Maharashtra Live News : दिल्लीतील जंतरमंतर तापलं, महिला पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचे आरोप, प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग
Maharashtra Live News : दिल्लीतील जंतरमंतर तापलं असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी अधित तिव्र झाली आहे. तर आंदोलनाचं कव्हरेज करण्यासाठी आलेल्या महिला पत्रकारांनी वरिष्ठ IPS अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचे आरोप केले असून प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकांमुळे मोठ्या हलचाली सुरू आहेत. इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

LIVE NEWS & UPDATES
-
अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक…
अमरावतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी ? विद्यमान आमदार किरण सरनाईक शिवसेना कडून भरणार आज उमेदवारी अर्ज… महायुतीकडून अद्याप पर्यंत कोणाला टिकीट जाहीर नाही..भाजपचे शिक्षक आघाडीचे नेते तथा भाजपा आमदार राजेश वानखडे यांचे मेव्हणे शेखर भोयर सुद्धा भरणार अपक्ष आणि भाजप तर्फे उमेदवारी अर्ज….ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे सुद्धा दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार….
-
कल्याणमध्ये माथेफिरू कार चालकाचा थरार
‘तू मला कट मारतोस?’ म्हणत २५ वर्षांच्या दीपेशला कारखाली चिरडले; शहाड-मोहने रस्त्यावरील घटना ..दुचाकीस्वार गंभीर जखमी रुग्णालयात ICU मध्ये मृत्यूशी झुंज सुुरू पोलिसांनी मदत केली नाही, भावाला काही झालं तर पोलीस ठाण्यातच जीव देऊ,” पीडित कुटुंबाचा कठोर कारवाईची मागणी करत आत्मदहनाचा इशारा!; तर आरोपी अटकेत ४०हून अधिक CCTV तपासून आरोपी कार चालक ताब्यात घेत न्यायालय प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांचं स्पष्टीकरण.
-
-
पुण्याच्या भोर तालुक्यात पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारल्याने भात पीक संकटात
पावसाअभावी तालुक्याच्या काही भागातील भात खाचरातील जमिनीला पडल्या भेगा..पीक लागले सुकायला.. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी विद्युत मोटरीच्या साह्याने शेताला पाणी देत.. भात पीक कसबस जगवलं आहे.. मात्र डोंगरउतारावरील, माळरानावरील पाण्याचा स्रोत नसलेली भात खाचरे..पाणी अटल्याने कोरडी पडून त्यामध्ये भेगा पडल्यात.. ही भात शेती पुर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाण्याअभावी हे पीक आता वाया जाणारेय.. त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय..
-
नाशिक शहरात पारा पुन्हा 35 अंशावर
नाशिक शहरात पारा पुन्हा 35 अंशावर पोहोचला आहे. शहर व परिसरातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा उन्हाची तीव्रता वाढू लागली असून रविवारी कमाल तापमान थेट 35 अंशांवर पोहोचले आहे. रात्री बारा वाजेनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान 17.4 अंशापर्यंत खाली घसरले. मागील 48 तासात किमान तापमान तीन अंशांनी कमी झाला आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षाचालकांवर खाकीचा बडगा
कल्याण-डोंबिवलीत वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षाचालकांवर खाकीचा बडगा उगारला आहे. झटपट भाड्याच्या नादात रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावणाऱ्या चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. डोंबिवलीत नियम मोडणाऱ्या ४ रिक्षाचालकांवर रामनगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले. वर्षभरात ५०० हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे.
-
-
जालना शहराचा पाणी पुरवठा आजपासून तीन दिवस राहणार बंद
जालना शहराचा पाणी पुरवठा आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे, कारण जालना जायकवाडी या योजनेच तांत्रिक काम अंबड आणि पैठण येथे होणार आहे त्याच बरोबर नवीन जलवाहिनी जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्याने 7 तारखेपर्यंत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याच जालना शहर महानगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय, त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि काटकसरीने त्याचा वापर करावा असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय,दरम्यान तांत्रिक काम होऊन तीन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेलं..
-
कल्याणमध्ये मध्यरात्री फार्महाऊसवर पोलिसांची धाड; वाढदिवसाच्या पार्टीत सुरू होती हुक्का पार्टी
कल्याणमध्ये मध्यरात्री फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकली. वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असून तेथे हुक्का पार्टी करत असेलल्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. टिटवाळा मानिवलीतील मिहीका फार्महाऊसवर वाढदिवसाची पार्टी सुरू असताना पोलिसांची अचानक धाड पडली. पहाटे 3.15 वाजता पोलिसांची एन्ट्री होताच हुक्का पार्टीत एकच धावपळ उडाली. सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाचा हुक्का सेवन करणाऱ्या दोन इसमांवर पोलिसांनी थेट कारवाई केली. कल्याण तालुका पोलिस ठाण्यात COTPA कायद्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक 3630/2026; कलम 4 आणि 21 अंतर्गत कारवाई, पुढील पोलिस तपास सुरू आहे.
-
एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता
एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्ष चिन्ह सुनावणी आणि काही महत्वाच्या कामांसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत खासदार आणि वकिलांची भेट घेणार असल्याची माहीती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीत महायूतीतल्या मोठ्या नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
-
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; मध्यरात्री तीन घरे फोडली!
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी तीन घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये काही घरांतून रोख रक्कम, तर काही ठिकाणांहून इतर वस्तूंची चोरी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शिरूर तालुक्यात आता चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
पावसाने दडी मारल्याने नंदुरबारचा बळीराजा आर्थिक संकटात
पावसाने दडी मारल्याने नंदुरबारचा बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झालं आहे. पावसाअभावी सोयाबीनचे पीक अक्षरशः करपून गेले आहे. कापूस, मका, ज्वारीपाठोपाठ सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. पिकासाठी केलेला लाखोंचा खर्च डोळ्यासमोर वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून तातडीने पंचनामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-
उमरगा तालुक्यातील बोरी येथे पीक कंपनी प्रयोगाला आमदार प्रवीण स्वामी यांची उपस्थिती
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नारंगवाडी मंडळातील बोरी येथे करण्यात आलेल्या सोयाबीन कापणी प्रयोगात 10 बाय 5 मिटरच्या प्लॉटमध्ये अवघे ५१० ग्रॅम सोयाबीनचे उत्पन्न मिळाल्याने शेतीच्या नुकसानीची दाहकता समोर आली आहे. आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कापणी प्रयोगाची पाहणी केली. पावसाचा खंड आणि हवामानातील बदलांमुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने योग्य नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली आहे.
-
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी केवळ 2 लाख 27 हजार हेक्टर ऊस उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी केवळ 2 लाख 27 हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील तब्बल 32 हजार 948 हेक्टर क्षेत्र घटले आहे. त्यामुळे विविध कारखान्यांकडून उसाची पळवा पळवी होण्याची शक्यता आहे. त्यातच चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस वापरला जाणार असल्याने उसाचा तुटवडा आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे दुष्काळामुळे ऊस वाढ फुटल्याने उत्पादकतेतही घट होणार आहे.
-
पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामकडे रवाना
वसई:- पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत वसई वून रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम पर्यंत ‘वसुंधरा पायी दिंडी रवाना झाली आहे. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या दिंडीत शेकडो महिला, मुली, पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गंभीर जागतिक समस्येकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. केवळ जनजागृती न करता दिंडीच्या संपूर्ण व्यवस्थापनातून पर्यावरणपूरक आचरणाचा आदर्श निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे.
नवी दिल्लीतील जंतर मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव आणि राजकीय घडामोडी सुरू आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. तर यासाठी विद्यार्थी संघटनेसह राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी जंतर मंतरवर तीव्र आंदोलन पुकारले आहे. एवढंच नाही तर, आंदोलनाचं कव्हरेज करत असताना तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्काबुक्की आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकरणाचं गांभीर्य पाहता दिल्ली पोलिसांनी ‘क्राईम ब्रँच’कडे तपासाची जबाबदारी सोपावली आहे. याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत असून, विरोधकांनी दिल्ली पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, आंदोलनामुळे सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, राज्यातील 6 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल. तर 3 ऑक्टोबर म्हणजे उद्यापर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर उद्यापर्यंत कोणकोण अर्ज भरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..