कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट?
महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाची रिपरिप सुरू आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट आहे. जोरदार पावसामुळे अतिवृष्टीची शक्यता असल्याने काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज २ जुलै २०२५ कोकण आणि घाटमाथ्यासह पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसरत, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाट परिसर यांसारख्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठ यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मराठवाडा-विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटाकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तसेच उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जून महिन्यात ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते १ जुलै या कालावधीत ताम्हिणी येथे २,५१५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीमध्ये याच कालावधीत सुमारे १ हजार मिलीमीटर पाऊस पडला. तसेच लोणावळ्यात १,३५० मिलीमीटर आणि मुळशी १,३४६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्यात चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण
नंदुरबार जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळ-वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ८०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तर ७५१.६२ आर शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे सुमारे ८०० कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केले असून, लवकरच नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे.
