Maharashtra News LIVE : नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत

Maharashtra News LIVE Updates : जळगावच्या पारोळा तालुक्यातील अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी या गावाच्या नावावर तब्बल 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या. तर पोहरादेवी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा दौरा रद्द होणार असल्याची माहिती आहे. क्रीड, राजकारण, मनरोंजन, देश-विदेशातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येतील.

Maharashtra News LIVE : नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे - संजय राऊत
| Edited By: | Updated on: Feb 14, 2026 | 11:11 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Feb 2026 11:20 AM (IST)

    राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल होणार..

    बुलढाणा : राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल होणार. 36 जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सह पदाधिकारी बदलणार आहेत.  काँग्रेसचा नगर पालिका, महानगर पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव समोर ठेवून संघटनेत बदल होणार. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

     

  • 14 Feb 2026 11:06 AM (IST)

    नाशिक मुंबई महामार्गावर चालत्या रेंजरोवर कारने मध्यरात्री घेतला पेट

    नाशिक मुंबई महामार्गावर चालत्या रेंजरोवर कारने मध्यरा त्री पेट घेतला.  वाशिमहून त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना  पेट घेतला.  कारमध्ये राजस्थान येथील खासदार लुंबा रामजी चौधरी हे  प्रवास करत होते. काहीतरी जाळण्याचा वास आल्याने चालकाने कार  रस्त्याच्या बाजूला लावली. कारमधून सर्व जण खाली उतरले आणि कारने पेट घेतला. महामार्ग पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझविली मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

  • 14 Feb 2026 10:53 AM (IST)

    भाजपा आमदाराच्या कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्तुल

    भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्तुल आढळलं आहे. हे पिस्टल काल रात्री कर्मचाऱ्यांनी बघितले होते. हा प्रकार त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय केणेकर यांच्या कानावर घातला होता. आता संजय किनेकर या पिस्टलची पाहणी करत आहेत.

     

  • 14 Feb 2026 10:31 AM (IST)

    टिपू सुलतान यांचा फोटो हटवला

    मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना व काही नगरसेवकांकडून तीव्र विरोध झाल्याने अखेर प्रशासनाने फोटो रात्रीच काढला. वाढता तणाव लक्षात घेता नगरसचिवांनी फोटो काढण्याचा निर्णय घेतला.

  • 14 Feb 2026 10:15 AM (IST)

    पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये महत्वाची बैठक

    सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यात चर्चा. पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये ही महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह पुढील वाटचाली संदर्भात चर्चा झाल्याची माहिती.

  • 14 Feb 2026 10:03 AM (IST)

    नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत

    नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होऊ शकत नाही. मंत्रालयातील ACB च्या कारवाईवरुन राऊत यांची मागणी.

     

  • 14 Feb 2026 09:52 AM (IST)

    राष्ट्रवादीतील घडामोडींशी भाजपचा संबंध असेल – संजय राऊत

    राष्ट्रवादीतील घडामोडींशी भाजपचा संबंध असेल.  शिवसेना आणि काँग्रेसचा याच्याशी संबंध नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आम्ही का बोलावं ? संजय राऊत यांचा सवाल

  • 14 Feb 2026 09:43 AM (IST)

    दादर पश्चिम स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू

    दादर पश्चिम स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे.  दादर स्टेशन परिसर हा पूर्णपणे फेरीवाल्यांनी गिळंकृत केला होता. रस्ता किंवा फूटपाथवरून चालणंही शक्य नव्हतं. मात्र आता फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे सर्वांनीच मोकळा श्वास घेतला आहे.

  • 14 Feb 2026 09:21 AM (IST)

    जालना – पेट्रोल टाकून इंजिनियरचे घर जाळण्याचा प्रयत्न

    जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरातील एका तरुण इंजिनियरच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

    ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून घर उध्वस्त करण्याच्या उद्देशाने समोरील भाग पेटवून देण्यात आलंं.  याप्रकरणीत व्यक्ती विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 14 Feb 2026 08:58 AM (IST)

    शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला मार्गावर निमोणे येथे कारचा अपघात, तिघांचा मृत्यू

    पुणे –  शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला मार्गावर निमोणे येथे कारचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वडील आणि मुलीचा समावेश आहे, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.  शिरूर न्हावरे चौफुला मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 14 Feb 2026 08:57 AM (IST)

    पुरंदर, पुणे – मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात वीर यात्रेचा समारोप

    पुरंदर, पुणे –  मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात वीर यात्रेचा समारोप पार पडला.  हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.  सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात आणि शिस्तबद्ध नियोजनात हा समारोप सोहळा यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

  • 14 Feb 2026 08:51 AM (IST)

    धाराशिव – अध्यक्षपदावरून भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष ?

    धाराशिव –  जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. तानाजी सावंत यांच्या शिवसेना गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्ष उमेदवाराला विरोध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सावंत गटाला बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप आमने-सामने असून, भाजपकडून राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तर शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड समोर आहेत.

  • 14 Feb 2026 08:49 AM (IST)

    पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज…

    पुणे –  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खोकल्याचा त्रास आणि इतर काही व्याधींमुळे, शरद पवार हे गेल्या 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याने, त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज सकाळी जनता दरबार भरणार आहे. सहयोग सोसायटीमध्ये सकाळी जनता दरबाराला सुरूवात होणार आहे.अजित पवार हे देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. पर्यटन विभाग व बंजारा विरासत संघ यांचा संयुक्त उपक्रम राज्यभरातून बंजारा बांधव याठिकाणी येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार ,मंत्री संजय राठोड सह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाशिवरात्रीला गर्दीचे कारण देत घृष्णेश्वराचे गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे गाभाऱ्यात प्रवेश करून घृष्णेश्वराचे दर्शन आणि स्पर्श करता येणार आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्य घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.