AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा पहिला कल हाती, अजित पवार गटाने नोंदवला पहिला विजय, कुठे कोणाचं पारडं जड?

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.

⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा पहिला कल हाती, अजित पवार गटाने नोंदवला पहिला विजय, कुठे कोणाचं पारडं जड?
Maharashtra Zilla Parishad Election Results
| Updated on: Feb 09, 2026 | 11:33 AM
Share

राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि १२५ पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार हे अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिंतीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार गटाचा पहिला विजय

सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या ठिकाणी भोसरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवून राज्याला पहिला निकाल दिला आहे. हा विजय अजित पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण माढा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा राणसंग्राम राहिला आहे. अश्विनी दळवी यांच्या विजयामुळे या भागातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पक्षनिहाय सविस्तर कल

पक्ष आघाडी/विजयी जागा सद्यस्थिती
भारतीय जनता पक्ष (BJP) ७० राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४३ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर पुण्यात जोरदार मुसंडी.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ३८ कोकण आणि मराठवाड्यात चांगली कामगिरी.
काँग्रेस (INC) २१ विदर्भ आणि लातूर भागात काही ठिकाणी आघाडी.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १४ कोकणात काही ठिकाणी संघर्ष, परभणीत आघाडी.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) ०३ सुरुवातीच्या कलात पिछाडीवर.
इतर/अपक्ष ११ स्थानिक आघाड्यांचा प्रभाव.

विभागीय कुठे कोणाला कल?

कोकण (सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी)

  • महायुतीने मतमोजणीपूर्वीच २७ जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. यात सिंधुदुर्गाती ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समितींचा समावेश होता.
  • रत्नागिरीत नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे गटाच्या डॉ. पद्मजा कांबळे विजयी झाल्या आहेत.
  • महाडमध्ये अनिल जाधव (शिंदे गट) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर)

  • पुणे: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमध्ये टपाली मतदानात अजित पवार गटाचे वर्चस्व आहे.
  • सांगली: भाजप १० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर आहे.
  • सातारा: पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या नेतृत्वात शिवसेनेने खाते उघडले असून मंगल माने विजयी झाल्या आहेत.

मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव)

  • लातूरमध्ये काँग्रेसने सुरुवातीला चांगली मुसंडी मारली आहे.
  • परभणीत पिंगळी गटात ठाकरे गट आघाडीवर आहे, तर जिंतूर-भोगाव गटात शरद पवार गटाचे कृष्णा देशमुख आघाडीवर आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल