Maharashtra News LIVE : टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुका बंदची हाक
Maharashtra News LIVE : टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुका बंदची हाक पुकारण्यात आली आहे. कल्याण पूर्वेत मध्यरात्री तोंडावर कपडा बांधून संशयितांनी कारमधून रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
आरोग्यमंत्र्याची अचानक रात्री उशिरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
आरोग्यमंत्र्याची अचानक रात्री उशिरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट. लोहा तालुक्यातील सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली भेट. रात्रीच्या वेळी आरोग्य मंत्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेची उडाली धावपळ. आरोग्यमंत्र्यांनी ग्रामस्थांकडून जाणून घेतल्या रुग्णालयातील अडचणी. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, आरोग्य कर्मचारी उपस्थिती आणि रुग्णसेवेचा घेतला आरोग्यमंत्र्यांनी आढावा. आरोग्य सेवेत हलगर्जीपणा करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याचे आरोग्यमंत्र्याचे निर्देश
-
गोदावरी नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला
बीडच्या राक्षस भुवन येथे शनींचे साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ असलेल्या राक्षस भुवन येथे विविध धार्मिक विधीसह दशक्रिया विधी मोठ्या प्रमाणात केले जातात. येथील गोदावरी नदी पात्रातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे येणाऱ्या काळात लोकांना दशक्रिया विधींसाठी देखील पाणी विकत घेण्याची वेळ येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
-
-
चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक झाला घाटात पलटी
नाशिक मुंबई महामार्गवर नवीन कसारा घाटातील धबधबा पॉईंट जवळ पहाटेच्या सुमारास अपघात. अपघातात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी. अपघातामुळे ट्रक मधील गोण्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत. महामार्ग पोलिस व कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी केले दाखल. अपघात ग्रस्त ट्रक बाजूला काढून वाहतूक केली सुरळीत
-
शहरातील 90 टक्के सांडपाणी थेट नदीत; 65 नाल्यांमुळे चंद्रभागा प्रदूषित..
विठुरायाच्या दर्शनापूर्वी स्नान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. तीन टप्प्यांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले, मग प्रदूषण रोखण्यात अपयश का. 190 कोटी रुपये नेमके गेले कुठे?.. काळपट पाणी आणि दुर्गंधीमुळे चंद्रभागेच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न. प्रदूषणाचा विळखा सुटणार कधी? वारकऱ्यांचा प्रशासनाला सवाल…..
-
अवकाळी पावसाने चाकणला झोडपले; रस्त्यांचे नदीत रूपांतर
अवकाळी पावसाने चाकण परिसराला अक्षरशः धुऊन काढले असून, काही वेळाच्या जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.
-
-
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून आवर्तने सोडण्याचा निर्णय घ्या अन्यथा तुमचा इगो मोडून काढू
आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात जायकवाडी कालवा समितीची बैठक पार पडणार आहे.या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून 3 रब्बीसह 2 उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय घ्या अन्यथा मराठवाडयासाठी पाणी सोडू देणार नाही हा तुमचा इगो मोडून टाकू असा ईशारा जालन्यातील भाजपचे नेते आणि घनसावंगी विधानसभा प्रमुख सतिष घाटगेंनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना दिलाय.
-
बीडच्या उच्चशिक्षित व्यापाऱ्याकडुन ४७ लाख रूपये उकळले
‘टँगो’ ॲपवर ओळख करून आरोपी महिलांनी व्यापाऱ्याचा खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केला.
– व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बँक खाती आणि क्रिप्टोद्वारे तब्बल ४७ लाख रुपये उकळले.
– आरोपी महिला नेपाळी नागरिक असून त्यांनी भारतात बनावट पासपोर्ट आणि आधार कार्ड बनवल्याचंही समोर.
– पुराव्यानिशी तक्रार दिल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -
अवकाळी पावसाचा इंद्रायणी भाताला फटका; पवनमावळातील शेतकरी संकटात
मावळ तालुक्यातील पवनमावळ परिसराला अवकाळी पावसाने झोडपले असून,हातातोंडाशी आलेले भातपीक पावसामुळे आडवे झाले आहे.आधीच पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले होते. त्यात आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
उद्घाटनापूर्वी मेट्रो स्टेशन गळती प्रकरणात PMRDA प्रशासनना कडून उशिरा रात्री खुलासा सादर
PMR-01 स्टेशन येथे पाणीगळती होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रवेश संरचनेच्या (Entry Structure) टेरेस स्लॅबवरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण होणे हे होते.सदर टेरेस स्लॅब खुल्या आकाशाखाली असल्याने, निचरा पाइपमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी स्लॅबवर साचून त्याचा ओव्हरफ्लो झाला. परिणामी, सदर पाणी स्टेशन बॉक्स व प्रवेश संरचना (Entry Structure) यांच्यामधील गॅप मधून झिरपून मेझानाइन स्तरावर दिसून येत होते.सदर निचरा पाइपमधील तात्पुरता अडथळा दूर करण्यात आला असून, पावसाच्या पाण्याचा निचरा आता सुरळीतपणे सुरू आहे. तसेच, सदर पाणीगळती ही केवळ निचरा पाइपमधील तात्पुरत्या अडथळ्यामुळे झालेली असून, स्टेशन बॉक्स अथवा प्रवेश संरचनेच्या कोणत्याही संरचनात्मक घटकांमध्ये (Structural Elements) कोणताही दोष नसल्याची आम्ही खात्री देत आहोत.
-
नाशिक : साधू ग्राम च्या जागेसाठी पाच महिन्यांचा अल्टिमेटम
साधू ग्रामच्या जागेसाठी पाच महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मार्चपर्यंत कामे पूर्ण करून साधू ग्रामची जागा आखाड्यांना द्या.. अशी साधू महंतांची मागणी आहे. मार्चला जागा मिळाल्यास जून जुलै पर्यंत साधू ग्राम उभारणी करणे शक्य आहे. आखाड्यांचे निवासस्थान धार्मिक विधी आणि अन्य सुविधांची उभारणी करण्यासाठी वेळ लागणार असल्याने जागेसाठी एक प्रकारे अल्टीमेटम आहे. शेतकऱ्यांना योग्य आणि लवकर मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याची मागणी होत आहे.
-
ठाकरे यांची शिवसेना कुंभमेळा आयुक्तांना विचारणार जाब
खासदार राजाभाऊ वाजे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा ठाकरे यांच्या शिवसेनेचा आरोप आहे. कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात जाऊन कुंभमेळा आयुक्तांना जाब विचारणार आहेत. नाशिक शहरातील सर्व पदाधिकारी नगरसेवक आज अकरा वाजता कुंभ प्राधिकरण कार्यालयात जाऊन विचारणार जाब आहेत.
-
जायकवाडीत पाणी असूनही पाणी का देत नाही,नाशिकच्या धरणातून शेतकऱ्यांना कशी आवर्तने देता.? घाटगेंचा राधाकृष्ण विखेंना सवाल
आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात जायकवाडी कालवा समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून 3 रब्बीसह 2 उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय घ्या अन्यथा मराठवाडयासाठी पाणी सोडू देणार नाही हा तुमचा इगो मोडून टाकू असा ईशारा जालन्यातील भाजपचे नेते आणि घनसावंगी विधानसभा प्रमुख सतिष घाटगेंनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना दिलाय. जायकवाडीतून आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागत असून धरणात पाणी असूनही आम्हाला हक्काचं पाणी का देत नाही, नगर,नाशिक जिल्ह्यातील धरणातून शेतकऱ्यांना आवर्तनं कशी देता असा सवाल सतिष घाटगेंनी राधाकृष्ण विखेंना केलाय.शिवाय जायकवाडीतून आवर्तने न दिल्यास मराठवाडा पेटून उठेल याला विखे जबाबदार असतील असा ईशारा देखील घाटगेंनी दिलाय.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये परतीच्या पावसाचा जोर; शहरात जोरदार सरी
पिंपरी-चिंचवड शहरात परतीच्या पावसाने जोर धरला असून, शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे.
-
जालना शहरातल्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्त आज घेणार 16 प्रभागांचा आढावा
जालना शहरातील पाणीपुरवठ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून शहरातल्या 16 प्रभागांमधील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची संबंधित अडचणी जाणून घेण्यासाठी आज आढावा बैठक पार पडणार आहे, महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असून यामध्ये शहरातल्या प्रत्येक प्रभागातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था,नवीन जलवाहिन्या,जुन्या जलवाहिन्यांची गळती त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी वाल बसविण्याचे काम करणे यासह आदी विषयांवर चर्चा होणार आहे,
-
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी आज मतदान
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. २१ पैकी ११ जागा बिनविरोध; उर्वरित १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. ३ हजार ८३७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावला आहे. १४ तालुक्यांतील ३३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पारनेरमध्ये निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
-
नांदेड – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर आहेत. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यास मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहेत. मनोज जरांगे यांचे नांदेड येथील निकटवर्तीय कार्यकर्ते श्याम वडजे पाटील यांचे वडिल गणपतराव वडजे पाटील यांच आज प्रथम पुण्यस्मरण आहे. उस्माननगर रोड येथील गुंडेगावकर मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता दरम्यान मनोज जरांगे दाखल होणार आहेत.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पार पडत आहे दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून सध्या राज्यभरात दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिधावाटप सुरू आहे, याच अनुषंगाने जालन्यात देखील शिवसेनेकडून गरजू आणि दिव्यांग कुटुंबांना दिवाळीनिमित्त अन्नधान्याच्या शिधा किट चं वाटप करण्यात आलय,युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर,शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या हस्ते या शिधाचं वाटप करण्यात आलंय.
-
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाणप्रकरणी मोठी बातमी
मारहाण करणारा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंचा कल्याण न्यायालयात पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे, सुप्रीम कोर्टाने आधीचा जामीन केला होता रद्द. यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांना शरण आलेल्या म्हात्रेंची आधारवाडी कारागृहात रवानगी झाली होती. फास्टट्रॅक कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू असून आपर्यंत या खटल्यात पंच, तक्रारदार, महत्त्वाचे साक्षीदार आणि तपास अधिकारी API प्रशांत मोरे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांच्या मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंगची फॉरेन्सिक तपासणी पाठवली असून मोबाईल जप्त न केल्याबाबत बचाव पक्षाची विचारणा देखील केली होती. आता नव्या जामीन अर्जावर ३ नोव्हेंबरला सुनावणी असून रमेश म्हात्रे याला पुन्हा जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुका बंदची हाक पुकारण्यात आली आहे. साईडोंगर जंगल वाचवण्यासाठी कर्जतकर एकवटणार आहेत. जंगलतोडीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले असून भीमाशंकर, साईडोंगर परिसरातील जंगलतोडीविरोधात कर्जतकरांचा एल्गार आता पाहायला मिळणार आहे. जंगल वाचवा, निसर्ग वाचवा’चा नारा देत आज कर्जत तालुका बंद असणार आहे. तर कल्याण येथून देखील धक्कादायक माहिती समोर येत आहे. कल्याण पूर्वेत मध्यरात्री तोंडावर कपडा बांधून संशयितांनी कारमधून रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. गोपाळ कृष्ण नगरमधील परिसराची घटना CCTV मध्ये कैद झाली. पहाटे साडेतीन वाजता कारमधून आलेल्या व्यक्तींकडून दोन सदनिकांची पाहणी करण्यात आली. पोलिसांकडून कारचा शोध सुरू असून व्यक्तींची ओळख आणि येण्यामागचा हेतू तपासणार आहेत.
दुष्काळग्रस्त भागात देखील परिस्थिती गंभीर आहे. शरद पवार दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार, तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दुष्काळग्रस्तांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. शरद पवार आज दुपारी ४ वाजता परंडा आणि धाराशिव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार. धाराशिव येथे मुक्काम करणार असून उद्या कळंब तालुक्यात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.