Maharshtra News LIVE : भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ

Maharashtra news Live : नेपाळमध्ये भीषण पूर आला असून यात काही भारतीय लोकही अडकले आहेत. तर काही लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

Maharshtra News LIVE : भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ
| Edited By: | Updated on: Aug 27, 2026 | 6:51 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Aug 2026 06:51 PM (IST)

    निवडणुकीपूर्वी राहुल गांधी असे दिसले असते आम्ही त्यांच्यासोबत गेलो असतो – अमित ठाकरे

    राहुल गांधी यांचा पुण्यातील कार्यक्रम उत्तम झाला आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी असे दिसले असते तर कदाचित आम्ही त्यांच्यासोबत गेलो असतो असे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यानंतर ते म्हणाले की हा माझा विचार आहे , कोणासोबत जाण्याचा निर्णय राज साहेब घेतात.

  • 27 Aug 2026 06:15 PM (IST)

    जितकी तुम्ही खुन्नस देणार तितके पेटून आम्ही मुंबईला जाणार – मनोज जरांगे

    आम्ही आंतरवलीतच 29 तारखेला उपोषणाला बसणार आहोत. परंतु देवेंद्र फडणवीस यांचा मराठ्यांचा द्वेष जागा झाला आहे, मराठ्यांना मराठ्यांना अडवायला सुरू केले आहे, एवढा मोठा मुख्यमंत्री असून त्याला कळत नाही. जितकी तुम्ही खुन्नस देणार तितके पेटून आम्ही मुंबईला जाणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


  • 27 Aug 2026 06:07 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून कार्यालयाचा अनागोंदी कारभार बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांच्या जुन्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याची अट रद्द करावी, 2020 पूर्वी सेवेत लागलेल्या शिक्षकांची परीक्षा अट रद्द करावी, पदवीधर शिक्षकांना 12 वर्षांनंतर वेतनश्रेणी, निवडश्रेणी आणि चटोकोपाध्याय वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली जात आहे. शिक्षकांचे प्रलंबित वेतन, वेतन निश्चिती, पदोन्नती, समायोजनआणि अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी होत आहे.

  • 27 Aug 2026 05:07 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – – मिटमिटा-पडेगावमध्ये सात ते आठ दिवसांनी पाणी; सभागृहात गोंधळ

    छत्रपती संभाजीनगर – मिटमिटा-पडेगावमध्ये सात ते आठ दिवसांनी पाणी, या मुद्यावरून सभागृहात गोंधळ झाला. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक गणेश लोखंडेंनी महापौरांना जाब विचारला. भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ठाकरे शिवसेनेने शहराचं वाटोळं केल्याचा आरोपही त्यांनी लावला.  पाणीटंचाईला माजी खासदार चंद्रकांत खैरे जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला.

  • 27 Aug 2026 04:38 PM (IST)

    संवेदनशील गोष्टी बोलताना खबरदारी घेतली पाहिजे – सुप्रिया सुळे

    विजय वडेट्टीवार जे बोलले , ते अनावधानाने बोलल्याचं म्हटलं. संवेदनशील गोष्टी बोलताना खबरदारी घेतली पाहिजे – सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया.

    जो काही खोटा आरोप माझ्यावर झाला, त्यावर काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण आलंय, मला हा विषय वाढवायचा नाहीये – असंही त्या म्हणाल्या.


  • 27 Aug 2026 04:29 PM (IST)

    गोंदिया : भडांगामध्ये दारूबंदीसाठी हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले

    गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील भडांगा गावात दारूबंदीच्या मागणीसाठी भव्य रॅली काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीत महिला, तरुण, विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण भडांगा गाव दारूबंदीच्या मागणीच्या घोषणांनी दुमदुमलं.

  • 27 Aug 2026 04:21 PM (IST)

    जालन्यात ब्राह्मण समाज आक्रमक,येत्या 29 ऑगस्ट पासून करणार अन्नत्याग आंदोलन

    येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होत आहे. मात्र दुसरीकडे जालन्यात देखील ब्राह्मण समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा ब्राह्मण समाजातल्या मुला मुलींना मोफत शिक्षण यासह इतर विविध मागण्यांसाठी दिपक रणनवरे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

  • 27 Aug 2026 04:06 PM (IST)

    अमरावती – चौकशी समितीने जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागाची केली पाहणी

    अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय 3 नवजात बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समितीकडून नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी करण्यात आली.  पाहणी केल्यानंतर ज्या कक्षात दुर्घटना घडली त्याला सील करण्यात आलं.  समितीतील सर्व अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने अतिदक्षता विभागाला सील ठोकलं.

  • 27 Aug 2026 03:51 PM (IST)

    पुणे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशारा

    पुण्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. मात्र, अद्याप शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देत पुणे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत शासनाने मागण्यांवर निर्णय घेतला नाही, तर महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.

  • 27 Aug 2026 03:47 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेचा बुलडोझर

    छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेचा बुलडोझर

    1 हजार 390 बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेची धडक कारवाई

    वक्फ बोर्डाची 12 एकर जमीन विक्री होण्यापासून वाचवली

    जमिनीवर 380 बेकायदा प्लॉट, विक्री सुरू असल्याचा प्रकार उघड

    सातारा, बीड बायपास, पडेगाव, मिटमिटा परिसरात कारवाई

    पडेगावमध्ये अनधिकृत प्लॉटिंगप्रकरणी 10 जणांवर गुन्हा

  • 27 Aug 2026 03:30 PM (IST)

      नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रक पलटी

    नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रक पलटी

    ब्रेक फेल पॉईंट जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाला पलटी

    अपघातामध्ये दोन जण जखमी

    जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल

  • 27 Aug 2026 03:15 PM (IST)

    रक्षाबंधनानिमित्त नवी मुंबईच्या बाजारपेठा सजल्या

    रक्षाबंधन सणाला अवघा एक दिवस शिल्लक असताना नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील विविध बाजारपेठा आकर्षक राख्यांनी सजल्या असून, मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

  • 27 Aug 2026 02:56 PM (IST)

    कानपूर: विमान अपघातामुळे परिसरात घबराट, दोघांचा मृत्यू

    कानपूरच्या ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गंगा बॅरेजजवळ विमान कोसळल्याने सर्वत्र घबराट पसरली. घटनास्थळी मोठ्या संख्येने गावकरी जमा झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.

  • 27 Aug 2026 02:52 PM (IST)

    नेपाळ पूर: आतापर्यंत 270 मृतदेह सापडले: पोलिसांची माहिती

    बुधवारी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 270 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

  • 27 Aug 2026 02:45 PM (IST)

    पनवेलमध्ये साखर दरवाढीविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन

    सणासुदीच्या काळात साखरेचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीविरोधात पनवेलमध्ये मनसेने अनोखं आंदोलन केलं. मुंग्यांचे मुखवटे घालून महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. साखर आता मुंग्यानाही परवडत नाही, अशा आशयाचे बॅनर झळकावले.

  • 27 Aug 2026 02:38 PM (IST)

    नेपाळ-तिबेटमधील अचानक आलेल्या पुरात 175 जणांचा मृत्यू, 1500 जण अद्याप बेपत्ता

    नेपाळ आणि चीनच्या तिबेट सीमेवर 26  ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी महापुरात आतापर्यंत किमान 175 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, किमान 800 परदेशी नागरिकांसह सुमारे 1500 लोक अजूनही बेपत्ता आहेत.

  • 27 Aug 2026 02:33 PM (IST)

    निगडीत भूमिगत चेंबरमध्ये अडकून हिंगोलीच्या दोन कामगारांचा मृत्यू

    पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण भागातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ बीएसएनएलच्या (BSNL) भूमिगत चेंबरमध्ये अडकून गुदमरल्याने मनोज बाबुराव शिंदे (२६) आणि अमोल अशोक शिंदे (१९) या दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 27 Aug 2026 02:18 PM (IST)

    नेपाळ: साताऱ्यातील 10 महिला पर्यटक पोखरा येथे अडकल्या

    सातारा जिल्ह्यातील दहा महिला पर्यटक नेपाळमधील पोखरा येथे अडकल्या आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्वर शहरातील दहा महिला पोखरा येथे अडकल्या आहेत. त्या पर्यटनासाठी नेपाळला गेल्या होत्या. सध्या त्या पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. पूर परिस्थितीमुळे त्यांचा पुढील प्रवास थांबवण्यात आला आहे. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या महिलांशी संपर्क साधला आहे. विभागाच्या माहितीनुसार, सर्व महिला सुरक्षित आहेत.

  • 27 Aug 2026 02:07 PM (IST)

    नेपाळ पूर: महाराष्ट्रातील 88 पर्यटक अडकले

    आतापर्यंत, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील 88 पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याचे वृत्त आहे. यापैकी केवळ पुण्यातील चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला आहे, तर महाराष्ट्र सरकारला अद्याप 84 पर्यटकांशी संपर्क साधायचा आहे.

  • 27 Aug 2026 02:05 PM (IST)

    श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ड्रॉच्या दिशेने, सोनल दिनुशाने रडवलं

    भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून शेपटच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं. सोनल दिनुशाने पुन्हा भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. लंच ब्रेकनंतर 8 गडी गमवून 363 धावा केल्या. तसेच 150 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

  • 27 Aug 2026 01:55 PM (IST)

    पनवेलमध्ये साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला सेनेचं अनोखं आंदोलन

    साखरेच्या वाढत्या दराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मुंग्यांचे मुखवटे घालून प्रशासनाचं लक्ष वेधलं. मनसे महिला सेनेच्या पनवेल महानगराध्यक्ष स्वरूपा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मुंग्या साखरेकडे आकर्षित होतात, याच प्रतीकात्मक संदर्भातून “साखर महागली, आता मुंग्यांनाही साखर परवडत नाही” असा संदेश देत कार्यकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला. साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर आर्थिक भार वाढत असून, त्याचा परिणाम चहा, कॉफी, मिठाई, बेकरी पदार्थ तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर होत असल्याचं मनसे महिला सेनेनं सांगितलं.

  • 27 Aug 2026 01:40 PM (IST)

    “रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्या”

    रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्या, असं मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी किमान सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. विविध राज्यांतून आलेल्या चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावा. मराठीची अट तातडीने लागू करण्याऐवजी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ रिक्षा-टॅक्सी चालकांना विशेष सवलत आणि सुविधा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी मुंबई विभागाध्यक्ष मनिष दुबे यांनी निवेदन दिलं आहे.

  • 27 Aug 2026 01:30 PM (IST)

    कल्याण आधारवाडीतील आदिवासी पाड्याची महापौरांकडून पाहणी

    कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील आदिवासी पाड्याची महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. पाड्यातील वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी पसरलेल्या अस्वच्छतेवर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जाणार नाही, असा प्रशासनाला इशारा दिला आहे. “पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी सर्व समस्या मार्गी लावा,” असे कडक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

  • 27 Aug 2026 01:20 PM (IST)

    ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात धडक मोर्चा

    ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मनाई आदेश झुगारून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चा काढला आहे. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संखेने क्लस्टर कंपनीच्या विरोधात क्लस्टर कार्यालयावर ठाणेकर आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा निघला आहे.

  • 27 Aug 2026 01:10 PM (IST)

    धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा; गुंजोटीतील शेतकऱ्यांची मागणी

    धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.तसेच पीक विम्यामध्ये ‘ड्राय स्पेल’ अर्थात पावसाचा दीर्घ खंड हा निकष पुन्हा लागू करावा, जेणेकरून पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • 27 Aug 2026 12:50 PM (IST)

    रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात राखी बाजार सजला

    रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात राखी बाजार सजला आहे. फुलवाला चौकात राखी विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली आहे. राख्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत लगबग दिसत आहे.  यंदा राख्यांचे दर स्थिर; विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.  लहान मुलांसाठी कार्टून राख्यांना विशेष मागणी करण्यात येत आहे.  मोठ्यांसाठी मणी-मोत्यांच्या आकर्षक राख्यांना पसंती देली.

  • 27 Aug 2026 12:40 PM (IST)

    नालासोपाऱ्यात भर रस्त्यावर दोन तरुणांमध्ये हाणामारी

    नालासोपाऱ्यात दोन गटात किरकोळ वादातून भर रस्त्यात बेदम मारामारी झाली. नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव तलाव परिसरात सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. युवकांच्या दोन गटांत प्रथम बाचाबाची आणि त्यानंतर. एकमेकांना बेदम मारामारीत रूपांतर झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा घटनांमुळे परिसरात पोलिसांची भीतीच शिल्लक राहिली का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 27 Aug 2026 12:25 PM (IST)

    धाराशिवमध्ये पक्षांतरानंतर राजकारण तापलं!

    नगरसेवकांच्या घरासमोर संतप्त बॅनर; “आमचे मत आम्हाला परत द्या”  असं म्हणत मतदारांनी निषेध केलाा. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिव शहरातील समता कॉलनीमध्ये ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले आहेत. पक्षांतराचा निषेध करत या बॅनरमधून मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. “आमचे मत आम्हाला परत द्या”, “एक खोका, मतदाराला धोका”, “हा शिक्का पुसला जाणार नाही”, “एक कोटीचा गद्दार” अशा आशयाचे आरोप करणारे मजकूर बॅनरवर झळकत आहेत. नगरसेवक संतोष घाडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातच अशा प्रकारचे बॅनर लागल्याने पक्षांतराच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे.

  • 27 Aug 2026 12:10 PM (IST)

    नितेश कराळे यांना पोलिसांंनी घेतल ताब्यात

    नितेश कराळे यांना पोलिसांंनी ताब्यात घेतलं आहे. एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची नितेश कराळे यांच्या विरोधात तक्रार होती. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 27 Aug 2026 12:10 PM (IST)

    महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकलेत – गिरीश महाजन

    महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकलेत. मानसरोवरला महाराष्ट्रातून पर्यटक गेले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र सरकारसोबत आमचा संपर्क सुरु आहे. केंद्र सरकार सातत्याने नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे…राज्यातून गेलेले काही पर्यटक सुरक्षित आहेत.. असं वक्तव्य गिरिश महाजन यांनी केलं आहे.

  • 27 Aug 2026 12:03 PM (IST)

    मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील प्रशासनाची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्रं आणि वैधतेच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्री विखे पाटील यांच्या ऑनलाइन उपस्थितीत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडणार आहे. बैठकीमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आपल्याकडील अद्ययावत माहितीसह ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 27 Aug 2026 12:00 PM (IST)

    ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये तब्बल ४५ टक्के पावसाची तूट

    नंदुरबार जिल्ह्यात पावसाची तूट वाढत चालली असून, ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल ४५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी २९२ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ १६० मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे.
    पावसाने ओढ दिल्याचा थेट परिणाम आता शेतीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकांची वाढ खुंटण्यासोबतच पाणीसाठ्यांवरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला असला, तरी तो तूट भरून काढण्यासाठी पुरेसा ठरलेला नाही.
    दरम्यान, सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात पावसाची तूट भरून निघते का आणि खरीप पिकांना त्याचा कितपत फायदा होतो, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

  • 27 Aug 2026 11:50 AM (IST)

    एमपीएससीबाबत अनेक तक्रारी- विजय वडेट्टीवार

    एमपीएससीबाबत अनेक तक्रारी येत आहे. वादग्रस्त त्यांची कारकीर्द राहिला आहे. क्लास 01–पासून सर्व जबादारी ह्यांच्यावर आहे. मला वाटत आता ऑनलाईन परिक्षा नव्हात ऑफलाई झाली पाहिजे. क्लास फॉरची पदे ही जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी. एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज आहे. नाहीतर ह्या पेपरलिंकच्या घटना वाढतली, आणि तरुणाचा उद्रेक होणार ह्यांचा स्फोट होईल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • 27 Aug 2026 11:40 AM (IST)

    भादवन गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

    नाशिक जिल्ह्यातील कळवणमधील भादवन गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात आला. बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास सोडला. परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याने खळबळ उडाली होती. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या कारवाईनंतर ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांची भीती अखेर दूर झाली.

  • 27 Aug 2026 11:30 AM (IST)

    मिरजेत नशेखोरांचा धुडगूस

    सांगलीत नशामुक्ती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिरजेत नशेखोरांनी एसटी कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला केल्याने नशेखोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरजेत जालना येथे जाणारी एसटी बस अडवून अब्दुल्ला पटेल आणि सैफुल्ला पटेल यांनी चालक व वाहकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी कोंडीबा सरगर आणि घुबडे यांनी तत्परता दाखवत हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांवरही चाकूहल्ला केला. यात कोंडीबा सरगर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी रुग्णालयात जाऊन कोंडीबा सरगर यांची भेट घेतली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, धाडसी पोलीस कर्मचारी कोंडीबा सरगर आणि घुबडे यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

  • 27 Aug 2026 11:20 AM (IST)

    धुळ्यात राखी बाजार सजला

    रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात राखी बाजार सजला. फुलवाला चौकात राखी विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली. राख्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत लगबग दिसली. यंदा राख्यांचे दर स्थिर आहेत. विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून राख्यांना विशेष मागणी होत आहे. मोठ्यांसाठी मणी-मोत्यांच्या आकर्षक राख्यांना पसंती देण्यात येत आहे. रक्षाबंधनासाठी बहिणींकडून राखी खरेदीची लगबग सुरू आहे.

  • 27 Aug 2026 11:10 AM (IST)

    मोहन भागवतांना राऊतांचे आवाहन

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारी संस्था नाही किंवा सरकार उपक्रम नाही त्यानंतर आता कोणी म्हणत एनजीओ आहे अमुक आहे अमुक आहे पण ती एक या देशातली एक जुनी संस्था आहे संघटना आहे त्यांची एक विचारधारा आहे या देशात भारतीय जशी लोकशाही आहे तशी अमेरिकेत सुद्धा एक मजबूत लोकशाही आहे अमेरिकेमध्ये अद्याप भारतात जरी नसल्या तरी अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम आहे आणि विविध देशातले लोक अनेक विचारांचे लोक तिथे जाऊन आपल्या भूमिका मांडत असतात अमेरिकेत मोठे व्यासपीठ आहे.
    सरसंघचालक मोहन भागवत यांना तिथे कोणी निमंत्रित केलं असेल आणि तो सरकारी कार्यक्रम नसेल ट्रम्प तर बोलवणार नाही किंवा व्हाईस प्रेसिडेंट बोलवणार नाही तिथले संघाचे लोक आहेत त्याची ओव्हरसीज ब्रांच आहे त्यांनी निमंत्रित केला असेल तर मला वाटतं जागतिक लोकशाहीमध्ये व्यासपीठावरती सरसंघचालक भारतामधला हुकूमशाही विषयी काय भूमिका मांडतील या भारतामध्ये काय राजकारण सुरू आहे आणि ज्यात भारतीय जनता पक्षाचा उल्लेख वारंवार केला जातो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशांमध्ये जो सरकार पुरस्कृत दहशत निर्माण केला त्या संदर्भात निदान परदेशात जाऊन तरी मोहनराव भागवत यांनी आपले भूमिका मांडावी असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

  • 27 Aug 2026 11:00 AM (IST)

    वरळीत नारळी पोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन

    वरळीत नारळी पोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन दिसून आले. नारळ फोडाफोडीच्या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हजर राहण्याची शक्यता आहे. आज स्थानिक आमदार अदित्य ठाकरे यांचाही वरळी कोळीवाडा इथे कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आली. दोन्ही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे.

  • 27 Aug 2026 10:50 AM (IST)

    पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर सॉरी मेसेज करत तरुणाची आत्महत्या

    नाशिकच्या पंचवटी येथील समर्थ नगरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाने नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये उडी मारत आत्महत्या केली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. शुभम पवार असे मृत तरुणाचे नाव

  • 27 Aug 2026 10:40 AM (IST)

    केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपीला तुरुंगात VIP ट्रीटमेंट

    केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला जेलमध्ये व्ही.आय.पी. ट्रीटमेंट मिळतं असल्याचा रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचा आरोप आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा वेळेत तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपीच्या व्ही.आय.पी. ट्रीटमेंटच्या चौकशीची केली मागणी करण्यात आली आहे.

  • 27 Aug 2026 10:30 AM (IST)

    धाराशिवमध्ये पक्षांतरानंतर राजकारण तापलं, नगरसेवकांच्या घरासमोर संतप्त बॅनर

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिव शहरातील समता कॉलनीमध्ये ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले आहेत. पक्षांतराचा निषेध करत या बॅनरमधून मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

  • 27 Aug 2026 10:20 AM (IST)

    मुख्य रस्ता नसल्यामुळे बांबूच्या झोळीतून रुग्ण रुग्णालयात

    तळोदा तालुक्यातील पाल्हाबार गावात रस्ता नसल्याने ४६ वर्षीय दारक्या वेस्ता वळवी या रुग्णाला बांबूच्या झोळीतून तब्बल ५ किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आलं. मात्र, मुख्य रस्त्यावर पोहोचल्यानंतरही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अखेर खाजगी वाहनातून रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • 27 Aug 2026 10:10 AM (IST)

    झोक्याचा फास लागून दीडवर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

    जळगावच्या नशिराबादमध्ये झोक्याचा फास लागून दीडवर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सार्थक योगेश बऱ्हाटे असे दीड वर्षीय मयत बालकाचे नाव आहे. नशिराबाद येथील राजर्षी छत्रपती शिवाजीनगर नवीन प्लॉट भागात ही घटना घडली आहे.

  • 27 Aug 2026 09:59 AM (IST)

    मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाहूर ते भांडुप स्थानकादरम्यान लोकल थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना सकाळच्या सुमारास कार्यालयावर जाण्यासाठी लेटमार्कचा फटका बसणार आहे.

  • 27 Aug 2026 09:51 AM (IST)

    परभणीत ईद ए मिलाद जुलूसदरम्यान तरुणांची हुल्लडबाजी

    परभणीत ईद ए मिलाद जुलूसदरम्यान कारच्या टपावर बसून तरुणांनी हुल्लडबाजी केली. धावत्या कारच्या बोनटवर बसून हातात झेंडे फडकवत शहरातील रस्त्यांवर तरुणांची घोषणाबाजी केली. या व्हायरल व्हिडिओनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या, तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  • 27 Aug 2026 09:49 AM (IST)

    जळगाव जिल्हा हादरला, कुटुंबातील सदस्यांची सामूहिक आत्महत्या

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे पती-पत्नीची दोन मुलींसकट रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. या घटनेत पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.  सुनील अमृत भिल, पार्वती सुनील भिल अशी मयत पती-पत्नीची तर ७ वर्षीय सनी आणि ४ वर्षीय राज अशी मयत मुलांची नावे आहेत.  आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमळनेर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने अमळनेर सह जळगाव जिल्हा हादरला आहे.

  • 27 Aug 2026 09:38 AM (IST)

    अमित ठाकरे आज नागपुरात; विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात पोहोचणार आहेत. ते नागपुरात विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच नागपुरात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही सुरुवात करणार आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ते संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळळ्याला मळ्यार्पण करतील.  त्यानंतर शहरातील सिंधू महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालय आणि एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या भेटीगेटी आणि विद्यार्थी केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत.

  • 27 Aug 2026 09:26 AM (IST)

    विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची विक्री; FDA कडून मोठी कारवाई

    अन्न व औषध प्रशासन विभागाने अमळनेर आणि जळगाव शहरात कारवाई केली आहे. विभागाने १ लाख ६ हजार ३२५ रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  विनापरवाना उत्पादित सौंदर्यप्रसाधनांची विक्री होत असल्याने पथकाने कारवाई केली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या क्रीम, पावडर, जेल स्वरूपातील सौंदर्यप्रसाधनांसह पॅकिंग मटेरियलचा समावेश आहे. सौंदर्यप्रसाधनांची गुणवत्ता तपासणी न करता त्यांची विक्री केली जात असल्याचेही आढळून आले.

  • 27 Aug 2026 09:16 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये 2 कामगारांचा मृत्यू

    पिंपरी चिंचवड शहरात मॅनहोल क्लीन करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल शिंदे वय 20 वर्ष आणि मनोज शिंदे वय 26 वर्ष असे मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.  जवळपास एक वर्षांपूर्वी याच मॅनहोलमध्ये गुदमुरून बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

  • 27 Aug 2026 09:07 AM (IST)

    शिवसेनेच्या मंत्र्यांवर एकनाथ शिंदे ठेवणार लक्ष

    शिवसेनेच्या मंत्र्यांवर एकनाथ शिंदे लक्ष ठेवणार आहेत.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें दर आठवड्याला कॅबिनेटपूर्वी मंत्र्यांच्या विविध विभागाच्या कामाचा आढावा घेणार आहे. शिंदेंच्या बैठकीत संबंधित मंत्र्यांसह विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.  या बैठकीत सर्व मंत्र्यांना प्रगतीपुस्तक सादर करावे लागणार आहे.  प्रलंबित प्रश्न, निर्णयांची अंमलबजावणी आणि आगामी कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.  शिंदेंनी शिक्षण विभागानंतर आरोग्य विभागाचीही बैठक घेतली.

  • 27 Aug 2026 09:00 AM (IST)

    आगामी कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीकाठच्या विविध भागात १८ घाटांची व्यवस्था प्रस्तावित

    आगामी कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीकाठच्या विविध भागात १८ घाटांची व्यवस्था प्रस्तावित. कुंभमेळ्याच्या काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नियोजन. पर्वणीच्या मुख्य दिवशी अवघ्या २० मिनिटांत तब्बल १ लाख ३४ हजार भाविकांना स्नानाचा लाभ मिळेल, अशी व्यवस्था. गोदावरी काठावरील १८ घाटांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५४ हजार चौरस मीटर असणार आहे. प्रत्येक घाटाची क्षमता, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ठराविक वेळेत भाविकांना बाहेर काढण्याचे नियोजन. घाटावर २० मिनिटांची कालावधी गृहीत धरून भाविकांची क्षमता निश्चित. गांधी तलाव घाट, सीता कुंड, राम कुंड, लक्ष्मण कुंड, नीलकंठेश्वर घाट, रोकडोबा मैदान घाट, टाकळीकेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, कपिला संगम घाट, टाकळी संगम घाट, नांदूर घाट, दसक घाट यांसह प्रस्तावित घाटांवर स्नानाची व्यवस्था. नियोजनात गांधी तलाव, सीता कुंड, राम कुंड आणि लक्ष्मण कुंड यांचा स्वतंत्र उल्लेख. कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने घाट व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन

  • 27 Aug 2026 08:55 AM (IST)

    पोटात कापूस राहिलेल्या महिलेची खासदार बजरंग सोनवणे यांनी पुण्यात जाऊन घेतली भेट

    बीड जिल्हा रुग्णालयात सीझेरियनदरम्यान पोटात कापूस राहिल्याने वडवणीच्या संध्या गायकवाड यांची प्रकृती गंभीर झाली होती, त्यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी ससून रुग्णालयात जाऊन संध्या गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सोनवणेंनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून पीडित महिलांवर तातडीने योग्य उपचार आणि विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.

  • 27 Aug 2026 08:50 AM (IST)

    महाराष्ट्रात मित्र पक्षांना सोबतच ठेवायचं, दूजाभाव नको- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रात मित्र पक्षांना सोबतच ठेवायचं, दूजाभाव नको , नीधी वाटपात भेदभाव नको , समन्वय योग्य ठेवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश – खात्रीलायक सुत्रांची माहीती दिल्लीतील झेन जी आंदोलनानंतर राज्यातही पुर्ण बहूमताचं सरकार असलं तरी देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता जास्त…त्यामुळे मित्र पक्षांना सोबतच ठेवायचं, २०२९ त्या.तयारीलै आत्तापासूनच लागा आणि सर्व झेन जी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे महायुती सरकारला दिशा निर्देश. याबाबतची महत्वाची बैठक लवकरच दिल्लीत होणार असल्याची सुत्रांची माहीती

  • 27 Aug 2026 08:46 AM (IST)

    मृत भाचीची बदनामी का करतो? अस म्हणत जालन्यात 24 वर्षीय तरुणाची हत्या

    :माझ्या मृत भाचीची बदनामी का करतो? असा जाब विचारत जालना शहरातल्या नागेवाडी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे, निखिल पवार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून चार जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, घटना घडल्यानंतरच एका तासातच पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतला असून उर्वरित आरोपींचा देखील पथकामार्फत शोध घेतला जात आहे.

  • 27 Aug 2026 08:43 AM (IST)

    पिंपरी चिंचवड मधील मॅन होम क्लीन करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

    पिंपरी चिंचवड शहरातील निगडी मधील मॅन होम क्लीन करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू. अमोल शिंदे आणि मनोज शिंदे असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव. जवळपास एक वर्षांपूर्वी याच मॅन हॉलमध्ये देखील बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मॅन होल क्लीन करत असताना देखील झाला होता दुर्दैवी मृत्यू. एकाच मॅन हॉलमध्ये दोन दुर्घटनेत आतापर्यंत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू. मात्र असवेदनशील प्रशासन अजून किती कामगारांचा बळी घेणार असे प्रश्न या निमित्ताने पुन्हा झाले उपस्थित.

  • 27 Aug 2026 08:40 AM (IST)

    अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर आणि जळगाव शहरात कारवाई

    अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर आणि जळगाव शहरात कारवाई. १ लाख ६ हजार ३२५ रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा मुद्देमाल जप्त.. विनापरवाना उत्पादित सौंदर्यप्रसाधनांची विक्री होत असल्याने पथकाची कारवाई.. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या क्रीम, पावडर, जेल स्वरूपातील सौंदर्यप्रसाधनांसह पॅकिंग मटेरियलचा समावेश आहे. सौंदर्यप्रसाधनांची गुणवत्ता तपासणी न करता त्यांची विक्री केली जात असल्याचेही आढळून आले.सौंदर्यप्रसाधनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असूनअहवालानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे

  • 27 Aug 2026 08:36 AM (IST)

    नेपाळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    नेपाळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे. कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यास विशेष लिंकवर तातडीने माहिती नोंदवण्याचे धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन. नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक द्यावा. आपत्कालीन संपर्क : 02472-225618 / 224366. टोल फ्री : 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.

  • 27 Aug 2026 08:35 AM (IST)

    यवतमाळमधून धक्कादायक बातमी समोर

    यवतमाळ बाभूळगाव तालुक्यातील सरूळ येथे बापाने केली दिव्यांग मुलाची हत्या केली आहे.  निराधार योजनेतील मिळालेले पैसे व्यसनासाठी न दिल्याने हत्या केल्याची माहिती. मृतकाच्या आईने दिली पोलिसात तक्रार. अरविंद भीमराव मेश्राम मृतकाचे नाव तर भीमराव मेश्राम हे आरोपीचे नाव आहे.

  • 27 Aug 2026 08:34 AM (IST)

    गुरुवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकाजवळून दूचाकी चोरी

    गुरुवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकाजवळून दूचाकी चोरी झाली आहे. दुचाकी चोरी करताना चोरटा CCTV मध्ये कैद झाली आहे.  पुण्यातील गुरुवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकाजवळून दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, दूचाकी घेऊन जाणारा संशयित CCTV कॅमेरात कैद झाला आहे. चोरीला गेलेली दूचाकी लाल रंगाची Honda Unicor असून तिचा क्रमांक MH 12 FT 9873 असा आहे. परिसरातील CCTV फ़ुटेजमध्ये संशयित दृूचाकी घेऊन जाताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नेपाळमध्ये भीषण पूर आला आहे. या पूरामध्ये आतापर्यंत १६० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. यात ७५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, परंतु मृतांचा आकडा वाढतच आहे. भारतातील किमान १३० लोक बेपत्ता आहेत, त्यापैकी बहुतेक जण मानसरोवर यात्रेवर होते. देशात साखरेचे भाव गगनाला भिडले असून आता यासाठी सरकारकडून मोठे पाऊलही उचलण्यात आले आहे. अभिजीत दिपके यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. ते आता सरकारविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत दिसत आहे. अभिजीत दिपके पाच सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. काल आणि आज ते नागपूर दौऱ्यावर असणार आहे. यासह राज्यातील, देशविदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us