Washim Corona Update : वाशिमला कोरोनाचा विळखा, पोहोरादेवीत 35 जण बाधित, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra Washim Corona Update)

Washim Corona Update : वाशिमला कोरोनाचा विळखा, पोहोरादेवीत 35 जण बाधित, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
coronavirus

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढत आहे. वाशिमच्या पोहोरादेवी येथे आज 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोहोरादेवी येथे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 35 झाली आहे. यात महंत कबिरदास यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra Washim Corona Update)

पोहरादेवीतील बाधितांची संख्या 35 वर

माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे दाखल झाले होते. यावेळी पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. राठोड समर्थकांच्या त्या गर्दीनंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. पोहोरादेवी येथे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 35 वर पोहोचली आहे.

कारंजा तालुका हॉटस्पॉट

वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात यापूर्वी लावलेल्या संचारबंदीत सात दिवसात 1150 कोरोनाबाधित आढळले आहे. या दरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दिवसात सर्वात जास्त रुग्ण कारंजा तालुक्यात आढळले आहेत. कारंजामध्ये 397 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण हे मालेगाव तालुक्यात आढळले आहेत. तर मालेगावात 57 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

वाशिममध्ये 8 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 8 मार्चपर्यंत जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. (Maharashtra Washim Corona Update)

तर शनिवारी रात्रीपासून ते सोमवारला सकाळपर्यंत 38 तासांची संचारबंदी लागू केली आहे. त्यातच पोहरादेवी इथं संजय राठोड शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्यावेळी तिथे अनेकांनी गर्दी केली होती. गेल्या 22 फेब्रुवारी पोहोरादेवीत आतापर्यंत  कबिरदास महंतसह 30 जण कोरोनाबाधीत आढळून आलेत. त्यामुळं पोहरादेवी इथं कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला. तर रिसोड तालुक्यातील देवगाव इथं निवासी आश्रमाशाळेत 4 शिक्षकांसह 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले.

तालुका – एकूण चाचण्या – रुग्ण

वाशिम – 1799 टेस्ट – 178 पॉझिटिव्ह

कारंजा – 1828 टेस्ट – 397 पॉझिटिव्ह

मंगरुळपिर – 1276 टेस्ट  – 117 पॉझिटिव्ह

रिसोड – 1247 टेस्ट – 300 पॉझिटिव्ह

मालेगाव – 841 टेस्ट – 57 पॉझिटिव्ह

मानोरा  -1235 टेस्ट – 101 पॉझिटिव्ह (Maharashtra Washim Corona Update)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Washim Corona Update: कोरोनाचा विळखा वाढला,पोहरादेवीमध्ये 21 तर वाशिमध्ये 187 नवे रुग्ण

Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अ‌ॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI