AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : वीज पडून मृत्यू, भिंती कोसळल्या, कुठे विद्यार्थी अडकले, पावसामुळे दाणादाण; कुठे काय घडलं?

मान्सूच्या पहिल्याच पावसात मुंबई, पुण्यासह इतर भागात दाणादाण उडाली. मोठी जीवित तसेच वित्तहानी झाली आहे.

Maharashtra Rain Update : वीज पडून मृत्यू, भिंती कोसळल्या, कुठे विद्यार्थी अडकले, पावसामुळे दाणादाण; कुठे काय घडलं?
maharashtra rain update
| Updated on: May 26, 2025 | 7:21 PM
Share

Maharashra Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील उर्वरित भागातही पाऊस बरसत आहे. मुंबईत तर मान्सूनच्या पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी इमारती कोसळण्याच्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मान्सूनच्या पहिल्याच पावसात काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. विशेष म्हणजे आगामी चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

विरारमध्ये महिलेचा मृत्यू

मान्सूनच्या पहिल्याच पावसात विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे स्लॅबचे प्लास्टर डोक्यावर पडल्याने 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. विरारच्या गोपचरपाडा परिसरातील पूजा अपारमेंट मधील रूम नंबर 335 मध्ये आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मी राजू सिंग असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून ती आपल्या दोन मुलांसह घरात झोपली असता ही दुर्घटना घडली. याघटनेत दोन्ही मुले सुदैवाने थोडक्यात बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर पोहचून मयत महिलेसह तिच्या मुलांना बाहेर काढले आहे. ज्या इमारतीत ही घटना घडली ती इमारत 30 वर्षे जुनी होती. त्यामुळे वसई विरारमधील जर्जर आणि अतिधोकायड इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मलबार हिलमध्ये संरक्षण भिंत कोसळली

दुसरीकडे मलबार हिल येथे संरक्षण भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांकडून या भागाची पाहणी करण्यात आली. त्यांनी तत्काळ सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. या इमारतीमधील रहिववाशांना प्रशासनाच्या मदतीने स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खचलेला भाग आहे त्याचा ढिगारा हटवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलिस प्रशासन यांना देण्यात आले आहेत. या मार्गाने अमित शहा आज रात्री येणार होते त्यांच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहे. या पहिल्या पावसाचा फटका सीएसएमटी रेल्वे स्थानकालाही बसला. येथे पावसामुळे एक झाड कोसळले आहे. हे झाड पार्किंगमध्ये होतं. वाऱ्यामुळे तसेच पावसामुळे हे झाड उन्मळून पडले आहे.

पांडवकडा धबधब्यात विद्यार्थी अडकले

नवी मुबंईत खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर धारावीतील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात खारघर अग्निशमन दलाला यश आलं आहे. येथे पाच जण अडकले होते, त्याचं रेस्क्यू करण्यात आलं आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी पांडवकडा येथे हे विद्यार्थी गेले होते.

उल्हास नदीत तीन गुराखी अडकले

ठाणे जिल्ह्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदीत तीन गुराखी अडकले होते. ही बातमी समजताच स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केली. कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ पावसामुळे उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली होती. त्यामुळेच येथे तीन गुराखी अडकून पडले होते. ही घटना समजसल्यानंतर केडीएमसी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. अशा वेळी दोन धाडसी स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता बेटावर अडकलेल्या तिघांची यशस्वी सुटका केली. स्थानिक नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक होत आहे

बदलापुरात तुफान पाऊसस

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये आज अवघ्या 4 तासात तब्बल 160 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्याची पालिकेची तयारी असल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय.

पुण्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू

जोदरार पावसामुळे पुण्यातही मोठे नुकसान झाले आहे. मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला ही घटना घडली. संतोष गुलाब खांडवे असे वीज पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. युवकाचा मोबाईल तसेच अंगावरील कपडे विजेमध्ये खाक झाली आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.