Bulli Bai | दिल्ली पोलिसांनी दखल घेतली नाही, महाराष्ट्र पोलीस Bulli Bai प्रकरणाच्या तळाशी जाणार- नवाब मलिक

लिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाही. मागील सहा महिन्यांपासून हे सुरु असून राज्य सरकार तसेच पोलीस याचा छडा लावणार आहेत, अशी माहिती दिली आहे. याआधी त्यांनी बुली बाई आणि सुली डील अशा प्लॅटफॉर्मवर अलपसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता.

Bulli Bai | दिल्ली पोलिसांनी दखल घेतली नाही, महाराष्ट्र पोलीस Bulli Bai प्रकरणाच्या तळाशी जाणार- नवाब मलिक
NAWAB MALIK
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 10:57 AM

मुंबई : बुली बाई या प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावणे तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारणातंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाहीत. मागील सहा महिन्यांपासून हे सुरु असून राज्य सरकार तसेच पोलीस याचा छडा लावणार आहेत, अशी माहिती दिली आहे. याआधी त्यांनी बुली बाई आणि सुली डील अशा प्लॅटफॉर्मवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता.

छडा लावल्याशिवाय पोलीस थांबणार नाहीत

“बुली बाई प्रकरणात तपास सुरू होता. हा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत याचा छडा लावल्याशिवाय पोलीस थांबणार नाहीत. अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जातेय. 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतली नाही. मात्र राज्य सरकार आणि पोलीस याचा छडा लावणार आहेत,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.

कोरोना भाजपला घाबरतो का ?

तसेच पुढे बोलताना त्यांनी कोरोनाचा वाढता प्रसार आणि भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या सभा यावर प्रश्न उपस्थित केला. “कोविड भाजपला घाबरते का असा प्रश्न उपस्थित होतोय. कोरोना त्यांना घाबरतो का हे भाजपने सांगितले पाहिजे. मोदींच्या सभेत गर्दी होते. अमित शहांच्या सभेत गर्दी होते. मग तिथे कोरोना भाजपला घाबरतो का ? हे त्यांनी स्पष्ट करावं,” असा टोला मलिक यांनी भाजपला लगावला.

सुल्ली डील प्रकरणात एकास अटक 

दरम्यान, मलिक यांनी सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच ज्या महिला समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर मत प्रदर्शित करतात त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये या अॅपवर केले जात आहेत, असंदेखील सांगितलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी बंगळुरु येथून एकास अटक केलं आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

इतर बातम्या :

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबई पालिका मेहरबान, प्रतीक्षा बंगल्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ, लोकायुक्तांनी फटकारलं

Uday Samant : कोरोना रुग्णांमध्ये वाढ, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? आज फैसला; उदय सामंत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना निर्बंध वाढले; लग्नासाठी आता 50 वऱ्हाडी, जाणून घ्या नवे नियम…

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.