AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलेल्या या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा होत आहेत. या चर्चांवर अखेर तिने मौन सोडलं आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
Trisha Krishnan Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 11:12 AM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये छाप सोडलेली अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. थलपती विजयचं त्रिशासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या या चर्चा आहेत. एकीकडे थलपती विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे याचिकेत तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. ‘लिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगपासून त्रिशा आणि थलपती विजयच्या अफेअरच्या चर्चा होत्या. आता विजयच्या घटस्फोटामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. त्रिशाबद्दल सोशल मीडियावर दररोज नवनवीन चर्चा होत आहेत. या सर्व चर्चा आणि अफवांवर अखेर तिने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट लिहित चर्चा करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली त्रिशा?

त्रिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘असं दिसतंय की मी चित्रपटसृष्टी सोडली आहे, एका श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न केलं आहे आणि चार मुलांचा सांभाळ करतेय, जे कालच दोन वर्षांचे झाले आहेत. मी अजून काही सांगायला हवं का की, आजच्या कथांचा कोटा पूर्ण झाला आहे?’ या पोस्टद्वारे त्रिशाने तिच्या करिअरबद्दलच्या अफवांना अत्यंत विनोदी पद्धतीने उत्तर दिलं आहे. थलपती विजयशी लग्न करून ती चित्रपटांमध्ये काम करणं थांबवणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या. या पोस्टद्वारे त्रिशाने तिच्याबद्दलच्या अफवांना अखेर पूर्णविराम दिला आहे.

दुसरीकडे एका मुलाखतीत थलपती विजयनेही त्याच्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याभोवती असलेल्या अलिकडच्या समस्यांबद्दल काळजी करू नका. कारण त्यावर तुम्ही तुमचा वेळ घालवण्याइतक्या त्या समस्या महत्त्वाच्या नाहीत. मी स्वत: त्यांची काळजी घेईन. माझ्या समस्यांमुळे तुम्हाला दु:खी किंवा तणावग्रस्त होताना पाहून मला सर्वांत जास्त त्रास होतो”, असं विजय कोणाचंही नाव न घेता म्हणाला होता.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांनी एकत्र एका लग्नसोहळ्याचा हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला दोघं एकाच गाडीतून आले होते आणि जातानाही एकाच गाडीतून देले. इतकंच नव्हे तर यावेळी दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....