Maharashtra News LIVE : कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप
Maharashtra News LIVE : वृक्षप्रेमींचा संताप पुन्हा पाहायला मिळणार आहे, कारण मेट्रो 139 स्टेशनच्या कामासाठी 139 झाडांवर कुऱ्हाड चालवणार आहेत. तर जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन निर्णायक राहील,असं निर्धार देखील जाहीर केला... राज्यातील पावसाबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.

सातारा रस्त्यावरील प्रस्तावित भूहारी मेट्रोमार्गीका स्टेशनच्या कामासाठी 139 झाडांवर कुऱ्हाड चालवणार आहेत यामध्ये अवघ्या चार वर्षाच्या झाडांपासून 70 वर्षे वयाच्या पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांचा समावेश आहे या झाडांच्या बदल्यात 3449 नवीन झाडे लावण्याचा अटीवर पालिकेने महा मेट्रोला झाडे हटवण्यासाठी जून मध्ये परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे सांगली दौरयावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी नोंदी रद्द वरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे.तसेच मराठा बांधवांना २९ ऑगस्ट रोजी चलो अंतरवाली सराटीची हाक देत,हे आंदोलन निर्णायक राहील,असं निर्धार देखील जाहीर केला आहे.धर्मांतराचं प्रकरण देखील समोर येत आहे. मीरा भाईंदरमध्ये धर्मांतराच्या संशयावरून दोन गटांत हाणामारी,गैरसमजातून प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाईंदर पश्चिमेला आयोजित एका प्रार्थना सभेत धर्मांतर होत असल्याच्या गैरसमजातून दोन गटांत जोरदार वाद आणि हाणामारी झाली. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.
LIVE NEWS & UPDATES
-
19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणम येथे आरएसएसची समन्वय बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक 19 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील गुडीलोवा येथे आयोजित केली जाईल.
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) खासदारांनी पंतप्रधान मोदींना फुले पगडी घातली
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा खासदार (शरद पवार) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची पगडी भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
-
-
राहुल देशाची दिशाभूल करत आहेत: जेपी नड्डा
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. ते जंतर मंतर घटनेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते चर्चेपासून पळ काढत आहेत.
-
आरोप करून पळ काढू नका, राहुल गांधींना विनंती: किरन रिजीजू
संसदीय कामकाज मंत्री किरन रिजीजू यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. ते म्हणाले, “आरोप करून राहुल गांधींनी पळ काढू नये. गृहमंत्री सभागृहात उत्तर देण्यासाठी तयार आहेत. असे आरोप करून राहुल यांनी पळ काढू नये. आम्ही उद्या आणि परवा सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत.”
-
कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप
कोलंबिया भूकंपाच्या तीव्रतेनं हादरलं. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.4 होती आणि त्याचा केंद्रबिंदू 115 किलोमीटर खोलीवर होता. कोलंबियन जिओलॉजिकल सर्व्हिसने भूकंपाची प्राथमिक तीव्रता 6.7 असल्याचे सांगितले. राजधानी बोगोटासह अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
-
गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशाची घटना, मुलींचे मृतदेह ताब्यात घेण्यास पालकांचा नकार
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जगतलई आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींना विषारी सापाने चावा घेतल्याची दुर्दैवी घटना घडली, या घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाला असून, तीन मुलींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. पालकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
-
मंचर दूध भेसळ प्रकरणात आणखी १० जणांना अटक
दूध भेसळ प्रकरणात मंचर पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली असून अटकेचा आकडा २४ वर पोहोचला आहे. मात्र काही भेसळखोरांमुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा व्यवसाय बदनाम होत आहे.
-
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचे थैमान, दोन दिवसांत २०० हून अधिक नागरिकांना चावा
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचे थैमान, घातलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २०० हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात काल मध्यरात्रीपर्यंत 58 तर आज सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत 103 डॉग बाईट रुग्णांची नोंद झाली असून. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
मराठी शिकण्यासाठी 1 मे पासून 105 दिवसांचा वेळ दिला- प्रताप सरनाईक
मराठी शिकण्यासाठी 1 मे पासून 105 दिवसांचा वेळ दिला. प्रवाशांसोबत जुजबी मराठी बोलता नाही आलं तर कारवाई होणार. आरटीओ कायद्याच्या अंतर्गत कारवाई होणार. मराठीचं प्रमाणपत्र असलं तरी आरटीओ अधिकारी तपासणी करणार- सरनाईक
-
शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा
शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा. मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारणा. उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडा, बजरंग सोनवणेंची मागणी. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव द्या, म्हात्रेंची मागणी. अमोल कोल्हेंनी पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा मांडला
-
करमाळा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात
करमाळा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात.. पावसाअभावी कोवळी पिके करपण्याच्या मार्गावर.. पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटली
-
आदित्य ठाकरे मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला पोहोचलेत
आदित्य ठाकरे मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला पोहोचलेत. आदित्य ठाकरे महापालिकेच्या मुख्यालयात दाखल झालेत. मुंबईतील मैदान आणि इतर विषयावर चर्चा केली जाणार आहे.
-
शिरूरमध्ये हाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
शिरूरमध्ये हाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू. पूजा गई असे मृत महिलेचे नाव आहे.दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यानच पूजा यांचा मृत्यू झाला. पती राहुल गई यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केलाय..
-
नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला
नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. त्र्यंबकेश्वर–घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात वाहनाला अडवून मारहाण करण्यात आली आहे. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाल्याची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
-
वसईच्या सातवली रोड येथे सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली
वसईच्या सातवली रोड येथे सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया गेले आहे. लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फवारा मोठा असल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर उडत होते त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. पावसाच्या महिन्यात सूर्या धरणाची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे
-
पुण्याच्या शिरुरमध्ये हाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू
पुण्याच्या शिरुरमध्ये हाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजा गई असं या मृत महिलेचे नाव आहे.
-
मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची मानसिकता नाही- भास्कर जाधव
“मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची मानसिकता नाही, आश्वासन दिली जातात पण प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाही, ” असे विधान ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केले आहे.
-
मोठा अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक मराठा समाजात द्वेष निर्माण करत आहे- नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील अध्यक्ष, अण्णा. पा. महामंडळ, म्हणाले, “मोठा अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात आणि मराठा समाजात द्वेष निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्याविरोधात मराठा समाज आंदोलन करावे असा प्रयत्न काही अधिकारी करत आहेत. वाईट अधिकाऱ्यांवर काही कारवाई करावी. महामंडळाचे MD विजयसिंह देशमुख यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे. पण व्हॅलीडिटी ऑफिस मधील काही अधिकारी असतील तर त्यांना समोर आणेल. आमदार अभिमन्यू पवार यांनी आमचे मुद्दे मुख्यमंत्री यांच्या कानावर घातले आहेत. मी पण त्यांच्या कानावर घालणार आहे. मी केवळ नावापुरता चेअरमन आहे. जास्त शिक्षण असलेला अधिकारी आला की मराठा समाजाचे नुकसान होतं.”
-
धीरज परदेशी हत्या प्रकरणात आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाईची शक्यता
धीरज परदेशी हत्या प्रकरणात आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाईची शक्यता. महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर शहरात तणावपूर्ण शांतता. हिंदुत्ववादी संघटनांकडून आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी. नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून आरोपींच्या घरावर अतिक्रमणाच्या नोटिसा. मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद यांच्या घरावर नोटिसा. आरोपींची घरे अतिक्रमित असल्याचा ग्रामपंचायतीचा दावा. बुलडोझर कारवाईच्या मागणीच्या दिशेने प्रशासनाचे पाऊल; पुढील कारवाईकडे लक्ष
-
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांची मोठी घोषणाबाजी. अंगणवाडी सेविकांना सर्व योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करा. कंत्राटीकरन बंद करा;चार श्रम सहीता रद्द करा या मागण्यासाठी आंदोलन.
-
पालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन होणार
पालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन होणार. आंदोलनात सहभागी होण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर अहिल्यानगर मध्ये दाखल. आरोपीच्या घरावर ‘देवा भाऊंचा बुलडोझर’ चालवा; गोपीचंद पडळकरांची मागणी. टिळा लावल्याच्या कारणावरून कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या झाल्याचा आरोप. घटना गंभीर; प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करण्याची पडळकरांची मागणी. आरोपीच्या घरावर ‘देवा भाऊंचा बुलडोझर’ चालवण्याची केली मागणी. अहिल्यानगरमध्ये हिंदू अल्पसंख्याक होत असल्याचा पडळकरांचा दावा. मंदिरांवरील अतिक्रमणांवरही कारवाई करण्याची पोलीस प्रशासनाकडे मागणी
-
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली MIDC च्या विविध प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी MIDC च्या विविध प्रकल्पाच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक पार पडली आहे. उद्योगांना आवश्यक जमीन उपलब्ध करुन देणं गरजेचे आहे असं फडणवीसांनी म्हटले आहे.
-
घाटकोपरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन-प्रशिक्षण संस्था उभारणार
मुंबईतील घाटकोपरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन-प्रशिक्षण संस्था उभारणार आहे. 300 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ झाला आहे. 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
समीर भुजबळ यांनी शेतकऱ्यांसोबत नाचून आनंद उत्सव केला साजरा
मांजरपाडा प्रकल्प अंतर्गत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी पोहचले येवला तालुक्यातील डोंगरगाव धरणात. तिसऱ्यांदा पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन संपन्न. समीर भुजबळ यांनी शेतकऱ्यांसोबत नाचून आनंद उत्सव केला साजरा.
-
भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी
भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी.आमदार तुषार राठोड भाजपचे तिसऱ्यांदाचे आमदार. खासदार अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांचा फोन. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा खासदार चव्हाण यांना फोन. बँकेचा अध्यक्ष कोणाला केलं याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती. अध्यक्ष झाल्यानंतर आमदार तुषार राठोड यांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा. आमदार राठोड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. आमदार राठोड यांची थेट मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदी वर्णी लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. खासदार अशोक चव्हाण यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची नावे होते अध्यक्ष पदाच्या चर्चेत. आमदार तुषार राठोड यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब
-
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांची मोठी घोषणाबाजी करण्यात आली . अंगणवाडी सेविकांना सर्व योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करा, कंत्राटीकरण बंद करा, चार श्रम सहींता रद्द करा या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.
-
नांदेड – आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा, चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मांसाहारी भोजनातून विषबाधा झाली. जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या देगलूर येथील रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .
-
बीड – रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप, 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.
बीड जिल्ह्यातील वाढवणा ते चौसाळा रस्त्याची स्वतः दिवंगत अजितदादा असताना त्यांनी पाहणी करून निधी मंजूर केला होता. त्यानंतर काम सुरू झाले मात्र अवघ्या दोन महिन्यातच डांबरीकरण उखडल्याने या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याच्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करून पुनर्रचना करावी, अशी मागणी वाढवणा, पिंपळगाव घाट, मानेवाडी, रुईगव्हाण आणि माळेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. रस्त्याची चौकशी न झाल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहान मुलांसह तीव्र आंदोलन करू, असा इशारा पाचही गावांनी दिला आहे.
-
लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
विद्यार्थ्यांच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी संसदेत दिली. मात्र संसंदेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. अमित शाह जवाब दो, या घोषणांनी संसद दुमदुमून गेली आहे.
-
कल्याणमध्ये पिसाळलेल्या श्वानाची दहशत कायम; बसस्टॉप परिसरात हल्ला, चौघे जखमी
कल्याण शहरातील पिसाळलेल्या श्वानाची दहशत अद्याप कायम असून आता बसस्टॉप परिसरात नागरिकांवर हल्ल्याची घटना घडली.खडकपाडा आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसरानंतर श्वानाने बसस्टॉपजवळ अचानक धुमाकूळ घातला.अव घ्या काही मिनिटांत विद्यार्थिनीसह चार जणांना चावा घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं, दहशतीचं वातावरण आहे.
-
झारखंडमधील आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
झारखंडमधील आंदोलनात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आधी पाण्याचा पारा आणि आता लाठीचार्ज करून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक आंदोलकांकडून बॅरिकेड्स तोडण्याचाही प्रयत्न झाला आहे.
-
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सकाळी ११ वाजल्यापासून सुरळीत सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नलच्या समस्येमुळे सकाळी लोकल ट्रेन उशिरा धावत होत्या. ती समस्या आता दूर करण्यात आली आहे.
-
झारखंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव
रांचीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले कुश महातो हेदेखील रुग्णवाहिकेतून विधानसभेला घेराव घालण्याच्या मोर्चात पोहोचले. तर भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं.
-
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी पाण्याचा मारा केला. मात्र त्या पाण्यातही विद्यार्थी नाचले. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ आणि सरकार यांच्याच रविवारी झालेली चर्चेची तिसरी फेरीही अनिर्णित ठरली. त्यामुळे आज विधानसभेला घेराव घालण्यात आला.
-
मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने
पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल 30 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर गाड्या एकामागे एक रखडल्या आहेत.
-
राज्यात पावसाचा जोर ओसरला
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे पुढील पाच दिवसातही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच काही ठिकाणी पाऊस उघडीप घेईल असा अंदाज हवामान तज्ञ एस डी सानप यांनी वर्तवला आहे.
-
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने सुरु आहे. वाहतूक जवळपास 25 ते 30 मिनिटे उशिराने सुरु आहे. वाहतूक उशिराने सुरु असल्यामुळे प्रवाशी ट्रॅकवरुन जाताना दिसत आहेत.
-
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मराठा समाजावर अन्याय झाला- मनोज जरांगे
चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाठ यांनी केलेली चूक दुरुस्ती केलीच पाहिजे ही मराठा समाजाची भावना आहे. इतका अन्याय मराठा समाजावर होऊ नये अशी मराठा समाजाची इच्छा आहे, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मराठा समाजावर अन्याय झाला आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, दोषींवर कारवाई
गडचिरोली येथील जपतलई अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक व नागपूर येथील पथके आज घटनास्थळी सायंकाळपर्यंत पोहोचतील. चौकशीनंतर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणार
-
मुंबईतील खड्ड्यांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याची सामाजिक संघटनांची मागणी
मुंबईतील खड्ड्यांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याची सामाजिक संघटनांची मागणी केली आहे. आत्मसम्मान मंचचे अध्यक्ष अॅड. नित्यानंद शर्मा यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून विविध रस्त्यांचे ड्रोनद्वारे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करण्याची परवानगी मागितली आहे.
-
झारखंडमध्ये हजारो विद्यार्थ्यांची विधानसभेकडे कूच
झारखंडमधील भरती परीक्षेत कथित घोटाळ्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी सीजीएल परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी विधानसभेकडे कूच करत आहेत. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला तरी विद्यार्थ्यांनी तीन बॅरिकेड्स पार केले आहेत. दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलन तीव्र होत आहे.
-
उल्हासनगरात मेट्रो येण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेत जुंपली
उल्हासनगरमध्ये मेट्रो येण्यापूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत श्रेय वादावरून जुंपली आहे. मी केलेल्या पत्रव्यवहारामुळेच उल्हासनगरमध्ये मेट्रो आली असे आमदार कुमार आयलानी यांनी म्हटले. तर जो आमदार शहरातील रस्ते बनवू शकला नाही.. तो मेट्रो आणू शकेल का? असा शिवसेनेचा सवाल आहे.
-
शरद पवारांच्या खासदारांनी घेतली PM मोदींची भेट
शरद पवारांच्या खासदारांनी PM मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर या सर्व खासदारांची पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालायत साडेअकरा वाजताच्या सुमारास ही चर्चा सुरू झाली आहे.
-
सुप्रिया सुळेंसह सर्व खासदार संसदेत दाखल
खासदार सुप्रिया सुळेंसह सर्व खासदार संसदेत दाखल झाले आहेत. आता थोड्याच वेळात शरद पवारांच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम मार्गावरील वांद्रे ते माटुंगा दरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे ट्रेन विलंबाने धावत आहेत. तसेच या तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा विधानभवनावर मोर्चा
झारखंडमधील रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी विधानसभेवर मोर्चा काढला आहे. बॅरिकेट्सवरून उड्या मारत विद्यार्थी विधानभवनाच्या दिशनेने निघाले आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात भारताचे झेंडे आहेत. तसेच त्यांच्याकडून सरकारविरोधी घोषणा दिल्या जात आहेत.
-
नगरपालिका कर्मचारी मृत्यू प्रकरण, अहिल्यानगर बंदची हाक
अहिल्यानगरमध्ये एका गटाच्या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.
-
जिवावर उदार होऊन रुग्णांवर सुरू आहेत उपचार, स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
रुग्णांना नवीन आयुष्य देणाऱ्या भंडारा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतःचीच इमारत सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयाची मुख्य इमारत इतकी जीर्ण आणि नादुरुस्त झाली आहे, की छत कोसळू नये म्हणून तब्बल ३६० लोखंडी खांबांचा आधार द्यावा लागला आहे. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ या इमारतीच्या बांधकामाला झालेले आहे. ३८२ खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयातील अनेक वॉर्डात छताचे मोठे मोठे पोपडे गळून पडत आहेत. त्यामुळे उपचारासाठी भरती असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भीतीपोटी जिवावर उदार होऊन येथे राहत आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन कुथे यांनी.
-
महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यूप्रकरणी 5 आरोपींना 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
रात्री उशिरा आरोपींना अहिल्यानगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात मोठ्या पोलीस बंदोबस्तात केले होते हजर. आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना केली अटक..तर आज अहिल्यानगर शहर बंदची हाक…मुख्य आरोपीच्या अटकेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात मृतदेह ठेवणार,आमदार संग्राम जगताप यांची आक्रमक भूमिका..काल धीरज परदेशी यांचा मृतदेह संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी केला होता दाखल..मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा दिला आहे इशारा.
-
आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार. जपतलाई येथे अनुदानित निवासी आश्रम शाळा. रात्री विद्यार्थिनी खोलीत झोपलेले असताना सापाने दंश केल्याची प्राथमिक माहिती. मृतक तीनही विद्यार्थिनींना आणले जिल्हा सामान्य रुग्णालयात
-
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा
राज्यात दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याचं प्रकरणात आणखी दहा जणांना मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यामुळं आता अटकेचा आकडा चोवीस वर पोहचलाय. आजच्या कारवाईत ही राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती असल्याची चर्चा सुरुये. 4 जुलैला राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश करण्यात एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं होतं. या कारवाईत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी निगडित व्यक्तींना अटक करण्यात आल्याची अन माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचे निकटवर्तीय असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र वळसे पाटलांनी माझा या दूध भेसळीशी संबंध नसल्याचा दावा केला होता. आता आधीच्या आरोपींकडून ज्या व्यक्तींना भेसळीचं साहित्य दे…
-
राजकीय लोकप्रतिनिधींना गावबंदी
शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी गाव बंदीचे लावले पोस्टर. शक्ती पीठ महामार्ग रद्द करण्याच्या मोहिमेत जे लोकप्रतिनिधी सहभागी होणार नाहीत अशा लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश नाही. औंढा नागनाथ तालुक्यातील शेंदूरसेना गावच्या वेशीवर लागले पोस्टर..
-
अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेत अव्वल, वर्षभरात ३१.३५ कोटींचा महसूल; २.२९ लाख प्रवाशांनी घेतला लाभ
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्या पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्याच वर्षात प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ११ ऑगस्ट २०२५ ते २८ जुलै २०२६ दरम्यान तब्बल २.२९ लाख प्रवाशांनी या गाडीतून प्रवास करून रेल्वेला मोठा महसूल मिळवून दिला. वर्षभरात तब्बल ३१ कोटी ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक विक्रमी उत्पन्न जमा झाले असून, वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारी ही मध्य रेल्वेतील पहिली वंदे भारत ठरली आहे.
-
डोंबिवलीतील ‘मेला ऑर्केस्ट्रा बार’वर पोलिसांचा छापा; बार मालकासह ३३ जणांवर गुन्हा दाखल
डोंबिवलीतील ‘मेला ऑर्केस्ट्रा बार’वर पोलिसांनी छापा टाकला आहे. बार मालकासह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोकड्या कपड्यांतील अश्लील नृत्य, पैशांची उधळण सुरु असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ग्राहक, नृत्यांगना, व्यवस्थापक आणि सेवकांविरोधात गुन्हे दाखल करत ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-
डीपफेक व्हिडिओद्वारे महिलेची फसवणूक….
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या डीपफेक व्हिडिओ तयार करून फसवणुकीची घटना घडल्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला सायबर चोरट्यांनी बनावट व्हिडिओ तयार करून एका महिलेची चार लाख 9 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला याबाबत भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
पुण्यात चार दिवसांत हलक्या पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने उघडीत दिल्याने उकड्यात वाढ झाली आहे त्यामुळे पुणेकरांना दमट हवामानाचा त्रास सहन करावा लागत आहे पुढील दोन ते तीन दिवसांत शहरात दमदार पावसाची शक्यता नसून तुरळ ठिकाणी हलक्या ते अति हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
-
पुण्यातून विक्रमी २१९ विमान उड्डाणे, दोन अतिरिक्त विमानसेवांमुळे नवा उच्चांक
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एकाच दिवसात तब्बल २१९ विमानांच्या उड्डाणांचे ऐतिहासिक नियोजन करण्यात आले, विमानांचे आगमन आणि प्रस्थान या दोन्ही आघाड्यांवरील सर्व उड्डाणे नियोजित वेळेनुसार यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे हा एक नवा उच्चांक ठरला आहे.
-
मंत्री बावनकुळे,एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकर मनोज जरांगे पाटलांची जोरदार टीका.
सांगली दौरयावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी नोंदी रद्द वरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे.तसेच मराठा बांधवांना २९ ऑगस्ट रोजी चलो अंतरवाली सराटीची हाक देत, हे आंदोलन निर्णायक राहील,असं निर्धार देखील जाहीर केला आहे.सांगलीच्या आटपाडी मध्ये पार पडलेले जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
-
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत 125 ते 130 नागरिकांना चावा, 11 वर्षीय मुलगी गंभीर जखमी
कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल ते खडकपाडा मार्गावर भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत निर्माण केली. दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 125 ते 130 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये 11 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. चावा घेतलेल्या नागरिकांमध्ये रुक्मिणीबाई यांचाही समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच भटक्या कुत्र्यामुळे शेकडो नागरिक जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.