Maharashtra: Mumbai Rains LIVE, IMD Updates: अमरावतीत मेळघाटात मुसळधार पाऊस, तापी नदीला मोठा पूर

| Updated on: Aug 10, 2022 | 8:53 PM

Maharashtra Mumbai Rains LIVE Monsoon IMD Updates : हवामान खात्याकडून (IMD Alert) हे पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ही करण्यात आलेले आहे.

Maharashtra: Mumbai Rains LIVE, IMD Updates: अमरावतीत मेळघाटात मुसळधार पाऊस, तापी नदीला मोठा पूर
Maharashtra: Mumbai Rains LIVE, IMD UpdatesImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Maharashtra Rain Update) धुमाकूळ घातलेला आहे. अनेक जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढलेलं (Flood) आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस पडताना दिसत आहे. तर हवामान खात्याकडून (IMD Alert) हे पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ही करण्यात आलेले आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच पिकांची पेरणी झाल्याने त्यातच आता पावसाने कमबॅक केल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. मात्र ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, त्या ठिकाणी पिकं जाण्याची भीतीही शेतकऱ्यांना लागलेली आहे. सुरू असलेल्या पावसाच्या प्रत्येक वेगवान अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Aug 2022 06:36 PM (IST)

    गायिका सुनिधी चव्हाण विरोधात शिवसेनेची पोलिसात तक्रार

    बाॅलिवूडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्हाण विरोधात शिवसेनेच्या शिव वाहतूक संघटनेमार्फत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    पाकिस्तान स्पाॅन्सर्ड कार्यक्रम करत असल्याने केला विरोध

    13 ऑगस्टला शनिवारी होणार आहे लाईव्ह कार्यक्रम

    सुनिधी लाईव्ह हा कार्यक्रम मुंबईत देशात कुठेही होऊ नये यासाठी शिवसेनेचा विरोध

    शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी दिली तक्रार

  • 08 Aug 2022 06:45 PM (IST)

    अमरावतीत मेळघाटात मुसळधार पाऊस, तापी नदीला मोठा पूर

    अमरावती – अमरावतीच्या मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस असून तापी नदीला मोठा पूर आला आहे.   मेळघाटमध्येही पावसाची संततधार कायम आहे.  मेळघाट मधील इतर छोट्या मोठ्या नद्यांनाही मोठा पूर आलेला आहे.
  • 08 Aug 2022 06:09 PM (IST)

    सांगलीत वारणा धरण 83 टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    सांगली -  सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वारणा धरण 83 टक्के भरले असून, धरणाचे चार वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरने उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सांडव्यातून 1300 तर विद्युत निर्मितीतून 1700 असा एकूण तीन हजार कुसेक्स वेगाने पाणी वारणा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • 08 Aug 2022 05:40 PM (IST)

    गडचिरोलीत पावसाची विश्रांती, मात्र नद्यांना पूर, अनेक मार्ग बंद

    गडचिरोली: जिल्ह्यात सकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने काही प्रमाणात  विश्रांती घेतली असली तरी, मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. यात आलापल्ली-भामरागड, आलापल्ली- आष्टी, हरणघाट-चामोर्शी हे मुख्य मार्ग यांच्यासह 5 छोटे मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील इंद्रावती, दिना  आणि पर्लाकोटा या तीन नद्यांना पूर आलेला आहे.
  • 08 Aug 2022 03:12 PM (IST)

    कोल्हापूरचे राधानगरी धरण 87 टक्के भरले

    राधानगरी - राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण 87  टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे साडेसहा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चार ते पाच दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. आज (सोमवार) सकाळी चोवीस तासात धरण क्षेत्रात 150  मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजअखेर 2563 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी 1600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.

  • 08 Aug 2022 02:28 PM (IST)

    यवतमाळच्या वरुड प्रकल्पाच्या पाण्यात पती-पत्नी गेले वाहून

    यवतमाळच्या वरुड लघु प्रकल्पाच्या पाण्यात पती-पत्नी वाहून गेल्याची घटना घडली आहे.  राळेगाव तालुक्यातील वरुड येथे हा प्रकार घडलाय.  सुभाष राऊत (50) आणि सुरेखा राऊत (45) अशी या दोन्ही पती-पत्नींची नावे आहेत.  हे दोघेही वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने रात्री जागलीसाठी शेतात गेले होते.  सकाळी घरी परत येत असताना वरूड तलाव प्रकल्पाच्या सांडव्यावरुन एकमेकांचा हात धरून येत होते पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेले.  ही घटना गावकऱ्यांना कळताच, त्यांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. गावाशेजारील नंदिनी नदीतून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

  • 08 Aug 2022 02:14 PM (IST)

    उद्या सकाळी 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती

    मुंबई - उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, एकूण 12 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार गरजेचा असल्याने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल.

  • 08 Aug 2022 01:37 PM (IST)

    लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, रामदास कदम यांचेही संकेत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात चर्चा झाली, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. दोन दिवसाच्या आत  मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.  मुख्यमंत्री नांदेड दौऱा करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मी मंत्री-आमदार काहीही होणार नाही, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.

  • 08 Aug 2022 12:50 PM (IST)

    नागपुरातील नाग नाल्याच्या पाण्यात एक मुलगा वाहून गेला

    नागपुरातील नाग नाल्याच्या पाण्यात एक मुलगा गेला वाहून

    अग्निशमन विभागाने सुरू केलं सर्च ऑपरेशन

    अग्निशमन विभागाला मिळाली होती माहिती

    इमामवाडा परिसरातून वाहून घेल्याची माहिती

    पाय घसरून पडल्याची माहिती

  • 08 Aug 2022 12:20 PM (IST)

    मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

    गोवा वाहतूक बंद

    अंजनारी पुलावरची वाहतूक करण्यात आली बंद

    गोव्याच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक केली बंद

  • 08 Aug 2022 12:04 PM (IST)

    मंडणगडमधील भिंगळोली भागातील अपार्टमेंटमध्ये शिरलं पुराचे पाणी

    रत्नागिरीतील मंडणगडमधील भिंगळोली भागातील अपार्टमेंटमध्ये शिरलं पुराचे पाणी

    सृष्टी अपार्टमेंट आणि समर्थ कृपा अपार्टमेंट येथील वसाहतीत पाणी भरले

    ओढ्याचे पाणी शिरले वसाहतीमध्ये

    ओढ्याला पाणी मोठा आल्याने काही भागात पाणी साचले

  • 08 Aug 2022 11:49 AM (IST)

    सांगलीतील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

    सांगलीतील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

    धरणातून पाण्याचा विसर्ग कधीही सोडण्यात येणार

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 08 Aug 2022 11:32 AM (IST)

    शिर्डीत मुसळधार पाऊस

    शिर्डीत मुसळधार पाऊस

    रात्री झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण

    महावितरणचे सब स्टेशन , शासकीय विश्रामगृह, साई प्रसादालयाभोवती पाणीच पाणी

    गुडघाभर पाण्यामुळे सेवा विस्कळीत

    पाणी भरल्याने विज वितरण ठप्प

    रात्री पासुन शिर्डीतील अनेक भागाचा विजपुरवठा खंडीत

    साई प्रसादालयात जाताना भाविकांची तारांबळ

    तर शासकीय विश्रामगृहाला पाण्याचा विळखा

    पाणी काढण्यासाठी सुरू आहेत उपाययोजना

    मुसळधार पावसाने शेतीही पाण्याखाली तर रस्ते देखील जलमय

    पावसामुळे जनजिवन विस्कळीत

  • 08 Aug 2022 11:24 AM (IST)

    वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

    वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

    गावाला आलं नदीचं स्वरूप

    वाशिम जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून संध्याकाळी अनेक ठिकाणी ढग फुटी सदृष्य पाऊस पडत आहे

    अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे

  • 08 Aug 2022 11:19 AM (IST)

    संततधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांवर परिणाम

    संततधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका

    पावसामुळे वरुड-मोर्शीसह आदी तालुक्यातील संत्रा गळला

    संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अंदाजे 250 कोटींचा फटका

    आंबिया बहाराच्या संत्राचा शेतात सळा

    संत्रा उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत

  • 08 Aug 2022 11:07 AM (IST)

    गडचिरोलीत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात

    गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाचा फटका

    आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे पुन्हा एकदा बंद

    कुमरगुडा आणि पार्लाकोटा या दोन पुलावर पाणी वाहत असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

    भामरागड भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र

    भामरागड तालुक्यातील जवळपास 40 गावे जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काशी बाहेर

  • 08 Aug 2022 10:45 AM (IST)

    सिंधुदुर्गात संरक्षक भिंत कोसळली

    सिंधुदुर्गात संरक्षक भिंत कोसळल्याने करूळ घाटातील वाहतूक बंद

    वैभववाडी तालुक्यात दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने याचा फटका करूळ घाटाला बसला आहे

    रात्री 10 च्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळली

    अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे

    फोंडाघाट व आंबोली घाटातून वाहतूक वळविण्यात आली आहे

    रात्री 10 पासून करूळ घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे

  • 08 Aug 2022 10:35 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात मुसळधार पाऊस

    अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात मुसळधार पाऊस

    जाम नदीला मोठा पूर

    वरुड-काटोल महामार्गावर भारसिंगी जवळ पुलावरून वाहत पाणी

    दोन्हीकडील वाहतूक मध्यरात्री पासून झाली ठप्प

  • 08 Aug 2022 10:28 AM (IST)

    पन्हाळागडावरचा रस्ता खचला

    पन्हाळ्यावरील दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच

    पन्हाळागडावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील अत्याधुनिक कठड्याच्या बाजूची जमीन सरकली

    गेल्यावर्षी मुख्य रस्ता खचल्याने बांधण्यात आला होता कठडा

    कठड्याच्या बाजूची जमीन सरकल्याने गडपायथ्याशी राहणारे नागरिक भयभीत

    आज पहाटे च्या सुमारास घडली जमीन सरकल्याची घटना

  • 08 Aug 2022 10:20 AM (IST)

    कयाधु नदीच्या तिरावर पाणीचपाणी

    हिंगोलीत पावसाचा जोर वाढला

    सगळीकडे कोसळधारा

    कयाधु नदीच्या तिरावर पाणीचपाणी

    पहा tv9 मराठीचा आढावा

  • 08 Aug 2022 10:10 AM (IST)

    आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे पुन्हा एकदा बंद

    गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाचा फटका

    आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे पुन्हा एकदा बंद

    कुमरगुडा व पार्लाकोटा या दोन पुलावर पाणी वाहत असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद आहे

    भामरागड भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र

    भामरागड तालुक्यातील जवळपास 40 गावे जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काशी बाहेर

  • 08 Aug 2022 09:57 AM (IST)

    काजळी नदी दुथडी भरून

    रत्नागिरीत मुसळधार पाऊस

    नदी- नाले तुडुंब

    काजळी नदी दुथडी भरून

    परिपसात पाणीच पाणी

  • 08 Aug 2022 09:49 AM (IST)

    सिंधुदुर्गात कोसळधारा!

    सिंधुदुर्गात आज तिसऱ्या दिवशी ही कोसळधारा

    रात्री लागलेल्या पावसाने माणगाव येथील निर्मला नदीला पूर

    निर्मला नदीवरील आंबेरी पुलावर पाणी

    वाहतूक पुन्हा ठप्प.दोन्ही बाजूला गाड्या अडकल्या

    वाहनचालक पाणी ओसरण्याची वाट पाहता आहेत

    जनजीवन विस्कळीत

    सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले दुथडी भरून वाहता

  • 08 Aug 2022 09:36 AM (IST)

    अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका

    अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका

    नदीकाठच्या अनेक घरात पुराचे पाणी घुसलं

    नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

    घराच्या भिंती कोसळल्या

    कपडे,धान्य पुरात गेले वाहून

    अनेक कुटूंब आले उघड्यावर

  • 08 Aug 2022 09:15 AM (IST)

    सिंधुदुर्गात आज तिसऱ्या दिवशी ही कोसळधारा

    सिंधुदुर्गात आज तिसऱ्या दिवशी ही कोसळधारा.रात्री लागलेल्या पावसाने माणगाव येथील निर्मला नदीला पूर.निर्मला नदीवरील आंबेरी पुलावर पाणी.वाहतूक पुन्हा ठप्प.दोन्ही बाजूला गाड्या अडकल्या.वाहनचालक पाणी ओसरण्याची वाट पाहता आहेत. जनजीवन विस्कळीत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले दुथडी भरून वाहता आहेत.

  • 08 Aug 2022 08:52 AM (IST)

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदाद पाऊस सुरु

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदाद पाऊस सुरु

    कोयना धरण पाणीसाठयात वाढ

    धरण पाणीसाठा झाला 68.89 tmc

    धरण पाणलोट क्षेत्रात

    कोयनानगर 92 मिलीमिटर

    नवजा115 मिलीमिटर

    महाबलेश्वर 130मिलीमिटर पाउसाची नोंद

  • 08 Aug 2022 08:52 AM (IST)

    भंडाऱ्यामध्ये ढग फुटी सदृश्य पाउस

    मद्यरात्री ढग फुटी सदृश्य पाउस.

    तुमसर तालुक्यातील धनेगाव सोनेगाव गावात सिरल पावसाचं पाणी .

    चार ते पाच घरे जमीनदोस्त

    तहसीलदार हे स्वतः घटनास्थळी पोहचले असून या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सद्या कुठलीही जीवित हानी झाली नाही.

  • 08 Aug 2022 08:44 AM (IST)

    मुंबई पावसाची रिपरिप

    मुंबईमध्ये मध्यरात्री पासून पाऊसांनि विश्रांती घेतली आहे

    मात्र काही ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू आहे

    वातावरण ढगाळ पाहायला मिळत आहे

  • 08 Aug 2022 08:39 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच

    अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच

    अप्पर वर्धा धरणाचे सर्वच गेट उघडण्यात आल्याने वर्धा नदीला महापूर

    अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    कौडण्यापूर - आर्वी व मोर्शी - आष्टी ची वाहतूक बंद

    आजही अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

    अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका

  • 08 Aug 2022 08:20 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सोकी आणि ब्राम्हणी नदीला मोठा पूर

    अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सोकी आणि ब्राम्हणी नदीला मोठा पूर

    बहादा गावातील वार्ड नंबर एक मधील दहा पंधरा घर बुडाली

    सातनुर गावातील अंदाजे 50 जनावरे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती

    अमरावती-वरुड महामार्ग बंद असल्याने माहिती

    जरूड गावात आठवडी बाजार परिसर आणि बहादा फाटा परिसर पाण्यात

    ग्रामस्थांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे

    जिल्हा शोध व बचाव पथक पोहचणार असल्याची माहिती

  • 08 Aug 2022 08:07 AM (IST)

    नागपुरात पावसाच्या सरी

    नागपुरात आता पावसाला झाली सुरवात

    मध्य रात्री चांगला पाऊस झाला

    सकाळ पाऊस सुद्धा पावसाचं वातावरण आता झाली पावसाला सुरुवात

  • 08 Aug 2022 07:59 AM (IST)

    आज पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

    आज पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

    घाटमाथ्यावर अतिवृष्टीची दाट शक्यता

    हवामान विभागाचा अंदाज

    कोकणात ॲारेंज अलर्ट तर, मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट

    पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज

  • 08 Aug 2022 07:55 AM (IST)

    वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून पावसाच्या सरी

    वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून पावसाच्या सरी

    आताही सुरु आहे पावसाची जोरदार बॅटिंग

    सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरणक्षेत्राच्या पाणीपातळीत वाढ

    देवळी तालुक्याच्या यशोदा नदीची पाणी पातळी वाढल्याने राळेगाव वर्धा मार्ग वाहतुकीकारिता बंद

    वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोंढण्यपूर जाणारा आर्वी देऊरवाडा रस्ता बंद

    सततच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत

    पहिलेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान आता परत पावसाच्या सरीने नुकसान

  • 08 Aug 2022 07:44 AM (IST)

    हिंगोलीत ओढ्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली

    हिंगोलीत ओढ्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली

    मुसळधार पावसामुळे ओढ्याच्या पाणी

  • 08 Aug 2022 07:39 AM (IST)

    रत्नागिरी- खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळली

    रत्नागिरी - खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे कोसळली मोठी दरड

    12 तासाहून अधिक रघुवीर घाट बंद

    रघुवीर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

    रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो

    घाटात मोठी दरड कोसळल्याची 15 दिवसातील 3 री घटना समोर

    घाट सुरू करण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू

  • 08 Aug 2022 07:25 AM (IST)

    रत्नागिरीत धुवाधार!

    रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस

    सर्वच नद्या दुथडी भरून

    काजळी नदी पात्रा बाहेर

    हवामान खात्याचा पावसाचा दिवसभर इशारा

    रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वर जोरदार पाऊस

  • 08 Aug 2022 07:13 AM (IST)

    अमरावती-वर्धा जिल्ह्याचा संपर्क तुटला

    अमरावती: मध्यप्रदेश मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणामध्ये पाणीसाठा 89 टक्के पुढे गेला आहे.त्यामुळे धरणाचे सर्वच 13 ही दरवाजे पहिल्यांदा तब्बल 230 सेमी उघडल्यामुळे मोर्शी वरून वर्धा कडे जाणाऱ्या रस्त्यावर सात फूट पाणी आल्याने मोर्शी वरून अमरावती व वर्धा जिल्हाचा संपर्क तुटला, अप्पर वर्धाच्या पुलावरून पाणी जात असल्याने मोर्शी व आष्टीची वाहतूक सकाळ पासून बंद ठेवण्यात आली आहे,तर या धरणाचे पाणी वर्धा नदीला सोडण्यात आल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे त्यामुळे दुपार नंतर जिल्ह्यात पूरस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • 08 Aug 2022 07:03 AM (IST)

    नागपुरात खोलीकरण झालेले तलाव तुडुंब भरले

    नागपूर जिल्ह्यातील 75 तलावांचे झाले खोलीकरण

    खोलीकरण झालेले तलाव तुडुंब भरले

    कामे पूर्ण झालेल्या तालावांवर 15 ऑगस्ट ला झेंडा वंदन आणि वृक्षरोपन केलं जाणार

    अमृत सरोवर योजने अंतर्गत करण्यात आले काम

    काही तलावात मासेमारी सुद्धा केली जाणार

  • 08 Aug 2022 06:49 AM (IST)

    दुगारवाडी धबधब्यावर 15 हून अधिक पर्यटक अडकले

    नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर 15 हून अधिक पर्यटक अडकले

    रात्री उशिरा पर्यटकांना रेस्क्यु करण्यात रेस्क्यू टिमला यश

    अचानक वाढलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटक अडकले

    रात्री 11 वाजे पर्यंत पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

    उर्वरित एका पर्यटकाचा बचावासाठी रेक्यू सुरू

    पर्यटक अडकलेलं ठिकाण डोंगराच्या कपारी आणि पाण्याच्या अतिवेगाने होणाऱ्या प्रवाहजवळ असल्याने रेस्क्युमध्ये अडथळे

    अडकलेल्या पर्यटाकांपैकी 1 पर्यटक वाहून गेल्याची भीती

  • 08 Aug 2022 06:35 AM (IST)

    आजही मुसळधार पावसाचा अंदाज

    आजही मुसळधारेचा अंदाज

    मुंबई, ठाणे आणि पालघरला 5 दिवस ऑरेंज अलर्ट

    हवामान खात्याचा अंदाज

    तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय

    मच्छिमारांनाही हवामान खात्याकडून इशाराही देण्यात आलाय

    पुढचे दोन दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना

  • 07 Aug 2022 10:29 PM (IST)

    हिंगोली-शेतातील रस्ता पार करताना ओढ्याच्या पाण्यात बैल गाडी गेली  वाहून

    परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यासह बैलाचे वाचले प्राण

    सुदैवाने कुठलही जिवीत हानी नाही

    पूर ओसरल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी बैलगाडी काढली बाहेर

    सेनगाव तालुक्यातील साखरा शेत शिवारातील घटना

  • 07 Aug 2022 09:04 PM (IST)

    हवामान खात्यानं वर्तवला उद्याच्याही पावसाचा अंदाज

  • 07 Aug 2022 08:17 PM (IST)

    पुढील पाच दिवस पावसाचे

  • 07 Aug 2022 08:10 PM (IST)

    कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

  • 07 Aug 2022 08:09 PM (IST)

    इगतपुरीत दोन दिवसानंतर आज मुसळधार पावसाला झाली सुरवात

    विजांच्या कडकडाटासह इगतपुरीसह तालुक्यात काही भागात मुसळधार पावसाला सुरवात

    हवामान खात्याने सुद्धा वर्तविला होता पावसाचा अंदाज

    गेल्या काही तासांपासून जोरदार हवेसह पावसाचा तडाखा कायम

    पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंताग्रस्त

  • 07 Aug 2022 08:06 PM (IST)

    चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस

    चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस पडतोय. तरी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुरळीत सुरू आहे. दर तासाला या परशुराम घाटाची पाहणी केली जातेय. या घाटाची पाहणी करतानाचा व्हिडिओ जिल्हा प्रशासनानं सोशल मीडिया वरती पोस्ट केलाय.

Published On - Aug 08,2022 6:35 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.