Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम, 11 सप्टेंबरपर्यंत मुदत
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंतरवाली सराटीत भेट घेतली. त्यावेळी सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी 11 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत ते उपोषणावर ठाम आहेत. राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का
भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे यांचा शिवसेनेत प्रवेश असल्याची राजकीय वर्तुळा चर्चा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी व माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई करण्यात आला पक्षप्रवेश
-
घटनेने परिसरात हळहळ व्यक्त, त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून तपास सुरू
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
काल संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर केली आत्महत्या. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त. त्र्यंबकेश्वर पोलीस घटनाप्रकरणी अधिक तपास करत आहेत -
-
मावळात खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणार्थी तरुणीवर अत्याचार;
वडगाव मावळ येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचा चालक व प्रशिक्षक राजू माडगी याला पोलिसांनी अटक केली आहे. मावळ न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पीडितेच्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीवर अत्याचारासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वयेही कलम वाढवण्यात आले आहे. पुढील तपास लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे करीत आहेत…
-
वाकडमध्ये महागड्या वस्तू चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश
वाकड पोलिसांच्या तपास पथकाने स्टार बाजारमधून महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या चार महिला आणि तीन पुरुष अशा सात जणांच्या टोळीला अटक केली आहे.ह्या टोळीमधील चोर चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमरात कैद झाले आहेत, आरोपींकडून इनोव्हा कारसह सुमारे ६ लाख २९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपींनी वाकडसह पिंपरी आणि चिखली परिसरातील स्टार बाजारमधून तूप, बदाम, काजू आणि इतर महागड्या खाद्यपदार्थांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
-
मीरा भाईंदर मध्ये पर्युषण काळात 8 दिवस मांसविक्री बंद ठेवा
जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मांसविक्रीची दुकाने आठ दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवकाची प्रशासनाकडे मागणी केली आहे. भाजप नगरसेवक भरत कोठारी यांनी आयुक्तांकडे आणि महापौरांकडे मागणी केली. जैन समाजाच्या धार्मिक भावना, अहिंसेचा संदेश आणि जीवदयेची भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याची मागणी केली आहे. सरकारी आदेशानुसार पर्युषण काळात केवळ दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याची तरतूद आहे. मात्र भाजपकडून 8 ते 16 सप्टेंबर आठ दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचा आग्रह करण्यात आला आहे. यामुळे मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
-
-
हिंगोली तालुका व शहर आणी औंढा नागनाथ बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. दुपारी 01 वाजता नांदेड /जिंतूर महामार्गावर वसमत तालुक्यातील कौठा टी पॉइंटवर रास्ता रोको तर तिकडे हट्टा शिवारात ही रास्ता रोको चे आव्हान करण्यात आले आहे.
-
सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोलापूर ग्रामीण जिल्हा बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाजाने सोलापूर ग्रामीण जिल्हा बंदची हाक दिली.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोलापूर जिल्हा बंदची घोषणा करण्यात आली. आज सोलापूर शहर वगळता ग्रामीण भागात बंद पाळण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी जिल्हा बंदमध्ये सहभागी होण्याचे सकल मराठा समाजाचे आवाहन आहे. -
मनोज जरांगे यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस
राज्य सरकार समोर ठेवलेल्या मागण्यांचा शासन निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी नसल्याने जरांगे अजूनही उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे काल अंतरवाली सराटीतली सरकारच्या शिष्ट मंडळाची भेट आणि चर्चा निष्फळ ठरली का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान सरकारकडून जरांगे पाटलांना शासन निर्णय आणि अंमलबजावणी देण्यात येते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
-
धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाल्याचे समोर आले आहे. मोबाईल हॅक झाल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून ६२ हजार रुपयांची मागणी केली. मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार खासदार बच्छाव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली. बच्छाव यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवरून ६२ हजार रुपये पाठविण्याची मागणी केली. “माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन” असे मेसेज अनेकांना पाठवले.
-
सोलापुरात जिल्ह्यात गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे डॉल्बी सिस्टीमसह लेझर लाईटवर बंदी
सोलापूर शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच 13 ते 26 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात डीजे प्रतिबंध लागू झाल्याचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी हे आदेश दिले. तर नियम तोडून डीजे वाजवल्यास थेट डीजे मालकांवर कारवाई करण्याचा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी इशारा दिला.
-
नाशिकमधून जायकवाडीकडे आतापर्यंत ५७ टीएमसी पाण्याचा विसर्ग
नाशिकमधून जायकवाडीकडे आतापर्यंत ५७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १ जून २०२६ पासून आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६ लाख ५८ हजार ३६१ क्युसेक्स पाणी वाहून गेले. म्हणजेच आतापर्यंत ५६.९० टीएमसी पाणी नाशिक मधून जायकवाडी धरणाकडे विसर्ग झाला आहे. धरणांमध्ये आवक वाढल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून हे पाणी पुढे गोदावरी नदीमार्गे जायकवाडीच्या दिशेने गेले. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातून होणारा हा पाण्याचा प्रवाह महत्त्वाचा मानला जातो. आगामी काळातील पाऊस, धरणांमधील आवक आणि पाणीसाठ्यानुसार विसर्गात बदल होण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 6 व्या दिवशी सरकारचे शिष्टमंडळाने काल त्यांची भेट घेतली. आंतरवाली सराटीत सरकारी शिष्टमंडळाने त्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची आणि होणाऱ्या अंमलबजावणीची माहिती दिली. पण शिष्टमंडळासमोरील चर्चा निष्फळ ठरली. जरांगे पाटील यांनी 11 सप्टेंबरपर्यंत सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदत दिली. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले. तर तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच मुंबईत दाखल होण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आता दहिहंडीचे वेध लागले आहेत. गोपालकाल आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचं आकर्षण सर्वांना लागलं आहे. गोकुळाष्टमीचा उत्साह देशभर दिसून येत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात दहिहंडीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तर राज्यातील अनेक भागात ढगांनी गर्दी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसात काही भागात तुरळक तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अभिजीत दिपेक यांच्या पक्षातच मनीष ब्रह्मभट या सदस्याने वेगळी चूल मांडली आहे. तर डीजेला विरोध करणाऱे विद्यानंद बापट यांना काल मारहाण करण्यात आली होती. रविवारी पुण्यातील अनेक नागरिक या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आणि डीजेवर बंदी घालण्यासाठी रविवारी मोर्चा काढणार आहे. दरम्यान डीजेवर बंदी घालावी या मागणीसाठी रानडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. नेपाळमध्ये महापूरामध्ये बचाव आणि शोध कार्याला वेग आला आहे. नेपाळने भारत, चीनसह अमेरिकेकडे नुकसान भरपाई मागितली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एशियन हॉस्पिटलच्या शिशू अतिदक्षता विभागाला मध्यरात्री अचानक आग लागली. पण सर्वांच्या प्रसंगावधानाने सर्वांचा जीव वाचला आहे.