शिवसेना नेते ईडीच्या निशाण्यावर, भावना गवळींचा निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती.

शिवसेना नेते ईडीच्या निशाण्यावर, भावना गवळींचा निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक
ed office
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:01 PM

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला अटक करण्यात आल्याने खासदार गवळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

भावना गवळींचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

महाविकासआघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रकरणात भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विदर्भातील रस्तेबांधणीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे काही नेते अडथळे आणत असल्याचे म्हटले होते. यावरुन किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांना प्रत्युत्तर देताना भावना गवळी यांनी म्हटले होते की, किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. मात्र, त्यांनी माझ्यासमोर येऊन कोणता भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगावे. तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, असे भावना गवळी यांनी म्हटले होते.

तसेच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले होते. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून हे गैरसमज दूर करणार असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते.

इतर बातम्या:

Aurangabad | अब्दुल सत्तारांनी घेतली भाजप शहराध्यक्षांची भेट, सेना-भाजप युतीचे संकेत

गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा

Maharashtra Shivsena MP Bhavana Gawali  close aide Saeed Khan  arrested by ED live updates in Money Laundering case tweeted by ANI

 

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.