AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात ‘या’ 11 दिग्गज मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांनी आरोपानंतर नैतिकतेतून दिलाय राजीनामा

सरकार असेल किंवा विशेषत: अजित पवारांवर मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढलाय. त्यातच अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. तर इकडे मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी लॉबिंग सुरु केल्याची माहिती आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी देखील अनेक दिग्गज मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

महाराष्ट्रात 'या' 11 दिग्गज मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांनी आरोपानंतर नैतिकतेतून दिलाय राजीनामा
'या' मंत्र्यांनी आरोपानंतर नैतिकतेतून दिलाय राजीनामा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 09, 2025 | 6:34 PM
Share

राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर, मंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी लॉबिंग सुरु केलीय. मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेवून चर्चा केली. धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल पटेलांचीही भेट घेतलीय. तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंसोबत मुंडेंनी फोनवरुन चर्चा केली. विरोधकांसह स्वपक्षीय आणि मित्रपक्षांच्या आमदारांकडूनही मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा मागितलाय. सुप्रिया सुळेंनी राजीनामा मागितला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा मागितला. संदीप क्षीरसागरांनी राजीनामा मागितला. बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनीही मुंडेंचा राजीनामा मागितला. महायुतीचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धसांनीही राजीनामा मागितलाय.

2 दिवसांआधी मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवारांची 1 तास चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले. तिथं धनंजय मुंडेंवरुन नेमकं काय करावं, यावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. चौकशी अहवालानंतर पुढचा निर्णय घेवू असं दादा म्हणाल्याचं कळतंय.

या भेटीगाठी वाढल्या असतानाच आकाचे आका म्हणणाऱ्या सुरेश धसांनीही अजित पवारांची भेट घेतली. त्या भेटीवरुन जितेंद्र आव्हाडांनी धसांना अशा भेटी न करण्याचा सल्ला दिलाय. युद्ध सुरु असताना समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं नाही तर संशय येतो असं आव्हाड म्हणाले आहेत. तर, राजीनाम्याच्या मागणीवरुन सुरेश धसांनी यू टर्नही घेतलाय. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं म्हणणारे धस आपण असंच बोललोच नसल्याचं म्हणत आहेत.

इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी, बोचरी टीका केलीय. नैतिकतेनं मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता म्हणत जानकरांनी पुरुष वेश्या अशी टीका केली. नैतिकतेच्या आधारावर मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होतेय.या आधी 4-4 मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना आरोपांनंतर नैतिकतेतून राजीनामा द्यावा लागला होता.

‘या’ दिग्गज मंत्र्यांनी आरोपानंतर नैतिकतेतून राजीनामा दिला

  1. ए.आर. अंतुले यांनी कथित सिमेंट घोटाळ्यात राजीनामा दिला होता.
  2. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर मुलीच्या परीक्षेत 2 गुण वाढवल्याचा आरोप होता. त्यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला होता.
  3. मनोहर जोशी यांच्यावर जावयाच्या भूखंड प्रकरणात आरोप झाले होते. त्यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  4. विलासराव देशमुख यांना 26/11च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये दिग्दर्शक रामगोपाल वर्माला नेणं भोवलं होतं. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
  5. अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा प्रकरणात आरोपानंतर राजीनामा दिला.
  6. आर. आर. पाटलांनीही दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे देशो मे छोटे छोटे हादसे होते है, असं वक्तव्य केल्यानंतर राजीनामा दिला होता.
  7. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
  8. एकनाथ खडसे यांनी भूखंड घोटाळा प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता.
  9. अनिल देशमुख, गृहमंत्री असताना 100 कोटींच्या वुसलीचे आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
  10. संजय राठोड यांना एक तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता.
  11. छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर नैतिकतेतून राजीनामा दिला होता. तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट