AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिनी विधानसभेचा महाउत्सव… मतदानावर करडी नजर, CCTV कॅमेरे-ड्रोन सज्ज, हजारो पोलिसांचा ताफा; 29 महापालिकेच्या तयारीची A टू Z माहिती

Municipal election 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईसह जवळपास प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा असणार आहे.

मिनी विधानसभेचा महाउत्सव... मतदानावर करडी नजर, CCTV कॅमेरे-ड्रोन सज्ज, हजारो पोलिसांचा ताफा; 29 महापालिकेच्या तयारीची A टू Z माहिती
Police SecurityImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jan 14, 2026 | 4:51 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या (15 जानेवारी) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. जवळपास प्रत्येक शहरात पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या भागात रूट मार्च काढण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे. कोणत्या शहरात किती पोलिसांचा ताफा असणार ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबईतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा आराखडा राबवण्यात आला आहे. यानुसार उद्या मुंबईत 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त (DCP) आणि 84 सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तैनात असणार आहेत. त्यासोबतच 3000 हून अधिक पोलीस अधिकारी आणि 25000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी/होमगार्ड यांचा फौजफाटाही सज्ज असणार आहे. FTP/THANE/kdmc police ruth march

कल्याण–डोंबिवली

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि भयमुक्त वातावरण राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढत कायदा-सुव्यवस्थेबाबत ठाम संदेश दिला आहे. यात 100 पेक्षा अधिक कर्मचारी, 25 अधिकारी, SRPF व दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते. मतदानाच्या दिवशी सुरक्षा आणखी कडक असणार आहे.

नागपूर

15 जानेवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील एकूण 3 हजार 4 मतदान केंद्रांपैकी 321 केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 16 हजार अधिकारी कर्मचारी आणि 5 हजार पोलिस तैनात असणार असणार आहेत.

अमरावती महानगरपालिका

अमरावती महानगरपालिका निवडणूकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. शहरातील वितरण केंद्रांतून ईव्हीएम मशिन्स कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या आहेत. शहरात 2 हजारांहून अधिक पोलीस व होमगार्ड्स तैनात असणार आहेत.

परभणी

परभणी शहर महानगरपालीका निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूका भयमुक्त वातावरणात वाव्ह्यात यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या भागात रूट मार्च काढण्यात येत असून नानलपेठ पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून करीत घडामोडींवर नियंत्रण मिळवलंय. या निवडणुकीसाठी चार पोलीस उप अधिक्षक,11 पोलोस निरीक्षक,70 पोलीस अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व्हॅन, ड्रोन पेट्रोलिंग देखील केली जात आहे.

नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात 5 हजार पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, अंमलदार, विविध पथक आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. नाशिक शहरात दहा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह चार पोलीस उपयुक्त सहा पोलीस सहाय्यक आयुक्त आणि 14 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह अतिरिक्त फौज फाटाही राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

परभणी

परभणी शहर महानगरपालीका निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूका भयमुक्त वातावरणात वाव्ह्यात यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या भागात रूट मार्च काढण्यात येत असून नानलपेठ पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून करीत घडामोडींवर नियंत्रण मिळवलंय.

नांदेड

नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पॉलटेक्निकल कॉलेज इथून आज मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य evm मशिन्स वाटप करण्यात आल्या असून मतदान केंद्रावर घेऊ जात आहेत..ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरूनही 1481 पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला असून, एसआरपीएफच्या तुकड्यांसह एकूण 3 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत.

मालेगाव

मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. 110 पोलिस अधिकारी आणि 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त अलणार आहे. राज्य राखीव बलाच्या 2 तुकड्या तर 2 दंगा नियंत्रण पथकाचा देखील समावेश असणार आहे.

मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला.
संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी
संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी.
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO.
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं.