AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: कर नाही त्याला डर कशाला? संजय राऊतांचे भाजपला ओपन चॅलेंज, अजितदादांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात तो आरोप काय?

Sanjay Raut: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्याआड मोठी घाडमोड सुरू आहे. त्याचवेळी अजितदादांच्या विमान अपघातात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेससह आता संजय राऊत यांनीही दबाव वाढवला आहे. राऊतांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे.

Sanjay Raut: कर नाही त्याला डर कशाला? संजय राऊतांचे भाजपला ओपन चॅलेंज, अजितदादांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात तो आरोप काय?
संजय राऊत पत्रकार परिषदImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 11:19 AM
Share

Sanjay Raut on Baramati Byelection: अजितदादांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे मृत्यू झाला. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि व्ही. के. सिंग यांना अटकेची मागणी लावून धरली आहे. राज्यात गुन्हा नोंदवला नसला तरी कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर झालेला आहे. तर आता बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी काँग्रेसने अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी काँग्रेसची भूमिका योग्य ठरवत भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे.

कर नाही तर डर कशाला?

अजितदादांच्या विमान अपघातात महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करावा अशी रोहित पवार हे मागणी करत आहेत. तीच मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि उमेदवार आकाश मोरे करत आहेत ना. स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील सत्य खणून काढू. खोलपर्यंत जाऊन तपास करू. पण त्यासाठी अगोदर एफआयआर नोंदवावा लागेल. तुम्ही एफआयआर नोंदवायला तयार नाहीत. तुम्ही संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तयार नाहीत. ही मागणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांनी करायला हवी. ती मागणी रोहित पवार करत आहेत आणि आम्ही सर्व करत आहोत.

काँग्रेसच्या मागणीचा विचार झाला तर महाराष्ट्रावर उपकार होतील. म्हणजे जो काय संशय आहे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि अपघातासंदर्भात, कर नाही तर डर कशाला? तुम्हाला त्यामध्ये खरोखरच गुन्हा दाखल करायचा आहे ना, तुम्हाला भीती नसेल तर गुन्हा दाखल करा. तुम्ही का लांब पळत आहेत. विरोधकांवर खरे-खोटे धडाधड गुन्हे दाखल करत आहात. पण तुमचा एक जवळचा सहकारी, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणतायेत त्याप्रमाणे जीवाभावाचा मित्र आणि सहकारी गमावला असे म्हणतायेत ना. मग त्या जीवाभावाच्या सहकारी आणि मित्राच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

पार्थ पवार यांना दिल्या शुभेच्छा

पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेत आहेत. तरुण कार्यकर्ता संसदीय कार्यप्रणातील सहभागी होत असेल तर सुभेच्छा दिल्या पाहिजे. त्यांच्या घरात आदर्श आहे, शरद पवार, सुळे, अजित पवार ह्यांच्या मार्गावर चालले तर चांगले संसदपट्टू होतील. आपल्या आजोबांकडून त्यांनी धडे घ्यायला हवेत असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय