Maharashtra News LIVE : अंतरावालीत या, मराठ्यांच्या लेकरांसाठी उभं राहा – मनोज जरांगे

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच आजपासून अंतरवाली सराटीमध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळावरच उपोषण सुरू करतील. जरांगे पाटलांच्या शेवटच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली गावात दाखल झाले आहेत.

Maharashtra News LIVE : अंतरावालीत या, मराठ्यांच्या लेकरांसाठी उभं राहा - मनोज जरांगे
Manoj jarange patil
| Edited By: | Updated on: Aug 29, 2026 | 10:32 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Aug 2026 10:30 AM (IST)

    अंतरावालीत या, मराठ्यांच्या लेकरांसाठी उभं राहा – मनोज जरांगे

    मनोज जरांगे यांनी अंतरावाली सराटीत अखेर उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून मराठ्यांसाठी लढत आहे. सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटीत यावं. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. अंतरावालीत या, मराठ्यांच्या लेकरांसाठी उभं राहा, अशी हाक जरांगे यांनी मराठा बांधवांना दिली.

  • 29 Aug 2026 10:21 AM (IST)

    हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

    हिंगोली- पोलीस उपनिरीक्षकाची रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली.  अमोल गंगलवाड असं पोलीस उप निरीक्षकांचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी त्यांची बदली केली होती. वर्दीवर असताना आत्महत्या केल्याने पोलील वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


  • 29 Aug 2026 10:11 AM (IST)

    गुणरत्न सदावर्ते यांच्या आरोपाने शिंदेंच्या सेनेत नाराजी?

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे असल्याचा आरोप वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिल.  मराठा समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे , यामागे नेमकं कोण आहे, अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे. याविषयी पक्षाकडून लवकरच  अधिकृत भूमिका मंत्री मांडणार आहेत.

  • 29 Aug 2026 10:08 AM (IST)

    मनोज जरांगे यांचंं आमरण उपोषण सुरू

    मनोज जरांगे यांचंं आमरण उपोषण सुरू झालं आहे. मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी पोहोचले आहेत. उपोषण स्थळी मोठ्या संख्येने आंदोलक पोहोचले आहेत. त्यांच्या हातात मागमीचे पोस्टर आहेत. आता थोड्याच वेळात मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

  • 29 Aug 2026 10:05 AM (IST)

    आंदोलनात तोडगा काढण्यात आदिवासी विकास विभागला यश

    आंदोलनात तोडगा काढण्यात आदिवासी विकास विभागला यश आलं आङे.  विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवून विद्यार्थी अमरावतीकडे परत जाणार आहेत.  1 सप्टेंबरला मुंबई येथे बैठक घेण्याचं विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं.


  • 29 Aug 2026 09:46 AM (IST)

    मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांचा बी प्लॅन तयार

    अंतरवाली सराटी येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सरकारकडे गुणरत्न सदावर्ते यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांचा बी प्लॅन तयार असल्याचा दावा काळकुटे यांनी केला आहे.

  • 29 Aug 2026 09:38 AM (IST)

    लोकांनी मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेणं सोडलय – संजय राऊत

    मुख्यमंत्री फडणवीस भ्रष्टाचाराला समर्थन देतायत. नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकलाय. लोकांनी मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेणं सोडलय असा दावा संजय राऊत यांनी केला.

  • 29 Aug 2026 09:31 AM (IST)

    सरकारने मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये

    सरकारने मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये, आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. समाज बांधवांनी विश्वास व्यक्त केला. अंतरवाली सराटी गावात मराठा समाज बांधव दाखल.

  • 29 Aug 2026 09:30 AM (IST)

    जरांगे पाटील यांचं आजपासून अंतरवाली सराटी मध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन

    मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून अंतरवाली सराटी मध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू होणार. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळावर उपोषण सुरू करतील. जरांगे पाटलांच्या शेवटच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली गावात दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. 58 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी तातडीने करावी ही त्यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर मध्ये काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं होतं. खरंतर जात वैधता प्रमाणपत्र काढण्याच्या संदर्भात गेल्या आठ महिन्यांपासून सोनवणे कुटुंब जात पडताळणी समितीकडे चकरा मारत आहे. मात्र कागदपत्राची पूर्तता करूनही जात प्रमाणपत्र निघत नसल्याने सोनवणे कुटुंब काल पाण्याच्या टाकीवर चढून संतापल्याचं पहायला मिळालेलं होतं. मात्र जरांगे पाटील यांनी फोन द्वारे संवाद साधून त्यांना अंतरवलीत येण्याचा आवाहन केलं होतं. त्यामुळे ते थेट आता आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे.

Follow Us