Maharashtra News LIVE : काँग्रेसने बारामती पोटनिवडणूकीतून माघार घेतली त्याचे स्वागत – सुप्रिया सुळे

Maharashtra News LIVE Updates : आज तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्याशिवाय अशोक खरातसह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोड राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : काँग्रेसने बारामती पोटनिवडणूकीतून माघार घेतली त्याचे स्वागत - सुप्रिया सुळे
Breaking news
| Edited By: | Updated on: Apr 12, 2026 | 8:40 PM

भारतातील तीन राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. केरळ, असम आणि पुडुचेरी. केरळमध्ये विधानसभेच्या 140, असममध्ये 126 आणि पुडुचेरीमध्ये 30 जागा आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल. पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात एमएनजीएल कंपनीच्या पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) लाईनची गळती होऊन झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Apr 2026 05:36 PM (IST)

    नाशिक अत्याचार प्रकरणात कंपनीचा एचआर ताब्यात

    नाशिक खाजगी कंपनी अत्याचार प्रकरणात अनेक दिवसांपासून फरार असलेल्या खाजगी कंपनीच्या एचआरला ताब्यात घेण्यात आले आहे. अश्विनी छाननी असे अटक केलेल्या HR चे नाव आहे. कंपनीच्या इतर सात ते आठ लोकांना देखील चौकशीसाठी बोलवल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे.

  • 09 Apr 2026 05:19 PM (IST)

    काँग्रेसने बारामती पोटनिवडणूकीतून माघार घेतली त्याचे स्वागत – सुप्रिया सुळे

    काँग्रेसने बारामती पोटनिवडणूकीतून माघार घेतली आहे. मी त्याचे स्वागत करते, पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या आहेत. उर्वरित उमेदवारांनीही माघार घेता आली असती. त्यांना भेटायला हवे होते, निवडणुकीत विक्रम होईल न होईल पण माझा भाऊ गेला आहे त्याचे मोठ दुःख आहे असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

  • 09 Apr 2026 04:54 PM (IST)

    अकोल्यात पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार, दोन दिवसांत 2300 लिटर इंधन जप्त

    अकोला जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या काळाबाजाराचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यात केवळ दोन दिवसांत तब्बल 2300 लिटर पेट्रोल आणि डिझेलचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. तर बार्शीटाकळी शहरातील एका टिनशेड गोदामातून सुमारे 800 लिटर अवैध डिझेल जप्त करण्यात आले. तर पातूर-मालेगाव रोडवरील एका गोदामातून 700 लिटर पेट्रोल आणि 850 लिटर डिझेल असा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

  • 09 Apr 2026 04:40 PM (IST)

    करमाळा : विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविल्याप्रकरणी 13 जणांना अटक

    करमाळा तालुक्यात पुनवर व चिखलठाण येथे विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 13 जणांना अटक केली आहे. यात पुनवर येथील 10 जणांचा आणि चिखलठाण येथील 3 जणांचा समावेश आहे.

  • 09 Apr 2026 04:27 PM (IST)

    कोल्हापूर : स्लॅब कोसळल्याने दोन कामगार जखमी

    कोल्हापुरात घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. महाराणा प्रताप चौकात ही घटना घडली आहे. कोल्हापूर मनाच्या अग्निशमन विभागाने अवघ्या पंधरा मिनिटात दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे. या घटनेत दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 09 Apr 2026 04:12 PM (IST)

    जालना : अवकाळी पावसामुळे गव्हाच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण

    जालन्यात अवकाळी पावसामुळे गव्हाच्या दरात घसरण झाली. जालन्यात मागील काही दिवसात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकाला झोडपले असून, यामध्ये गहू पिकाचे भिजल्याने नुकसान झालंय. शिवाय काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे आधीच आपला गहू काढून घेतला त्यामुळे दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.3 हजार रुपये क्विंटल वरून गव्हाचे दर थेट अडीच हजार ते 2700 रुपये क्विंटलवर आले आहेत.

  • 09 Apr 2026 03:53 PM (IST)

    कुलाबा कोर्टातून पळालेला आरोपी बोळींज पोलिसांच्या जाळ्यात

    मुंबईच्या कुलाबा न्यायालय परिसरातून पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढणाऱ्या आरोपीला अखेर विरार पश्चिम च्या बोळींज पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. हरीसर अँथोनी जोसेफ असे या आरोपीचे नाव आहे.

  • 09 Apr 2026 03:51 PM (IST)

    राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी सात उमेदवार  रिंगणात

    राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी सात उमेदवार  रिंगणात

    भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे निवडणूक रिंगणात

    वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक संतोष चोळके तर इतर चार अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात

    अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचाही समावेश

  • 09 Apr 2026 03:30 PM (IST)

    पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून धारदार शस्त्राने हत्या

    पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून धारदार शस्त्राने हत्या

    घटनेच्या संपूर्ण थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरा कैद

    छत्रपती संभाजीनगरच्या करमाड परिसरातील घटना

    आरोपी सत्यम गावंडे याच्याकडून पूजा गावंडे यांची धारदार शस्त्राने हत्या

  • 09 Apr 2026 03:15 PM (IST)

    बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांची माघार

    अजूनही 23 उमेदवार रिंगणात

    काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी देखील घेतला उमेदवारी अर्ज मागे

    .

     

  • 09 Apr 2026 02:50 PM (IST)

    पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

    पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ… नवी दिल्लीत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली… शपथविधीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची उपस्थिती…

  • 09 Apr 2026 02:35 PM (IST)

    बारामतीमधील अर्ज मागे घेणार, चेन्नीथलांची ‘tv9’ला माहिती

    बारामतीतून पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार… काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांची tv9 मराठीला
    माहिती….

  • 09 Apr 2026 02:25 PM (IST)

    बारामती, राहुरीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

    बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस… संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, आतापर्यंत एकूण 6 अपक्षांची माघार, रिंगणातील उमेदवारांची संख्या 47 वर

  • 09 Apr 2026 02:17 PM (IST)

    बारामती निवडणुकीतून काँग्रेसची माघार

    महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती विधानसभेच्या पोटणीवडणुकीचे उमेदवार आकाश मोरे यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला आणि निवडणुकीतून माघार घ्या अशी सुचना केली जात आहे. राष्ट्रवादी शिष्टमंडळ बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती मधील उमेदवार आकाश मोरे आणि इच्छुक असलेले इतर चार इच्छूक उमेदवार यांच्या सोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पक्ष जी भुमिका घेईल ती आम्हाला मान्य असेल अस त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी बारामतीमधून आकाश मोरे हे माघार घेतील असं म्हणाले.

  • 09 Apr 2026 02:15 PM (IST)

    हर्षवर्धन सपकाळांचा आकाश मोरेंसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

    हर्षवर्धन सपकाळांचा आकाश मोरेंसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद. निवडणुकीतून माघार घ्या, अशी सपकाळांची आकाश मोरेंना सूचना. काय निर्णय घ्यायचा अशी सपकाळांची मोरेंना विचारणा. पक्षाची भूमिका मान्य असेल, आकाश मोरेंची प्रतिक्रिया

  • 09 Apr 2026 02:00 PM (IST)

    महात्मा फुले आरोग्य योजनेतंर्गत अधिक रक्कम घेतल्यास कारवाई

    समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं हे समजून केलं तर बघता बघता इतिहास घडेल. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून एकाही रुग्णालय एक रुपया ही जास्त घ्यायचा नाही, घेतला तर तिथल्या तिथे कारवाई करण्याचे अधिकार DHO ला आहेत.वेगवेगळ्या आजारावर मात करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही गुरुकुल्ली आहे असे समजा, असे मत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडले.

  • 09 Apr 2026 01:50 PM (IST)

    १७ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

    बारामती विधानसभा पोटनिवडणूक दुपारी एक वाजेपर्यंत १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याची 3 वाजेपर्यंत मुदत आहे. ३६ उमेदवारी अर्ज अद्याप बाकी आहेत.

  • 09 Apr 2026 01:40 PM (IST)

    दिंडोशीत अनधिकृत बांधकामांचे तोडकाम

    दिंडोशी येथील हिंदू देवीच्या यात्रेवर हल्ला करणाऱ्या सोहेल शेख, शब्बू शेख यांच्या अनधिकृत बांधकामांचे तोडकाम सुरू आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 09 Apr 2026 01:30 PM (IST)

    धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी

    मुख्यमंत्र्यांच्या सभेत मुंडे समर्थकाची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी करण्यात आली. बीडच्या गहीनाथ गडाच्या 94 व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मागणी करण्यात आली. व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुरेश धस यांची उपस्थिती होती. देवा भाऊ, वारकरी, गहीनाथ गड, मुंडे समर्थक सर्वजण तुमच्या पाठीशी आहेत फक्त तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या समोर समर्थकाने केली.

  • 09 Apr 2026 01:25 PM (IST)

    बारामती, राहुरीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

    बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस… संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, आतापर्यंत एकूण 6 अपक्षांची माघार, रिंगणातील उमेदवारांची संख्या 47 वर

  • 09 Apr 2026 01:21 PM (IST)

    माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या यात्रेवर बच्चू कडू

    माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या यात्रेवर असलेल्या बच्चू कडू यांनी प्रवासाचा अनुभव शेअर केला. 40 टक्के प्रवास पूर्ण केला अजून 60 टक्के प्रवास बाकी असल्याचे ते म्हणाले. बच्चू कडू हे 3 एप्रिल रोजी भगवतगीता आणि संविधान घेऊन एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर निघाले आहेत. जशी स्पर्धा आकाश आणि पर्वताची आहे तशीच स्पर्धा बेईमानी आणि इमानदारीने जगणाऱ्या लोकांची आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती. बच्चू कडू सध्या जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या यात्रेवर आहेत.

  • 09 Apr 2026 01:11 PM (IST)

    LPG गॅस पुरवठा होत नसल्याने उद्योग क्षेत्राला फटका

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचा पुरवठा होत नसल्याने उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. एक्सीडी इंडिया लिमिटेड कंपनीच्या 450 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासाठी नोटीस पाठवली . एक्सीडी इंडिया लिमिटेड इंडिया कंपनीत चार चाकी वाहनांचे क्लच तयार होतात. दोन दिवसात गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर 450 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅस मिळवण्यासाठी आम्ही पेट्रोलियम मंत्रापर्यंत मेल केले आहेत पण गॅस मिळत नाहीत कंपनीच्या मॅनेजर भूमिका स्पष्ट केली. उद्योगासाठी सरकारने तात्काळ एलपीजी गॅसचा पुरवठा करावा मनसे कामगार सेनेचे डॉक्टर शिवाजी कान्हेरे यांनी मागणी केली.

  • 09 Apr 2026 01:00 PM (IST)

    ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घ्यावी. अजित दादांप्रती खरी भावना- दिलीप मोहिते पाटील

    पुणे जिल्ह्यातील राजकारणात सध्या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्वतःबाबत पसरत असलेल्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. आणि या सर्व बातम्या त्यांनी ठामपणे फेटाळून लावल्या आहेत. “मी भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली, पण ती पूर्णपणे खोटी आहे.” पुण्यातील एका कार्यक्रमासाठी गेलो असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केवळ भेट झाली, मात्र कोणतीही बंद दाराआड चर्चा झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर बारामती पोटनिवडणुकीत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घ्यावी. अजित दादांप्रती खरी भावना असे पाटील म्हणाले.

     

  • 09 Apr 2026 12:59 PM (IST)

    दिंडोशीत देवीच्या शोभायात्रेदरम्यान हाणामारी प्रकरणातील आरोपीच्या घरावर महापालिकेची कारवाई

    मुंबईतील दिंडोशी नागरी निवारा परिसरात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणातील शब्बू शेख आरोपीच्या घरावर महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. पालिकेची ही कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे. मुख्य आरोपीच्या घरातील बेकायदेशीर भागावर ही कारवाई केली जात आहे. कारवाईपूर्वी बीएमसीने आरोपी शब्बू शेखच्या घरी नोटीस लावली होती आणि त्यानंतर आज कारवाई सुरू करण्यात आली.

     

  • 09 Apr 2026 12:50 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दारात पुन्हा मोठी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दारात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 53 हजार 985 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर आले आहे. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात सीझ फायरची घोषणा झाल्याने काल सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठी घसरण झाली आहे.

  • 09 Apr 2026 12:37 PM (IST)

    भोंदू अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी

    भोंदू अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने अशोक खरातला विचारलं, “तुम्हाला काही सांगायचं आहे का?” त्यावर अशोक खरातने “नाही” म्हणत हात जोडले. तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात खराच्या सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

  • 09 Apr 2026 12:23 PM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी मागितली 7 दिवसांची पोलिस कोठडी

    नाशिक- भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे. “खरातने 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केले. सातव्या महिन्यात नजर लागते म्हणून विशिष्ट विधी करावा लागतो असं सांगितले. महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसंच बाजारातील चिंचोके पॉलिश करून लाखों रुपयांना विकले. हे विधी करत असताना बनावट साप, नाग, वाघाचे कातडे दाखवण्यात आले. हे त्याने कुठून आणले, त्याला यामध्ये कोण मदत करत होतं याचा तपास करायचा आहे,” असं अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं. तसंच आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली.

  • 09 Apr 2026 12:10 PM (IST)

    मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीकडून अर्ज दाखल

    बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीने अर्ज दाखल केला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मस्साजोगमध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. अत्यंत साधेपणाने भावनिक वातावरणात त्यांनी केजच्या तहसील कार्यालयात आपला उमेदवारी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.

  • 09 Apr 2026 11:58 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना तिसऱ्यांदा फोन

    बारामती पोटनिवडणूक बिनविरोधा व्हावी, काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ तिसऱ्यांदा  फोन केला आहे. त्य़ाआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

  • 09 Apr 2026 11:48 AM (IST)

    उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आमचा निर्णय झाला आहे – विजय वडेट्टीवार

    बारामती पोटनिलडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आमचा निर्णय झाला आहे. आमचा निर्णय आम्ही हायकमांडला कळवणार आहोत – विजय वडेट्टीवार

  • 09 Apr 2026 11:36 AM (IST)

    बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेण्याची शक्यता – सूत्र

    बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माघारीसंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाला निरोप दिल्याची चर्चा.

  • 09 Apr 2026 11:34 AM (IST)

    बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन – सू्त्र

    बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसने बारामतीमधून उमेदवार मागे घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांनी विनंती  हर्षवर्धन सपकाळ यांना केल्याची माहितीही  समोर येत आहे.

  • 09 Apr 2026 11:29 AM (IST)

    जळगाव – पारोळ्यात शासकीय गोदामात शासकीय भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना टोकनचे वाटप

    जळगावच्या पारोळ्यात शासकीय गोदामात शासकीय भरडधान्य खरेदीसाठी १ हजार ७५० शेतकऱ्यांना टोकनचे वाटप करण्यात आलं.  नोंदणीसाठी  चार दिवसांपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता.  प्रचंड गर्दी झाल्याने वादविवाद आणि किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या.

    मात्र शेतकऱ्यांनी रांगा लावल्यानंतर पोलिस बंदोबस्तात दोन स्वतंत्र ठिकाणांहून शेतकऱ्यांची नोंदणी करून टोकन वाटप करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाने 1 मे पासून प्रत्यक्ष खरेदीला परवानगी दिली असून 30जूनपर्यंत खरेदीची ही प्रक्रिया चालणार

  • 09 Apr 2026 11:17 AM (IST)

    बारामती पोटनिवडणुकीबाबात राष्ट्रवादीची सावध भूमिका

    बारामती पोटनिवडणुकीबाबात राष्ट्रवादीची सावध भूमिका, या निवडणुकीसंदर्भात कोणीही आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये. काँग्रेसचं मन दुखावेल असं कोणीही बोलू नये, असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारी 3 पर्यंत माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी अशा सूचनाही पक्षाच्या  वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

  • 09 Apr 2026 11:06 AM (IST)

    नशिक – भोंदू अशोक खरातची आज तिसऱ्या गुन्ह्यात महत्त्वाची सुनावणी

    नाशिक – भोंदू अशोक खरातची आज तिसऱ्या गुन्ह्यात महत्त्वाची सुनावणी आहे.  काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर SIT ने पुन्हा ताबा घेतला . आज  वैद्यकीय तपासणीनंतर व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करणार आहेत.

    गर्भवती महिलेवर अत्याचार प्रकरणी सुनावणी होणार असून पोलीस कोठडीसाठी SIT जोरदार युक्तिवाद करणार आहे.  पुढील तपासासाठी कोठडीची गरज असल्याचं कारण मांडण्यात येणार असून खरातला पुन्हा किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 09 Apr 2026 10:57 AM (IST)

    मुंबईच्या अक्सा चौपाटीवर जीवरक्षकांनी वाचवले चार मुलांचे प्राण

    मुंबईतील मालाड येथील आक्सा चौपाटीवर आज सकाळी एका मोठ्या दुर्घटनेची टाळता आली. सकाळी साडेसहा वाजता चार मुले चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. खेळ संपल्यानंतर ही मुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली, मात्र ओहोटीचा काळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती बुडू लागली. सकाळी ८:०५ च्या सुमारास ‘दृष्टी लाईफ सेविंग’च्या जीवरक्षकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी जवळच मासेमारी करणाऱ्या ‘साई राम’ बोटीवरील मच्छिमारांनीही आपले काम सोडून मदतीसाठी बोट पुढे आणली. जीवरक्षक आणि मासेमारी बोटीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे चारही मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नथुराम सूर्यवंशी, भावेश तांडेल, मन वैती, प्रीतम म्हात्रे आणि हार्दिक म्हात्रे या जीवरक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 09 Apr 2026 10:47 AM (IST)

    राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय पेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

    अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत १८ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक असून ५ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी दोन अपक्ष अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे, तर महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने पेच वाढला आहे. भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले रिंगणात असून, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा राहुरी दौरा असल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे.

  • 09 Apr 2026 10:37 AM (IST)

    बीडमधील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन, कारला भीषण अपघात

    बीड जिल्हयातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी भीषण कार अपघातात दुःखद निधन झाले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश गिड्डे हे एक तरुण आणि अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित होते, तसेच सामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या जवळीकीमुळे त्यांनी अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच महसूल विभागासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सध्या त्यांचा मृतदेह रेणापूर येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

  • 09 Apr 2026 10:27 AM (IST)

    १५ मार्चपासून ५ एप्रिलपर्यंत कुणीही संपर्क साधला नाही – हर्षवर्धन सपकाळ

    आमच्या अटीशर्थी चुकीच्या नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करु का देत नाहीत, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे लढाई, असं हिंसक वळण देण्यात आले आहे. १५ मार्चपासून ५ एप्रिलपर्यंत कुणीही संपर्क साधला नाही, सुनेत्रा पवारांनी फोन करुन अर्ज मागे घेण्याची विनंती केली, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • 09 Apr 2026 10:17 AM (IST)

    धुळ्यात मिरचीची आवक घटली, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे किलोमागे १५० रुपयांची वाढ

    धुळे बाजारपेठेत सध्या सुकविलेल्या मिरच्यांना मोठी मागणी असली, तरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात मिरचीची आवक घटल्याने दरात प्रति किलो १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत गावरानी, लाल मिरची, चपाटा, रसगुल्ला आणि काश्मिरी मिरचीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. गुणवत्ता आणि प्रकारानुसार मिरचीला २०० रुपयांपासून ते ५५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हक्काची आवक कमी झाल्याने मिरचीचे दर कडाडले असून, ऐन हंगामात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे.

  • 09 Apr 2026 10:07 AM (IST)

    दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला विलंब? कालावधी आणखी वाढणार

    दादर येथील इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला तांत्रिक कारणांमुळे विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारने २०२६ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता हा कालावधी वाढण्याची चिन्हे आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे या आठवड्यात एका शिष्टमंडळासह नोएडा येथे जाऊन पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. सुमारे ३५० फूट उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक असून, सध्या येथे पायाभूत सुविधा आणि परिसर विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सरकारने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली असली, तरी काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामाची गती मंदावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 09 Apr 2026 09:50 AM (IST)

    नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील फोटो समोर

    याच कंपनीतील एका तरुणाला संशयित आरोपी त्यांनी धर्मांतर करायला लावण्याचा आरोप. संशयित तैसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार. कंपनीतील हिंदू तरुणाला दुपारच्या वेळेस नमाज पठण करायला लावली जात असल्याचा आरोप. याशिवाय हिंदू तरुणाला बिप मटन खाऊ घातल्याचाही फिर्यादीत उल्लेख

  • 09 Apr 2026 09:40 AM (IST)

    सिल्लोड आगाराच्या वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या

    वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. सिल्लोड डेपो मॅनेजर तिघां विरोधात आत्महत्या प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कारवाईच्या मागणीसाठी सहकारी कर्मचारी आक्रमक

  • 09 Apr 2026 09:30 AM (IST)

    मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात १७ टक्क्यांची घट…

    मुंबई शहरासाठी दिलासादायक बातमी… मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात १७ टक्क्यांची घट. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी घटले असून, मागील ३ वर्षांतील ही सर्वात स्वच्छ हवा मानली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, धूळकण (PM2.5 आणि PM10) पातळीमध्ये घट झाल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे. यामागे बांधकामांवर नियंत्रण, रस्ते स्वच्छता मोहीम आणि औद्योगिक उत्सर्जनावर कडक कारवाई यांचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

  • 09 Apr 2026 09:20 AM (IST)

    धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्य नियोजन विभागाकडे धाव. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा शिवसेन ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश, अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला यापूर्वी वादामुळे मिळाली होती स्थगिती. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी पेक्षा जास्त निधीची मान्यता, समितीची मान्यता न घेताच निधीची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा कैलास पाटलांचा आरोप

  • 09 Apr 2026 09:05 AM (IST)

    युद्धविराम पुन्हा धोक्याच्या स्थितीत..

    अमेरिका आणि इराणकडून युद्धविराम जाहीर करण्यात आले. पण तीन अटींचे उल्लंघन झाल्याचे इराणने म्हटले. त्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा जग संकटात आले.

  • 09 Apr 2026 08:55 AM (IST)

    पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली – रोहित पवार

    पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये थोडी नाराजी. अजितदादांना न्याय द्या असा काँग्रेसने संदेश दिला. भेटी दरम्यान रोहित पवारांचा चेन्नीथलांसोबत संवाद. ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत.

  • 09 Apr 2026 08:52 AM (IST)

    रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट

    रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बंद दाराआड केली चर्चा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी चर्चा. काँग्रेसने आकाश मोरे यांनी दिलीय उमेदवारी.

  • 09 Apr 2026 08:44 AM (IST)

    मुंबई शहरासाठी दिलासादायक बातमी

    मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली. प्रदूषणात 17 टक्क्यांची घट. 2026 च्या पहिल्या तिमाहीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे 17 टक्क्यांनी घटले असून, मागील तीन वर्षातील ही सर्वात स्वच्छ हवा मानली जात आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, धूळकण (PM2.5 आणि PM10) पातळीमध्ये घट झाल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे.

  • 09 Apr 2026 08:27 AM (IST)

    धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्य नियोजन विभागाकडे धाव. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश. अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला यापूर्वी वादामुळे मिळाली होती स्थगिती. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी पेक्षा जास्त निधीची मान्यता, समितीची मान्यता न घेताच निधीची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा कैलास पाटलांचा आरोप.

  • 09 Apr 2026 08:08 AM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणी चौदावा गुन्हा दाखल

    भोंदू अशोक खरात प्रकरणी चौदावा गुन्हा दाखल. सिन्नर मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याचा अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल. माळी बंधूंकडून कवडीमोल भावात घेतली कोट्यवधी रुपयांची जमीन. तुम्ही जमीन विकली नाही तर 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी दिली धमकी. माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातने केली हडप. याच जमिनीवर नंतर त्याने उभारले ईशानेश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस.सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू.

  • 09 Apr 2026 08:05 AM (IST)

    आज तीन राज्यात विधानसभा निवडणुका, मतदानाला सुरुवात

    केरळ, असम आणि पुडुचेरी या तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल.

Follow Us