Maharashtra News LIVE : लालबाग राजाच्या दर्शनाला सकाळपासून गर्दी, जाणून घ्या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स

Maharashtra News LIVE : आजपासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली होती. राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra News LIVE : लालबाग राजाच्या दर्शनाला सकाळपासून गर्दी, जाणून घ्या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स
ganesh chaturthi 2026
| Updated on: Sep 14, 2026 | 8:05 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Sep 2026 08:05 AM (IST)

    ‘बाप्पाच्या स्वागतासाठी ठाणेकरांची लगबग; तीन हात नाका परिसरात ढोल-ताशांच्या गजरात भक्तीचा जल्लोष!’

    तीन हात नाका परिसरातील गणपती कार्यशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी. महिनाभराच्या तयारीनंतर गणरायाच्या आगमनाचा उत्साह ठाणेकरांच्या चेहऱ्यावर. ढोल-ताशांचा गजर, फुलांनी सजलेल्या गाड्या आणि गुलालाची उधळण. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने तीन हात नाका परिसर दुमदुमला. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचा उत्साह शिगेला. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी भक्तांची लगबग.

  • 14 Sep 2026 08:03 AM (IST)

    गणेशोत्सवांमध्ये वडाळ्याच्या GSB गणपतीचेही विशेष स्थान

    मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सवांमध्ये वडाळ्याच्या GSB गणपतीचेही विशेष स्थान आहे. यंदा या गणेशोत्सवाला तब्बल 72 वर्षांची परंपरा पूर्ण होत आहे. सर्वाधिक सोन्या, चांदीने सजवलेली गणपती बाप्पांची मूर्ती गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक पद्धती आणि सामाजिक सेवेचा अनोखा संगम या गणेशोत्सवात पाहायला मिळतो. या मंडळाच्या गणपतीची स्थापना तब्बल 72 वर्षांपूर्वी करण्यात आली. 2026 मध्ये या परंपरेला 72 वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाची परंपरा श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाशी संबंधित असल्याचे मंडळाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.


  • 14 Sep 2026 07:26 AM (IST)

    पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मिरवणूक किती वाजता निघणार?

    पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक निघणार पारंपारिक पद्धतीने. सकाळी आठ वाजता मुख्य मंडप येथून मिरवणूक सुरू होणार आहे. रास्ता पेठ येथून पालखी मध्ये गणेश विराजमान झाल्यानंतर मिरवणूकीला सुरुवात. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची 11.45 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार. ढोल ताशांच्या गजरात श्री कसबा गणपतीची मिरवणूक पार पडणार.

  • 14 Sep 2026 07:11 AM (IST)

    Dagdusheth Ganpati 2026 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मयुरेश्वर रथातून निघणार मिरवणूक

    सकाळी 8.30 वाजता रमणबाग येथून मिरवणुकीला होणार सुरुवात. मयुरेश्वर रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. यावर्षी वृंदावन मधील प्रेमाचं प्रतीक असलेल्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट. सकाळपासूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.

  • 14 Sep 2026 07:09 AM (IST)

    अंबरनाथमध्ये भर पावसात गणरायाचं आगमन

    अंबरनाथमध्ये भर पावसात गणरायाचं आगमन झालं. डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन भक्तांचा उत्साह. बाप्पाच्या आगमनात बच्चे कंपनीचा जल्लोष. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.


  • 14 Sep 2026 07:08 AM (IST)

    Lalbaugcha raja 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी

    कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाच्या दर्शनाला सकाळपासून अलोट गर्दी झाली आहे. कालपासूनच भक्तगण नवसाच्या रांगेत थांबले होते. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे आज लालबाग राजाच्या दर्शनाला येणार आहेत.

  • 14 Sep 2026 07:05 AM (IST)

    Mumbaicha Raja 2026 : मुंबईच्या राजाची आरती सुरु

    मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्लीतील गणपती बाप्पाच्या पूजेला सुरवात झाली आहे.गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सर्व पदाधिकारी आणि भक्तगण या पूजेला उपस्थित आहेत. आरती सुरु आहे.

महाराष्ट्रात आजपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशचतुर्थीचा आज पहिला दिवस आहे. सकाळपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची सुद्धा मनोभावे पूजाअर्चा सुरु आहे. अनेकांची बऱ्याच दिवसांपासून घरगुती गणपतीसाठी तयारी सुरु आहे. आज तो दिवस आला आहे. मुंबईतील चाकरमनी, नोकरदार वर्ग गणपतीसाठी गावी गेला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण या भागातही गणेशचतुर्थीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. काल मुंबापुरीला पावसाने झोडपून काढलं. पण गणेशचतुर्थीचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. मागच्या बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. गणरायाने पावसाची चिंता मिटवावी हीच सर्वांची प्रार्थना आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us