AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाची बायको, कुणाची मामी, तर कुणाचा भाचा… लढण्याआधीच जिंकले; कोणत्या नगरपरिषदेत कोण बिनविरोध? वाचा यादी

Maharashtra Elections : आज नगर परिषदा आणि नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. बऱ्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत याबाबत माहिती जाणून घेऊयात.

कुणाची बायको, कुणाची मामी, तर कुणाचा भाचा... लढण्याआधीच जिंकले; कोणत्या नगरपरिषदेत कोण बिनविरोध? वाचा यादी
Victory Celebration
| Updated on: Nov 21, 2025 | 6:05 PM
Share

राज्यातील नगर परिषदा आणि नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. आज अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी लढण्याआधी उमेदवारांची बिनविरोध विजय झाला आहे. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते गुलाल उधळत आनंद साजरा करताना दिसत आहेत. राज्यातील कोणत्या ठिकाणी किती उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रायगडमधील पेण नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध

रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 3 उमेदवार तर राष्ट्रवादी पक्षाचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. 11 अ मालती तुकाराम म्हात्रें (भाजप), प्रभाग क्रमांक 11 (ब)स्मिता दयान पेणकर (भाजप), प्रभाग क्रमांक 12 अभिराज रमेश कडू(भाजप) तर प्रभाग क्रमांक 12 सुशीला हरिच्छंद्र ठाकूर (राष्ट्रवादी अजित पवार),प्रभाग क्रमांक 9 वसुधा तुकाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार), प्रभाग क्रमांक 5 दीपक जयवंत गुरव(राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे.

शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध

शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनिषा शिवाजी गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने छाया पोपट शिंदे विजयी झाल्या आहेत.

परळीत महायुतीचे दोन उमेदवार विजयी

परळी नगर परिषदेत शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदे शिवसेना गटाच्या जयश्री गीते बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

बारामतीत पहिल्यांदाच 8 नगरसेवक बिनविरोध

बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 8 नगरसेवक आज बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. बारामतीतील नटराज कलादालन येथे निवडून आलेल्या नगरसेवकांचे किरण गुजर यांनी स्वागत केलं.

धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिका जिथे नगराध्यक्षसह भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध

धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत इतिहास घडला आहे. येथे नगराध्यक्षसह भाजपच्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

पेण नगरपालिकेत 2 उमेदवार बिनविरोध

रायगड मधील पेण नगरपालिका निवडणूकीत छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 12 ब मधून भाजपचे अभिराज कडू तर 12 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिचंद्र ठाकूर या ही बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

जळगावच्या जामनेर नगरपालिकेत भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध

जळगावच्या जामनेर येथील नगरपालिकेत भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी यापूर्वीच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपच्या सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध झाले होते.

अमरावतीत चिखलदरा नगरपरिषदेत देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध

चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले त्यामुळे कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत.

राजगुरुनगर नगरपरिषदेत शिवसेनेच्या सुप्रिया पिंगळे बिनविरोध

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शिंदे गट असे चारही पक्ष मैदानात आहेत. मात्र शिंदे गटाच्या अतुल देशमुख यांनी मोठा डाव टाकत राजगुरुनगर नगरपरिषदेत सुप्रिया पिंगळे यांना बिनविरोध विजयी केले आहे.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.