Maharashtra Live News : गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या तृतीयपंथ्यांवर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live News : गणपती विसर्जनानंतर अनेक मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अश्लील नृत्य करणाऱ्यांवर तृतीयपंथ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर दुसरीकडे गणेश मंडळांना आवाजाचा दणदणात भोवला आहे. 37 मंडळात विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

LIVE NEWS & UPDATES
-
रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट
तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव सुना सुना” असल्याचं म्हटलं.अजित पवारांसाठीचा आपला लढा थांबलेला नसल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाबाबत देशपातळीवर आणि राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या १० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन काही ‘मफलरीं’चे खुलासे करणार असल्याचं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं.
-
वागळे इस्टेटमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हिंदी अभिनेत्रीला अटक
ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मोठी कारवाई. वागळे इस्टेट परिसरातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोलिसांचा सापळा. हिंदी वेबसिरीज आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीला अटक. पोलिसांच्या कारवाईत दोन महिलांची सुटका. अभिनेत्रीने तब्बल १० वेबसिरीज आणि ३ भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केल्याची माहिती. महिला व मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणणार असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती
-
-
कुंभमेळ्याची बदनामी करणाऱ्यांविरोधात देशव्यापी जनजागृतीची संत-महंतांची मागणी
नातन धर्माच्या विकासासाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय ‘ज्ञानकुंभा’चा उत्साहात समारोप… जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह महाराष्ट्रातील संत-महंतांची ज्ञानकुंभाला उपस्थिती दर्शवली. धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि कुंभमेळ्याचे वैभव जपण्यासाठी व्यासपीठावरून मंथन केलं. कुंभमेळ्याचे महत्त्व देशभर पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. गोदावरी, नर्मदा, यमुना आणि सरस्वतीचा संगम पुण्यतीर्थ; नाशिक तीर्थक्षेत्राला दंडक जनक रामतीर्थ म्हणून महत्त्व असल्याचा संतांचा दावा… कुंभमेळ्याबाबत सकारात्मक विचार देशभर रुजवण्यासाठी ज्ञानकुंभाचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.लसंत-महंतांनी एकत्र येत कुंभमेळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे.
-
उल्हासनगरहून पुण्याला निघालेल्या आईच्या डोळ्यांसमोर 3 वर्षीय मुलाला फिट
मुंबई–पुणे 22105 इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी सकाळी थरारक घटना घडली. उल्हासनगरच्या प्रतिभा नागनाथ फुंदे या 3 वर्षीय मुलगा यश आणि भावासह पुणे जिल्ह्यातील पाथर्डीकडे निघाल्या होत्या. कर्जत स्थानक सुटल्यानंतर काही मिनिटांतच 102 अंश तापामुळे यशला फिट आली आणि तो बेशुद्ध पडला. आई आणि नातेवाईक घाबरले असताना डब्यातील प्रवासी मदतीसाठी पुढे सरसावले अशात परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रक्षा सामाजिक संस्थेचे भूषण हजारे यांनी गुंडगेजवळ आपत्कालीन चैन ओढून एक्सप्रेस थांबवली. रेल्वे थांबताच राहुल गुप्ता यांच्या मदतीने चिमुकल्याला तातडीने कर्जतमधील डॉ. जैन यांच्या बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नगरसेवक महेंद्र चंदने यांनीही डॉक्टरांशी संपर्क साधून उपचाराची पूर्वतयारी केली. वेळेत उपचार मिळाल्याने यशची प्रकृती स्थिर झाली; दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि एका चिमुकल्याचा जीव वाचला.
-
चंद्रपुरात ओव्हरलोड वाळू हायवावर महसूल प्रशासनाने धडक कारवाई
चंद्रपूर मुख्यालय ते मूल या मार्गावर रात्रभर चाललेल्या कारवाईने नियमभंग करणाऱ्या वाळू वाहतूकदारांना धडकी भरली आहे. कारवाईत विविध जिल्ह्यातील 12 हायवा जप्त करण्यात आले आहे. सुमारे 1 कोटी रु चा मुद्देमाल जप्त, करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक चमुच्या मदतीने दंडाचे मूल्यमापन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात यामुळे जप्त केलेल्या हायवाची रांग लागली आहे.
-
-
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहकार्याला महसूल विभागाचा मोठा दणका
अंबड तालुक्यातल्या साष्ट पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातील 2012 अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे,मनोज जरांगे यांचे विश्वासू असलेले सहकारी संजय नानासाहेब कटारे यांच्या दहावीच्या कोटी 90 लाख 72 हजार दोनशे रुपयांचा दंडात्मक कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदाराचा सुधारित आदेश अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी रद्द करत हा मोठा दणका दिला आहे. त्यामुळे मूळ दंडात्मक आदेश पूर्ववत होऊन गट क्रमांक 265 वर हा बोजा कायम असणार आहे. स्वास्थ पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रात 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्या प्रकरणी 24 मार्च 2023 रोजी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या संयुक्त पथकाने पंचनामा केला होता. त्या आधारित तत्कालीन तहसीलदारांनी 18 जणांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश रद्द केल्याने जरांगेच्या सहकाऱ्याला मोठा दणका बसलाय…
-
गोंदिया : आमगावात धुक्याची चादर
गोंदिया येथील आमगावात धुक्याची चादर पसरली आहे. निसर्गाचा मनमोहक अविष्कार याठिकाणी पाहायला मिळत आहे. पहाटे आमगावकरांना थंड हवेच्या ठिकाणाचा फील अनुभवायला मिळाला आहे. नयनरम्य दृश्य अनेकांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
-
दुपदरीकरणाला वेग पाच वर्षांत कोकण रेल्वेवर शंभरहून अधिक गाड्या
मुंबई, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढविण्यासाठी दुपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात या मार्गावर दररोज १००हून अधिक गाड्या चालविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुपदरीकरणासाठी पेडणे आणि जुनेगोवे येथे नव्या बोगद्यांचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आवश्यक निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी पणजी येथे दिली.
-
विसर्जनानंतर २,७५४ टन मूर्ती साहित्याचे संकलन! पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचं पाऊल
मुंबई, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे संरक्षण आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत महापालिकेने विसर्जनोत्तर कचरा व मूर्ती साहित्याच्या व्यवस्थापनात मोठे यश मिळवले आहे. १६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबईत एकूण २,७५४.८५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे संकलन करून ७०७वाहनांच्या फेऱ्यांद्वारे ते सुरक्षितपणे तात्पुरत्या साठवणूक केंद्रात हलवण्यात आले आहे.
-
एसआरआयटी’चा आयपीओ आजपासून बाजारात
मुंबई आयटी आणि आयटीशी संबंधित विविध सेवा पुरवणाऱ्या एसआरआयटी इंडिया कंपनीचा आयपीओ २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. या आयपीओसाठी १२३ ते १३० रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्याच्या या शेअरच्या आयपीओमध्ये किमान ११५ शेअरसाठी गुंतवणूक करावी लागेल. हा आयपीओ २१८ कोटी ४० लाख रुपयांचा आहे. यामध्ये ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ३५ टक्के सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी, तर १५ टक्के बिगर संस्थात्मक बड्या गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. आयपीओतून उभारलेल्या रकमेतून कंपनीच्या व्यवस्थांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास केला जाणार आहे.
-
मलेरियाचे संकट गडद मुंबईतील रुग्णसंख्या नऊ हजारांवर; ४१ टक्क्यांनी वाढ
मुंबईत यंदा मलेरियाच्या रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत मुंबईत मलेरियाचे ९ हजार २९८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ६ हजार ५९० रुग्णांची नोंद झाली होती. त्यानुसार वर्षभरात रुग्णसंख्येत सुमारे ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत १७ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ५ हजार ६१८ रुग्णांना प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या प्रकारच्या मलेरियाची लागण झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्यांवर तृतीयपंथ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नेरपिंगळाई, सोनोरी येथे तृतीयपंथीयां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यंदा गुन्हा दाखल झालेल्या मंडळांना पुढील वर्षी परवानगी नाकारण्यात आली आहे. चांदुर बाजार तालुक्यातील सोनोरीत 10 जनासह 16 तृतीयपंथीयांसह एकूण 26 जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. अश्लील हावभाव व नृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर लागला आहे. गणेश मंडळांना आवाजाचा दणदणात भोवला आहे. 37 मंडळात विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक मंडळाकडून डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा लाईटचा सर्रास वापर झाला असून, डीजे आणि वाद्यांचा मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या मंडळांना पोलिसांनी दणका दाखवला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचा मोर्चाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ठाकरे गटाचा मोर्चा जाणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाची तात्काळ भरघोस नुकसान भरपाई कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा धडकणार आहे. मोर्चात खासदार अरविंद सावंत आमदार नितीन देशमुख सह ठाकरे गटाचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..