AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Cabinet Reshuffle : भाजपंकडून कुठल्याही क्षणी..मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी

Modi Cabinet Reshuffle : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तासापेक्षा जास्तवेळ ही बैठक चालली होती. 2029 मधील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने आत्तापासून तयारी सुरु केली आहे.

Modi Cabinet Reshuffle :  भाजपंकडून कुठल्याही क्षणी..मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी
Team BJP
| Updated on: Jul 04, 2026 | 10:48 AM
Share

भाजपचे नव्याने झालेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपं नव्याने संघटनात्मक फेररचना करत आहे. दिल्लीमध्ये सतत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. त्यातून हे संकेत मिळाले आहेत. भाजप आपल्या नवीन राष्ट्रीय टीमची लवकरच घोषणा करेल. भाजप अंतर्गत ही जी संघटनात्मक फेररचना होणार आहे, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मंत्रिमंडळात फेरबदल, विस्तार होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपची संघटनात्मक नवीन टीम जाहीर झाल्यानंचर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी बैठक झाली. जवळपास तीन तासापेक्षा जास्तवेळ ही बैठक चालली होती. त्यातून भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली. भाजपची नवीन राष्ट्रीय टीम अंतिम करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर सखोल चर्चा झाली असं इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष संघटनेत कोणाकोणाला स्थान द्यायचं, ती नावं निश्चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. कुणल्याही क्षणी भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा होऊ शकते. आगामी राज्यातील विधानसभा निवडणुका आणि 2029 मधील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. नितीन नवीन यांनी संघटनात्मक रचना करताना सर्व राज्यांकडून शिफारसी मागवल्या होत्या. विविध संघटनात्मक पदांसाठी राज्य नेतृत्वाने संभाव्य नेत्यांची नावं सुचवली. त्यातून भाजपने राष्ट्रीय स्तरावरील पदांसाठी एक उमेदवारांची सर्वसमावेशक यादी तयार केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

भाजपंसाठी ही नवीन राष्ट्रीय टीम जास्त महत्वाची आहे. कारण 2029 लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याआधी पक्ष संघटना अधिक बळकट बनवणं तसच नवीन पदाधिकारी विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. नवीन नेतृत्व निवडताना प्रादेशिक,सामाजिक आणि राजकीय संतुलन राखण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. संघटनात्मक फेरबदल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल असं वरिष्ठ पक्ष नेत्यांना वाटतं. मागच्या काही आठवड्यात मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दलही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत असं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे