Maharashtra Exit Poll 2026 : एक्झिट पोलच्या अंदाजानं खळबळ, अनेक ठिकाणी धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यात भाजपला एवढ्या जागा
राज्यात आज 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं, त्यानंतर आता एक्झिट पोलचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात आज 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, त्यापैकी दोन महापालिका या नव्या आहेत, त्यामध्ये जालना आणि इचलकरंजी या महापालिकांचा समावेश आहे. तर इतर 27 अशा एकूण 29 महापालिका निवडणुकीसांठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान संपताच आता एक्झिट पोल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. सर्वांचं लक्ष ज्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे, त्या मुंबई महापालिकेत विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार मंबईमध्ये भाजप शिवसेना युतीला 137 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पुण्यात देखील भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये एकट्या भाजपला 97 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजप आपला दबदबा कामय राखण्याची शक्यात असून, गेल्या वेळी पुणे महापालिकेत भाजपला 97 जागा मिळाल्या होत्या, तर यावेळी पुणे महापालिकेत भाजपला 93 जागा मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला 30 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 64 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला पुण्यात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज असून, हा दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का असणार आहे.
Municipal Election 2026
संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - किशोर शितोळे
ठाण्यात ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
मुंबईमध्ये ठाकरेंना धक्का
दरम्यान आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठी देखील मतदानाची प्रक्रिया पार पडली, उद्या महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी आज एक्झिट पोलचे कल हाती आले आहेत. यावेळी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होती. एक्झिट पोलच्या कलानुसार मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीला 138 च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज असून, शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 58 ते 68 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
