AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा, मुहुर्त ठरला, कोणत्या महिन्यात होणार घोषणा?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षांपासून प्रलंबित असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका आणि नगरपंचायती, तर डिसेंबर अखेरीस जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा, मुहुर्त ठरला, कोणत्या महिन्यात होणार घोषणा?
| Updated on: Oct 19, 2025 | 9:55 AM
Share

राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळापासून लांबल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहे. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्यासाठी योजना आखली आहे. या संदर्भात आयोगाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनासोबत तयारीचा आढावा घेतला आहे. या निवडणुकांचा प्रस्तावित टप्पा समोर आला आहे. यानुसार २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना होती. परंतु आता त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आयोगाने वर्तवली आहे. तर दुसरा टप्पा डिसेंबर अखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. तसेच जानेवारी १५ ते २० दरम्यान २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सर्वच पक्षांची तयारी सुरु

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी अखेरपर्यंत सर्व निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यानुसार २० जानेवारीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वात आधी होण्याची शक्यता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतीत मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली असली तरी ती प्रत्यक्ष हाती मिळण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस घ्याव्यात, अशी मागणी महायुतीकडून केली जात आहे.

मनसे महाविकासआघाडीची मागणी काय?

तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसे यांनी सदोष मतदार याद्यांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली आहे. घोळ मिटल्याशिवाय निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे. या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. ही प्रचलित पद्धत असून तक्रारी आल्यास जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जातो, असे आयोगाच्या वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोग निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करत असून या महिनाअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?.

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली….

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं