Maharashtra News LIVE : आगामी 5 राज्यांतील काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये उमदेवार देणार : रामदास आठवले

Meta Description: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. सध्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक इंधन संकट उद्भवले आहे.

Maharashtra News LIVE : आगामी 5 राज्यांतील काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये उमदेवार देणार : रामदास आठवले
breaking news
| Edited By: | Updated on: Mar 22, 2026 | 10:07 PM

राज्यात सध्या अशोक खरात याच्या भोंदूगिरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांमुळे खरात आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. याच प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतातही लवकरच इंधन संकट ओढवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या महागाईत भर पडण्याची दाट शक्यता आहे. यासह देश विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्षेत्रासह राज्यातील ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Mar 2026 08:04 PM (IST)

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबई लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबई लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी

    वसई हद्दीत ससुपाडा येथे सिमेंट काँक्रिटचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी

    वर्सोवा ब्रिज ते मालजीपाडापर्यंत ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

    शनिवार रविवारच्या सुट्टी निमित्त घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांची मोठी गैरसोय

  • 22 Mar 2026 07:46 PM (IST)

    जालन्यात गॅस टंचाई निर्माण झाल्याने लाकडांची मागणी वाढली

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जालन्या मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई जाणवत आहे.  मागच्या काही दिवसापासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने,  हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. परिणामी यामुळे लाकडाची देखील मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 22 Mar 2026 07:30 PM (IST)

    भोंदू कॅप्टन खरात एसआयटीकडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात

    भोंदू कॅप्टन अशोक खरात एसआयटीकडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात

    नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी एसआयटीकडून घेतला ताबा

    चौकशीसाठी खरातला नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटच्या कार्यालयात आणले

    अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ

  • 22 Mar 2026 07:15 PM (IST)

    ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन

    ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचं आज निधन झाले असून, त्यांनी जालना येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, ते 79 वर्षाचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते.

  • 22 Mar 2026 06:02 PM (IST)

    धाराशीवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन

    धाराशीव : धाराशिवच्या डोंगरेवाडी येथे टॉवर लाईनवरून शेतकरी आक्रमक झाले आहे. योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांना संताप अनावर झाला आहे. शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले आहे.

  • 22 Mar 2026 05:54 PM (IST)

    बीड : खालापुरी गावात बंदुक, धारदार शस्त्रांच्या मदतीने गावगुंडांची दहशत

    बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी गावात गेल्या तीन दिवसांपासून महिलांसह पुरूषांचे आमरण उपोषण सुरू आहे. गावगुंडांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी डोळ्याला काळी पट्टी बांधून आणि आरोपींचे हत्यारासोबतचे फोटो लावुन आमरण उपोषण केले जात आहे. गावगुंड बंदुक, धारदार शस्त्र बाळगून गावात दहशत निर्माण करतात, मारहाण करुन दबाव आणला जातो, खंडणी मागतात न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवतात, अशा प्रकारे दहशत माजवली जात असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

  • 22 Mar 2026 05:40 PM (IST)

    नांदेड : तापमानाचा पारा वाढला, मातीच्या माठाची वाढली मागणी

    मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानात वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाला थंड पाणी प्यावंस वाटतंय, त्यामुळे बाजारात मातीच्या माठाला मोठी मागणी वाढली आहे. माठातलं पाणी नैसर्गिक रित्या थंड शुद्ध आणि खनिजयुक्त असते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळेच नांदेडमध्ये माठांची मागणी वाढली आहे.

  • 22 Mar 2026 05:26 PM (IST)

    बुलढाणा – गारपीटीमुळे टरबूज पिकाचे नुकसान

    बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील पार्डा दराडे येथील शेतकरी विष्णू दराडे यांच्या टरबूज पिकाचे गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 20 दिवसांत टरबूज विक्रीसाठी तयार होणार होते, मात्र गारपीटीमुळे क्षणात लाखोंचे नुकसान झाले आहे.

  • 22 Mar 2026 05:10 PM (IST)

    मुंबई : सीएसएमटी समोरील खाऊ गल्लीतील प्रसिद्ध श्रीराम वडापाव बंद

    आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईतील सीएसएमटी समोरील प्रसिद्ध श्री राम वडापाव बंद आहे. या ठिकाणी 25 कामगार काम करत असतात मात्र सिलेंडरच्या तुटवडमुले दुकान बंद असल्याने सर्व कामगार गावी गेले आहेत. दुकानात फक्त पाण्याती विक्री केली जात आहे.

  • 22 Mar 2026 05:00 PM (IST)

    आगामी 5 राज्यांतील काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये उमदेवार देणार : रामदास आठवले

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष देश पातळीवर वाढवण्याची माझी भूमिका आहे. आम्ही आगामी 5 राज्यांतील काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये उमदेवार देणार आहोत, असं केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच आठवले यांनी आरपीआयला राज्यात जागा मिळत नाही, अशी खंतही व्यक्त केली.

    “महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला जागा मिळत नाहीत, आठवलेंनी असा सूर आवळला. तसेच रिपाईला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पक्षाला मिळावी, असंही आठवले म्हणाले.

  • 22 Mar 2026 04:50 PM (IST)

    देशात गॅस आणि पेट्रोलची कमतरता नाही : रामदास आठवले

    देशात गॅस आणि पेट्रोलची कमतरता नाही. तसेच युद्ध थांबावं अशी आमची इच्छा आहे. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

  • 22 Mar 2026 04:25 PM (IST)

    तुळजापूरात बैलगाडा शर्यतीचा थरार, स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

    धाराशिवच्या तुळजापूरात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. बैलगाडा शर्यतीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते विदर्भातील हिंगोली पर्यंत बैलगाडा मालक आणि स्पर्धक बैल जोडीसह दाखल झाले होते. शिवजन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षी शिवबा प्रतिष्ठानकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते.त्यानुसार या वर्षीही बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यंदा एकूण 120 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यंदाचं स्पर्धेचं हे 5वं वर्षे होतं.शर्यतीसाठी तुळजापूर आणि परिसरातील बैलगाडाप्रेमींनी गर्दी केली.

  • 22 Mar 2026 04:08 PM (IST)

    पुण्यातील खेडमधील पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत 4 घरांना भीषण आग

    पुण्यातील खेड तालुक्यातील पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत चार घरांना भीषण आग लागली आहे. आदिवासी समाजातील सोपान केदारी यांचे घर अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत दोन पडव्या आणि 4 घरांचं प्रचंडन नुकसान झालं आहे. तसेच 5 ते 6 शेळ्या, करड, तसेच गाईच्या वासरूचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

  • 22 Mar 2026 03:57 PM (IST)

    राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार

    राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी २० टक्के एलपीजी पुरवठा करण्याचे केंद्राचे निर्देश असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे.

  • 22 Mar 2026 03:45 PM (IST)

    कलियुग का एक ही नियम..; नवनीत राणा यांचा फेसबुकवर व्हिडीओ

    “किसीने बहुत अच्छा कहा है कलियुग का एक ही नियम, जितना अटूट विश्वास होगा उतना ही बडा विश्वासघात होगा.. तो कलियुग है थोडा संभाल के विश्वास करीये,” नवनीत राणा यांनी व्हिडिओ बनवत फेसबुकवर शेअर केला आहे. यापूर्वीही त्यांनी “संघर्ष करना मेरे लिये नई बात नही है. मै किसी भी मोड से नई शुरुवात कर सकती हूँ,” असा व्हिडिओ शेअर केला होता. नवनीत राणा यांचा रोख कुणाकडे? व्हिडिओचा अर्थ नेमका काय, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

  • 22 Mar 2026 03:30 PM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याच प्रकरणात नाशिक पोलिसांनी खरात याचा ताबा घेतला. एसआयटी चौकशी सुरू असताना आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने नाशिक पोलिसांनी एसआयटीकडे पत्रव्यवहार करत ताबा घेतला आहे. पोलिसांनी ताब्यात घेत खरातला नाशिक क्राइम ब्रांच कार्यालयात आणलं आहे.

  • 22 Mar 2026 03:15 PM (IST)

    जागतिक जल दिन निमित्ताने कृष्णा नदीचे पूजन करत साकडे

    जागतिक जल दिन निमित्ताने सांगली कृष्णा नदी पाणी पूजन पार पडले. कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण व त्यामुळे मृत्युमुखी पडणारे मासे याची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात यासाठी कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्यावतीने जलदिना निमित्ताने कृष्णा नदीला थेट साकडे घालण्यात आले. तसेच कृष्णा नदीला वारंवार येणारा महापूर नियंत्रित व्हावा,पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, कर्नाटकच्या अलमट्टी धरणाची उंची वाढी विरोधात सरकारला सुबुद्धी, यावी असे साकडे ही, या वेळीजलपूजन निमित्ताने घालण्यात आले.

  • 22 Mar 2026 03:05 PM (IST)

    भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी घेतला शंकर पटातील बैलजोडी पळवण्याचा आनंद

    जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातील अकोला देव या गावात गुढीपाडवा आणि रामनवमी निमित्त भव्य शंकर पटाच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाभरासह वेगवेगळ्या भागातून बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता, यावेळी सुरुवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी स्वतः शंकरपटातील बैल जोडी पळवण्याचा आनंद घेतलाय. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमिची उपस्थिती होती.

  • 22 Mar 2026 03:00 PM (IST)

    आज अशोक खरातच्या चौकशीचा चौथा दिवस

    SIT कडून कॅप्टन अशोक खरातची चौकशी सुरू झाली आहे. आज अशोक खरातच्या चौकशीचा चौथा दिवस आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः चौकशी करत आहेत. एसआयटी आज पुजारी व फार्म हाऊस मधील कर्मचारी यांची समोरासमोर बसून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल देखील सात तास त्याची चौकशी करण्यात आली होती.

     

  • 22 Mar 2026 02:50 PM (IST)

    डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबार

    डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबार सुरू आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, वाहतूक समस्यांसाठी जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. प्रभागातील समस्या घेऊन शिवसेनेसह भाजप व मनसेचे नगरसेवक देखील उपस्थित आहेत.

  • 22 Mar 2026 02:40 PM (IST)

    9 राहिवाशांची सुटका

    विरार पूर्व येथील शारदा हाईट्स या इमारतीच्या आठव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीतून 9 राहिवाशाना रेस्क्यु करून सुखरूप बाहेर काढण्यात वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. 8 व्या मजल्यावरील तीन दारांच्या पॅनल ला ही आग लागली होती. मुख्य दारावरच आग आणि धुराचे कल्लोळ झाल्याने रहिवासी घरातच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक प्रशांत राऊत यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून, घरात अडकलेल्या 9 जणांना सुखरूप रेशक्यु करून, आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

  • 22 Mar 2026 02:30 PM (IST)

    चिमुकलीच्या खून प्रकरणात 5 जणांना पोलिसानी घेतले ताब्यात

    यवतमाळ येथे जुन्या वादातून चिमुकलीची हत्या करण्यात आली. शिवाय तिच्या नाकातील सोन्याच्या दीड ग्रामच्या नथी साठी सुद्धा तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

  • 22 Mar 2026 02:20 PM (IST)

    अधिकारी खरातच्या संपर्कात-विनायक राऊत

    खरात त्यांना अटक करण्याच्या आदल्या दिवशी अधिकारी त्यांच्या घरी होते, या संदर्भात उत्तर देताना विनायक राऊत यांनी अधिकारीच खरात याच्या संपर्कात असल्याचा खुलासा केलाय. अनैतिक धंदे अनैतिक व्यवहाराचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही झालं नव्हतं. असेही राऊत म्हणाले.

  • 22 Mar 2026 02:10 PM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीची व्याप्ती वाढली

    भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीची व्याप्ती वाढली. SIT टीममधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवली.महिला लैंगिक अत्याचारप्रकरणी अशोक खरातच्या SIT चौकशीला वेग आला आहे. एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थानच्या संदर्भातील SIT चौकशी सुरू आहे. खरात विरोधातील चौकशी लवकर पूर्ण करण्याचा SIT चा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 22 Mar 2026 02:00 PM (IST)

    प्रेम विवाह केल्याच्या रागातून तरुणाची धिंड, पाच जणांना अटक

    भुसावळच्या खडका येथे प्रेम विवाह केल्याच्या रागातून एकाला मारण करत धिंड काढल्या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी प्रतिक्रिया दिली. प्रथम दर्शनी ही घटना प्रेम विवाह केल्याच्या रागातून घडलेली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली. त्या तरुणाने विवाह केल्यानंतर पोलिसात हजर झाला होता मुलीच्या नातेवाईकांनी त्या मुलाला मारल्याची तक्रार पोलिसात असून या संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर दोन जण यात फरार आहेत

  • 22 Mar 2026 01:55 PM (IST)

    पूर्ण तपास अंति खरातांची फाईल दुर्दैवी बंद केली जाईल-विनायक राऊत

    खरातांचे व्हिडिओ जेव्हा चर्चाला येतील त्यावेळी ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठा स्पोट असेल. खरात त्यांच्या सगळ्या धंद्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मंत्र्यांचा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांचे व्हिडीओ पूर्ण ओपन होतील की नाही हे सांगता येत नाही. यामध्ये राज्यातील हेवी वेटेड मंत्र्यांची नावे आणि केंद्रातील काही मोठी नावे येत आहेत. भोंदूगिरीच्या माध्यमातून मंत्र्यांनी महाराष्ट्राचं वातावरण गलिच्छ केल आहे असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

  • 22 Mar 2026 01:45 PM (IST)

    बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याचा मृत्यू

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील ‘बिट्टू’ नावाच्या बिबट्याचा दीर्घकालीन आजारामुळे २१ मार्च २०२६ रोजी मृत्यू झाला. सुमारे सहा वर्षांपूर्वी ठाणे वनविभागातील येऊर परिसरातून त्याला वाचवण्यात आले होते. त्यानंतर उद्यानात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याची काळजी घेतली जात होती.

  • 22 Mar 2026 01:30 PM (IST)

    यवतमाळमधील चिमुकलीच्या खून प्रकरणात 5 जणांना पोलिसानी घेतले ताब्यात

    यवतमाळमधील चिमुकलीच्या खून प्रकरणात 5 जणांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. यात धक्कादायक माहिती की जुन्या वादातून चीमुकलीची हत्या करण्यात आली शिवाय तिच्या नाकातील सोन्याच्या दीड ग्राम च्या नथी साठी सुद्धा तिची हत्या केली जाण्याची माहिती

  • 22 Mar 2026 01:15 PM (IST)

    विरारमधील इमारतीच्या आठव्या मजल्यावर भीषण आग

    विरार पूर्व येथील शारदा हाईट्स या इमारतीच्या आठव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली आहे. या आगीतून 9 राहिवाशाना रेशक्यु करून सुखरूप बाहेर काढण्यात वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

  • 22 Mar 2026 12:53 PM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणातील SIT चे चौकशी स्थळ बदलले

    भोंदू अशोक खरात प्रकरणातील SIT चे चौकशी स्थळ बदलले आहे. आज अज्ञातस्थळी खरात प्रकरणाची चौकशी केली जातेय.  तीन दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब येथे चौकशी सुरू होती.  चौकशीला स्वतः SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या.  अशोक खरातची काल तब्बल  चौकशी सात झाली होती. तर आज खरातच्या फार्म हाऊसवरील कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Mar 2026 12:45 PM (IST)

    भोंदू बाबा कॅप्टन खरातचे प्रकरण गाजत असतांना नांदेडात महाराजावर गुन्हा दाखल

    विधवा महिलेला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या महाराजावर नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नांदेड शहरातील एका मठातील 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराजावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका 46 वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप या महाराजावर पीडितेने केलाय. जुलै 2025 पासून एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवत तीन वेळा अत्याचार केल्याच पीडित महिलेने तक्रारीत म्हटलंय. या महाराजावर गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. भोंदू बाबा कॅप्टन खरातचे प्रकरण गाजत असतांना नांदेडात एका महाराजावर गुन्हा दाखल झाल्याने भाविक भक्तांमध्ये खळबळ माजलीय.

  • 22 Mar 2026 12:30 PM (IST)

    निफाड तालुक्यात 18 आणि 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस

    निफाड तालुक्यात 18 आणि 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण 22 गावातील 787 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  1760 शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक कांदा पाठोपाठ गहू आणि द्राक्ष पिकाला फटका बसला आहे.

  • 22 Mar 2026 12:20 PM (IST)

    जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड येथे वादळी वाऱ्यामुळे चार एकरावरील ज्वारी जमीनदोस्त…

    जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड येथे वादळी वाऱ्यामुळे चार एकरावरील ज्वारी जमीनदोस्त झाली आहे.  अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची चार एकर वरील ज्वारी पूर्णपणे आडवी पडली असून लाखांचे नुकसान झाले आहे.. जितेंद्र पाटील असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. तब्बल 100 क्विंटल ज्वारीचे उत्पन्न आले असते मात्र वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी शेतकरी हतबल झाला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे

  • 22 Mar 2026 12:05 PM (IST)

    खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी चौकशीसाठी हिमांशू पोलीस क्लब येथे दाखल…

    अशोक खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी चौकशीसाठी हिमांशू पोलीस क्लब येथे दाखल झाले आहेत.  अशोक खरातची आज पुन्हा करण्यात येणार SIT मार्फत चौकशी होणार आहे.  एसआयटी सोबतच आयकर विभागाचे अधिकारी देखील अशोक खरातची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 22 Mar 2026 11:50 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी चा फटका

    धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये रेशीम उद्योग शेतकऱ्यांना अवकाळी चा फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या भूम परंडा तालुक्यात पारंपारिक उत्पादन सोडून शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाला आहे मात्र जिल्ह्यात चार दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या उत्पादनालाही त्याचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या रेशीम उद्योगाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 22 Mar 2026 11:40 AM (IST)

    खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी चौकशीसाठी हिमांशू पोलीस क्लब येथे दाखल

    अशोक खरातची आज पुन्हा करण्यात येणार SIT मार्फत चौकशी… एसआयटी सोबतच आयकर विभागाचे अधिकारी देखील अशोक खरातची चौकशी करण्याची शक्यता…

  • 22 Mar 2026 11:30 AM (IST)

    ज्योती मेटे यांचे नाव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत

    रनाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील एक नाव जोरदार चर्चेत आले आहे. यावेळी ज्योती मेटे यांचे नाव चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे.

  • 22 Mar 2026 11:20 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

    धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये रेशीम उद्योग शेतकऱ्यांना अवकाळी चा फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या भूम परंडा तालुक्यात पारंपारिक उत्पादन सोडून शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाला आहे. मात्र जिल्ह्यात चार दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या उत्पादनालाही त्याचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या रेशीम उद्योगाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 22 Mar 2026 11:20 AM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगाव येथील फॉर्म हाऊसच्या कर्मचाऱ्यांची चाैकशी

    भोंदू बाबा अशोक खरातच्या मिरगाव येथील फॉर्म हाऊसच्या वॉचमन, साफसफाई कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी यांना चौकशीसाठी बोलावलं. नाशिक येथे चौकशीसाठी सकाळी 9 वाजता मिरगाव येथून बोलावल. वॉचमन बालाजी, कर्मचारी प्रमोद आणि मंदिर पुजारी यांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती

  • 22 Mar 2026 11:13 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये वन उद्यानाचे भूमिपूजन

    छत्रपती संभाजीनगरच्या देवाळाई परिसरात पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं.  कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, उपवनसंरक्षक सुवर्ण माने आदींची उपस्थिती होती. देवळाई परिसरात सात हेक्टरवर वन विभागाचे उद्यान  होणार आहे.

  • 22 Mar 2026 11:11 AM (IST)

    रुपाली चाकणकर यांची चाैकशी झाली पाहिजे- तृप्ती देसाई

    रुपाली चाकणकर यांची चाैकशी झाली पाहिजे, अशी मोठी मागणी तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आली आहे.

  • 22 Mar 2026 11:05 AM (IST)

    जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान

    जालना जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 1400 हेक्टरवर फटका बसला असून यामध्ये डाळिंब मोसंबी त्याचबरोबर आंबा या फळबागांनाही मोठा तडाखा बसलाय.आज सलग तिसऱ्या दिवशी ज्वारी सह इतर पिकं अजूनही जमीनदोस्त असल्याच दिसून आलंय.

  • 22 Mar 2026 10:55 AM (IST)

    भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा- राऊत

    भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा. मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय राज्यातली भोंदूगिरी थांबणार नाही. संजय राऊत यांची मागणी

  • 22 Mar 2026 10:45 AM (IST)

    भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर

    भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. नाशिकच्या पाथर्डीमधील घटना समोर, शिवाजी ढगेंची माहिती. भोंदूबाबानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीत- ढगे यांचा आरोप

     

  • 22 Mar 2026 10:35 AM (IST)

    1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता

    आखाती देशांतील युद्धाचा भारतीय विमान कंपन्यांवर परिणाम… 1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता…. प्रवाशांवर तात्काळ बोजा पडणार नाही आणि यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू… केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून स्पष्ट..

  • 22 Mar 2026 10:25 AM (IST)

    उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची बोलावली बैठक

    उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक बोलावली. दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती

  • 22 Mar 2026 10:15 AM (IST)

    इराण युद्धाचा अमेरिकेचा अंदाजित खर्च 27 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला

    इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा लष्करी खर्च आता 27 अब्ज डॉलर्सच्या पार गेला…. अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांच्या तैनातीमुळे खर्च दिवसाला 1 ते 2 अब्ज डॉलर्सने वाढला….

  • 22 Mar 2026 09:57 AM (IST)

    इराण-अमेरिका तणावाचा फटका; डांबराच्या किमती वाढल्या

    अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम डांबराच्या दरांवर झाला आहे. डांबराचे दर गगनाला भिडल्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) खड्डेमुक्ती निविदांना ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेवर दुसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ आली आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्तीची कामे रेंगाळण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढत्या दरांमुळे पालिका प्रशासन सध्या हतबल दिसत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या संकटातून मार्ग काढून पालिका पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 22 Mar 2026 09:47 AM (IST)

    विदर्भात अवकाळी पावसाचे सावट; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत आजही ढगाळ वातावरण

    विदर्भातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नागपूरसह अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिक होरपळून निघाले होते, मात्र गेल्या काही दिवसांतील ढगाळ हवामानामुळे तापमानात ४ ते ५ अंशांची घट झाली असून उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला आहे. नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही स्थिती तात्पुरती असून उद्यापासून तापमानात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कडाक्याच्या उन्हाच्या झळा विदर्भाला बसण्याची चिन्हे आहेत.

  • 22 Mar 2026 09:37 AM (IST)

    धाराशिवच्या कळंब शहरात दोन गटांत तुफान दगडफेक; रमाई चौक परिसरात तणाव

    धाराशिवच्या कळंब शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शनिवारी सायंकाळी रमाई चौक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार दगडफेकीमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा झालेल्या या राड्यात दोन्ही गटांतील किमान ५ ते ६ जण जखमी झाले आहे. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मागील केवळ एक महिन्यात कळंबमध्ये घडलेली ही चौथी मोठी हिंसक घटना आहे. या दगडफेकीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी शहरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे कळंब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. या राड्यानंतर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 22 Mar 2026 09:27 AM (IST)

    कॅप्टन खरात आणि ऑफिस बॉयची समोरासमोर चौकशी

    नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन खरात प्रकरणात विशेष तपास पथकाचे (SIT) पाश आता अधिक घट्ट होत आहेत. गेल्या तीन दिवसांत खरातची तब्बल २० तास चौकशी करण्यात आली असून, पोलिसांनी खरात आणि त्याचा ऑफिस बॉय नीरज यांची समोरासमोर बसवून उलटतपासणी केली. या चौकशीदरम्यान नीरजकडून सुमारे ४० महिलांचे संपर्क क्रमांक हस्तगत करण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, नीरजच्या माध्यमातून काही संशयास्पद ‘लँड एजंट’चे क्रमांकही पोलिसांच्या हाती लागले आहेत. आता खरातच्या ‘बड्या भक्तांची’ आणि राजकीय-प्रशासकीय कनेक्शन्सची माहिती मिळवण्यासाठी गृह विभागाची पूर्वपरवानगी घेऊन खरातचा सीडीआर तपासला जाणार आहे. भायखळ्यातील परब आणि पुण्यातील जासूद यांचीही लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार असून, खरातच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक धक्कादायक गुपिते उघड होण्याची चिन्हे आहेत.

  • 22 Mar 2026 09:17 AM (IST)

    भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; आणखी ३ पीडित महिलांकडून तक्रारी

    नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली आता एसआयटी (SIT) पथकाने पूर्णपणे बाहेर काढली आहे. सुरुवातीला दबून असलेल्या आणखी तीन पीडित महिलांनी पथकावर विश्वास ठेवत खरातविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तपासादरम्यान खरातच्या नावावर तब्बल ५२ मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात त्याने फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप आहे. यापैकी ११ मालमत्ता पूर्णपणे खरातच्या नावावर असून सिन्नर, गंगापूर आणि नाशिक शहरात त्याचा मोठा जमिनीचा पसारा आहे. विशेष म्हणजे, या जमिनींच्या व्यवहारातील संशयास्पद नोंदी आणि सामाईक सातबाऱ्यांवर काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावे असल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे. पोलिसांनी खरातचा जमीन एजंटही ताब्यात घेतला आहे. आता आयकर विभाग या बेनामी संपत्तीचा सखोल तपास करणार आहे.

  • 22 Mar 2026 09:10 AM (IST)

    नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एन्ट्री

    नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या गुन्ह्यात आयकर विभागाने (Income Tax) उडी घेतली आहे. विशेष तपास पथकाद्वारे (SIT) खरातच्या कृत्यांचा तपास सुरू असतानाच, आता त्याच्या अवाढव्य मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जाणार आहे. खरातने कमावलेल्या उत्पन्नाचे नेमके स्रोत काय? त्याने आयकर विवरणपत्रे (IT Returns) भरली होती का? आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांचे ‘लिंकिंग’ कोणाशी आहे, याची सखोल पडताळणी होणार आहे. विशेषतः ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्या, बँक खात्यांमधील हालचाली आणि रोख व्यवहारांची चौकशी आयकर विभागाच्या रडारवर आहे. यामध्ये खरातला आर्थिक मदत करणारे देणगीदार आणि त्याचे व्यावसायिक भागीदार यांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याने, खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.

  • 22 Mar 2026 09:03 AM (IST)

    नव्या ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न

    नागपूर शहरातील रस्ते आता मोकळा श्वास घेणार आहेत. शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्यावर स्थगिती आणली आहे. नागपुरात आधीच २३ हजार परवाने वितरित झाले असून, गरजेपेक्षा जास्त रिक्षा उपलब्ध असल्याने केवळ वाहतुकीचा खोळंबा होत नव्हता, तर रिक्षा चालकांच्या दैनंदिन कमाईवरही त्याचा मोठा परिणाम होत होता. मुक्त परवाना पद्धत बंद झाल्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, या निर्णयाला काही रिक्षा चालक संघटनांनी विरोध दर्शवला असून, आगामी काळात हे निर्बंध शहराच्या वाहतूक चित्रात काय बदल घडवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Follow Us