov 2022 12:04 PM (IST)

    उरण बेलापूर रोडवर कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी

    नवी मुंबई : उरण बेलापूर रोडवर कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेरन उलटला

  • 23 Nov 2022 12:03 PM (IST)

    अंत्यविधीचा कार्यक्रम उलटून परतणाऱ्यांच्या टेम्पोचा अपघात

    नांदेड : अंत्यविधीचा कार्यक्रम उलटून परतणाऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, 12 जण जखमी, हिमायतनगर शहराजवळील घटना, 5 जणांची प्रकृती गंभीर

  • 23 Nov 2022 10:35 AM (IST)

    दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा

    दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा, दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, सीबीआय अहवालातून मोठी माहिती समोर

  • 23 Nov 2022 10:32 AM (IST)

    नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची जोरात तयारी

    मंत्र्यांसाठी यंदा नवीन गाद्या आणि चादरी

    रवी भवनमधील बंगल्यातील सर्व चादरी, गाद्या बदलणार

    रवीभवन परिसरासाठी 15 ते 16 कोटी खर्च होणार

    रवी भवन परिसरातील काही फर्निचरही बदलणार

  • 23 Nov 2022 09:44 AM (IST)

    मुंबई - बेंगलोर महामार्ग, 6 महिन्यात तब्बल 40 कोटींचा दंड!

    मुंबई - बेंगलोर महामार्गावर कात्रज ते नवले पुलापर्यंत वाहतूक चालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचं उल्लघन

    6 महिन्यात तब्बल 40 कोटींचा दंड

    नवले पुलाजवळ उतारावर लावलेल्या कॅमेरातून तब्बल 1 लाख 95 हजार वाहनांवर कारावाई

    एवढी मोठी कारवाई केल्यानंतरही वाहनाकडून सर्रास वेगाच उल्लघन

    60 kmpl वेगाची मर्यादा असतानाही वाहने वेगात, अपघातांना वाहन चालकही तितकेच जबाबदार

  • 23 Nov 2022 09:38 AM (IST)

    रोहित पवारांना धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    नगरमध्ये जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे 200 कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

    भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

    राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना मोठा धक्का

    राजुरी गावचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी सरपंच सुभाष काळदाते यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

    जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जीवस्ती, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

  • 23 Nov 2022 09:13 AM (IST)

    गडचिरोली गडचिरोलीच्या मुख्य चौकात आंदोलन

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शने करीत आंदोलन

    काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने वेगवेगळ्या वेळेत तीव्र आंदोलन करुन नारेबाजी

    भाजप पक्षाच्या विरोधातही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी नारेबाजी केली

  • 23 Nov 2022 08:34 AM (IST)

    खारकोपर-उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत

    नवी मुंबई : नेरुळ-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती, प्रवाशांना नव्या वर्षांत दिलासा मिळणार, खारकोपर-उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत येणार

  • 23 Nov 2022 08:02 AM (IST)

    आरे कारशेड संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

    मुंबई : आरे कारशेड संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आरे कारशेडच्या कामाला सुरुवात झाल्याने पर्यावरणप्रेमींनी लवकरच सुनावणी घेण्याची केली होती मागणी, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

  • 23 Nov 2022 08:01 AM (IST)

    रुग्णवाहिका आणि टीपरचा अपघात, 2 ठार

    हिंगोली : हिवरा पाटीत रुग्णवाहिका आणि टीपरचा अपघात, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी

  • 23 Nov 2022 07:39 AM (IST)

    पहाटे नाशकात जाणवले भूकंपाचे धक्के

    नाशिक : पहाटे नाशकात जाणवले भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.6 रिश्टर सेक्ल, भल्या पहाटे 4.04 वाजता जाणवले धक्के, भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर खोलवर असल्याची माहिती

  • 23 Nov 2022 07:34 AM (IST)

    नाशिक : मध्यरात्री बिबट्याचा थरार

    नाशिक : मध्यरात्री बिबट्याचा थरार, नाशिक शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या वडाळारोड भागात रात्री बिबट्या आल्यानं नागरिकांची पळापळ, तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश

  • 23 Nov 2022 07:31 AM (IST)

    उद्धव ठाकरे मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

    उद्धव ठाकरे आज मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, लोकसभा मतदारसंघनिहाय परिस्थितीचा घेणार आढावा, दुपारी साडेबारा वाजता बैठक

  • 23 Nov 2022 07:30 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर

    आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची भेट घेण्याची शक्यता, आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्याकडे लक्ष

Published On - Nov 23,2022 7:29 AM

Follow us
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.