Maharashtra News LIVE : नाशिक, मुंबई आणि पुण्यात पावसाचा धुव्वाधार, मुसळधार पाऊस..

Maharashtra News LIVE : राज्यासह मुंबईत व उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून भुयारी मार्गात पाणी साचण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स, तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : नाशिक, मुंबई आणि पुण्यात पावसाचा धुव्वाधार, मुसळधार पाऊस..
| Edited By: | Updated on: Jul 04, 2026 | 10:31 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 04 Jul 2026 10:50 AM (IST)

    वाशिम शहरात अन्न सुरक्षा प्रशासनाची धडक कारवाई..

    शहरातील ३ हॉटेलांची तपासणी त्यापैकी साई ढाब्याचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित.. तर हॉटेल गणेश आणि हॉटेल चिंतामणी या दोन हॉटेल ला सुधारणा करण्याची नोटीस. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने केली कारवाई. स्वच्छ व सुरक्षित अन्नाबाबत प्रशासनाची कडक भूमिका. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा दिला इशारा…

  • 04 Jul 2026 10:40 AM (IST)

    जालना बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसचा समोरासमोर धडकून अपघात

    अंबड तालुक्यातील शहापूर येथे दोन एसटी बस चा अपघात अपघात घडल्याची घटना. एक बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती तर दुसरी बस काही प्रवाशांना घेऊन जात होती. प्रवासी आणि विद्यार्थी मिळून 30 ते 35 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर..

  • 04 Jul 2026 10:30 AM (IST)

    मुंबई उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम

    अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई मार्ग पुन्हा एकदा जलमय झाला आहे. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पावसाचा जोर थोडा कमी आहे, मात्र पाऊस वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. फक्त वीरा देसाई रोडच नाही, तर आजूबाजूच्या सोसायट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोसायटीपासून रस्त्यापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत आणि घराबाहेर पडू शकत नाहीत.

  • 04 Jul 2026 10:20 AM (IST)

    मुसळधार पावसाने पुजारीटोला धरण भरले

    गोंदिया जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे…. पाणीपातळी वाढल्याने पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडण्यात आले आहेत…. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे…. सलग चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे पुजारीटोला धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. यामुळे धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

  • 04 Jul 2026 10:06 AM (IST)

    नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

    सकाळपासून शहरात दमदार पावसाला सुरुवात. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना होती पावसाची प्रतीक्षा. शहरासह जिल्हा देखील काही भागात दमदार पावसाला सुरुवात

  • 04 Jul 2026 09:47 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात

    छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली.  सकाळपासून जिल्ह्यात सर्व दूर पाऊस असून आता पेरणीच्या कामाला वेग येणार.

    जिल्ह्यात तीन जुलै पर्यंत केवळ 33% पेरण्यांची काम पूर्ण झाली आहेत.  जुलै महिन्यापर्यंत सरासरीच्या 21%  पाऊस पडला आहे.

  • 04 Jul 2026 09:40 AM (IST)

    एफडीएची नाशिक विभागात मोठी धडक कारवाई, ७ नामांकित हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

    एफडीएने नाशिक विभागात मोठी धडक कारवाई केली. दोन दिवसांत 20 हॉटेल, आणि रेस्टॉरंट मधील खाद्य पदार्थांची तपासणी.  अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ७ नामांकित हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.   सुधारणा नोटीसचे पालन न करणाऱ्या आणखी रेस्टॉरंट वर देखील निलंबनाची कारवाई होणार .

    तपासणीत स्वयंपाकघरात अस्वच्छता, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्याचे आढळलं.  कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याचेही निदर्शनास आलं.

  • 04 Jul 2026 09:30 AM (IST)

    अंबरनाथच्या रॉयल पार्कच्या पार्किंगमध्ये भीषण आगीत अनेक वाहनं जळून खाक

    अंबरनाथच्या रॉयल पार्क गृहसंकुलाच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने अनेक दुचाकी-चारचाकी जळून खाक झाल्या. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. मात्रअग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझवली.  आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं.

  • 04 Jul 2026 09:21 AM (IST)

    जळगावच्या अमळनेर मध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पतीची पत्नीला बेदम मारहाण

    जळगावच्या अमळनेर मध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीला जबरदस्तीने दारू व गांजा पाजून वेश्या व्यवसाय करण्यासाठी पतीकडून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला.  याप्रकरणी पती व इतर दोन अशा तीन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

  • 04 Jul 2026 09:14 AM (IST)

    ठाण्यात मुसळधार पावसाचा थैमान, आज ठाणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

    ठाण्यात मुसळधार पावसाचा थैमान सुरू असून आज ठाणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.  गेल्या २४ तासात ७७.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

    गेल्या  4 दिवसांत ठाण्यात मुसळधार पावसामुळे ५० झाडं कोसळली,  तर ४९ झाडांच्या फांद्या कोसळण्याची घटना. यामध्ये जीविहानी झालेली नाही, पण काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झालं.

  • 04 Jul 2026 09:04 AM (IST)

    पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने

    सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा 10 ते 12 मिनिटे उशीराने सुरू आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

  • 04 Jul 2026 09:01 AM (IST)

    कल्याण- शीळ मार्गावरून नेवाळी तो परिसरात रस्त्यावरून गुडघाभर पाणी

    सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-बदलापूर रोडवरील शीळ रोड ते नेवाळी चौक परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याण वरून अंबरनाथ कडे जाणाऱ्या मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे.  रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे.

  • 04 Jul 2026 08:59 AM (IST)

    ठाण्यात पावसाला सुरुवात, रेड अलर्टमुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत 58 मि मी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. रेड अलर्टमुळे शाळा, महाविद्यालयांना  ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागातर्फे ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पावसाचा जोर चांगलाच वाढला असून त्याचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसून आला. मध्य रेल्वेवरील ट्रेन 10 ते 12 मिनिटे उशीराने धावत आहेत. प्रशासन अलर्ट मोडवर असून राज्यातील अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. दरम्यान सीएमओ कार्यालयाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सतर्क रहा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पुण्यातील सेनापती बापट रोडवरील मोठं झाड मध्यरात्री रस्त्यावरती पडलं. झाड पडून पार्किंग मध्ये असलेल्या चार चाकी वाहनाचे मोठं नुकसान झालं, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासह राज्यभरातील महत्वाच्या बातम्या, पावसाचे अपडेट्स, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Follow Us