
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीकडे जाताना विमान अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, पवार कुटुंबाला याची कोणतीही कल्पना नव्हती. यावर स्पष्टपणे बोलताना शरद पवार दिसले. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट आहे. रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्या तेराव्यानंतर यावर बोलणार असल्याचे म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर शंकाही उपस्थित केली जात आहे. सुनेत्रा पवार या लवकरच दिल्ली दाैऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली दाैऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत काही त्रुटी दाखवली. तसेच त्रुटींची पूर्तता करावी असे आदेश मंगळवारी देण्यात आले होते.
मात्र या निर्देशावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी हायकोर्टात विभागीय आयुक्तांविरोधात संध्याकाळी याचिका दाखल केली. आता या याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मात्र या याचिका आणि सुनावणीचा 10 फेब्रुवारीला होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर परिणाम होणार की नाही? याबाबत संभ्रम आहे.
अजित पवारांच्या अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ मधील माहिती रिक्व्हर करण्यास सुरुवात झाली आहे. ‘डेटा रिकव्हरी’ केल्यानंतर नागरी विमान महासंचलनालयकडून अहवाल जारी केला जाणार आहे. य अहवालातून अपघाताची माहिती समोर येणार आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. गॅस टँकर पलटी झाल्याने 25 तास वाहतूक ठप्प होती.
अखेर 25 तासांनंतर पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. महामार्गावर गेल्या 25 तासांपासून वाहतूक ठप्प झाली होती. आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने गेल्या २५ तासांपासून वाहतूक होती आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.
चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मनपा मुख्यालयातील राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडीसाठी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत विविध पक्षांकडून एकूण 36 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून 18 अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 10 अर्ज, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून 4 अर्ज तर अपक्षांकडून 4 अर्जांची उचल करण्यात आली आहे. नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7-8 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आहे.
सीआयएफ डेल्टा व्हाईटनाइट कॉर्प्स, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तपणे केलेल्या ऑपरेशन ट्राशी1 अंतर्गत किश्तवाड भागातील डिचर भागात एका दहशतवाद्याला ठार केले आहे. ही कारवाई सुरूच आहे.
पुणे-मुंबई हायवेवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने गेल्या २५ तासांपासून वाहतूक ठप्प आहे. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला तसेच लहान मुलांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने वाहतूक कोंडी लवकर सोडवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
सिन्नर विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव कोकाटे (आप्पा) यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिन्नर परिसरात शोककळा पसरली आहे. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत धक्कादायक विधान केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस भाजपासह सगळे पक्ष चालवत असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटात प्रचाराचे वातावरण तापले आहे. संपूर्ण गटातील मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार काजल सुभाष कदम आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अनिल दिनकर माने यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसह संवाद यात्रा काढली. या यात्रेला गावोगावी चांगली प्रतिसाद मिळाला.
जालन्यात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत तब्बल 20 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना 22 जानेवारी 2026 रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात जालना पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता, आता त्यापैकी दोन आरोपींना अटक केली आहे. सुमित डुरे आणि सचिन केदारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू आहेत.
अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फलक काढल्याने कर्जत शहरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. श्रद्धांजली फलक हटवल्याच्या निषेधार्थ कर्जत शहरात सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबई, दि. 4 : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे.
परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यत आहे.
नाशिक – शहरातला जन आक्रोश महामोर्चा समाप्त झाला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने मोर्चाचे समाप्ती झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वनविभागाच्या कर्मचारी महिलांनी घेतला आक्षेप घेतला होता.
शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची शक्यता
5 वाजता सुनेत्रा पवार यांची शरद पवार हे सहयोग सोसायटी येथे भेट घेणार असल्याची माहिती
आमदार रोहित पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी येथे दाखल
जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीची जय्यत तयारी
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १ हजार ८८४ होमगार्ड कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर, सातारा, तसेच सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड जळगावमध्ये करण्यात येणार तैनात
येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणार मतदान
पुणे -मुंबई हाय वे वर मोठी वाहतूक कोंडी
गेल्या 20 तासांपासून वाहतूक ठप्प
आडोशी बोगदा ते पुरंदवडीपर्यंत वाहतूक ठप्प
पुण्यावरून मुंबईला जाणारी लेन पूर्णपणे ठप्प
वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांचे हाल
जळगाव जिल्ह्यात १४ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी.
जमावबंदीच्या आदेशासाठी राजकीय पक्षांतराच्या कारणाची चर्चा.
अपर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांच्याकडून जमावबंदीचा आदेश
लग्न कार्य, धार्मिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम किंवा अंत्ययात्रा वगळता पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी अजित पवार गट राष्ट्रवादीचे गजानन मगदूम बिनविरोध झाले आहेत. सांगली महापालिकेत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यातच काँग्रेसकडून महापौर उपमहापौर पदासाठी कोणाचाही अर्ज न आल्याने सांगली महापालिकेत भाजप चे धीरज सूर्यवंशी महापौरपदी आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस चे गजानन मगदूम बिनविरोध झाले आहेत. आता 10 तारखेच्या विशेष महासभेत निवडीची औपचारिकता होणार आहे.
राज ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर डोंबिवलीत तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू होणार. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते आज सायंकाळी टपरीचे उद्घाटन होणार. उद्घाटनाआधी ज्या ठिकाणी कारवाई झाली होती त्या ठिकाणी सावंत शोरमा नावाने बनवलेली टपरी ठेवण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात दोन गटात तुफान राडा. एकमेकांना सिनेस्टाईल मारहाण. हातात काठ्या , लाकडी दांडके घेऊन एकमेकांना मारहाण
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील टँकर अपघातामध्ये गॅस गळती झाली गेल्या 17 ते 18 तासापासून दोन्हीही महामार्गावर पंचवीस ते तीस किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे…
अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यात संध्याकाळी 5 वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय… या शोकसभेला सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संस्था तसंच पुणेकर नागरिक उपस्थित राहणार आहेत… यावेळी अजित पवारांच्या अस्थींचा कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. प्रजासत्ताक दिनाला भाषणात महाजनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही. यावर वनविभागाच्या महिला कर्मचारी महिलांनी आक्षेप घेतला होता. याच प्रकरणी महाजनांविरोधात मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. फडणवीसांना विलीनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय? मला माहिती नाही असं शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
लातूर शहरा लगतच्या खोपेगाव इथ मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. वडील कृष्णकुमार संमुखराव हे आयकर विभागात विभागात अधिकारी होते, घरगुती वादातून मुलगा शंतनु याने वडिलांवर तीक्षण हत्यारांनी हल्ला केला. ज्यामधे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
लोकसभेत आमचा खासदाराचं निलंबन केलं पण ते जनतेच्या शेतकर्याच्या प्रश्नासाठी लढले. भंडाराच्या खासदारांचा आम्ही सत्कार करू ते नवीन खासदार होते त्यांनी फक्त कागद फिरकवली मी असतो तर काही वेगळाच केलं असतं.
आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आंदोलन करू असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. धुळे शहरातील सैनिक भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि रोजगार मिळवण्यासाठी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग नवतरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. पदवीधर दहावी-बारावी एग्रीकल्चर अशा विविध शिक्षण झालेल्या दिव्यांग तरुणांसाठी नोकरीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नाशिक पुणे मुंबई येथील नामांकित 30 कंपन्यांमध्ये नोकरीची संधी आहे. दिव्यांग बांधवांच्या सुमारे 1128 जागेंसाठी थेट मुलाखती होतील.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामध्ये धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेण्यात आले आहे. सध्याला ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे संबंधित कॉल रेकॉर्डिंग मध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलत असताना थेट मनोज जरांगे यांना मी गोळ्या घालून जिवे मारणार आहे.त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणायचे नाही नसता तुलाही जीवे मारतो अशी जरांगे समर्थकालाही जीवे मारण्याची धमकी करार समर्थकांनी दिली असून ही कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड प्रमाणात सोशल माध्यमांवरती फिरत आहे.या कॉल रेकॉर्डिंगची टीव्ही 9 पुष्टी करत नाही.
धानापासून भाजीपाल्याकडे वळत गोंदियात शेतीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. रावणवाडीच्या शेतकऱ्याला लाखोंचा नफा झाला. त्याने 8 एकरांत लवकीची शेती केली. त्यातून दररोज 6 टन उत्पादनातून हजारोंची कमाई होत आहे. सुशील तुलानी यांचा यशस्वी प्रयोग राबवला. पारंपरिक शेतीला नगदी पिके पर्याय ठरली. भाजीपाल्यामुळे गावातील महिलांना रोजगार, शेतकर्याचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात आले.
डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जप करत विशेष पूजा करण्यात आली. डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरात आमदार राजेश मोरे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजन केले. आठ भटजींच्या माध्यमातून महामृत्युंजय जप व होम-हवन करण्यात आले. यावेळी ५०० पेक्षा अधिक शिवसैनिकांची उपस्थिती होती. नेत्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशासाठी महादेवाच्या चरणी आमदार व कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.
नालासोपाऱ्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नायजेरियन व्यक्ती आणि अंमलीपदार्थ विक्रेत्या विरोधात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले आहे. आज सकाळी 7 ते 11 पर्यंत हे कोंबिंग ऑपरेशन राबवून, 109 नायजेरियन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरात हे कोंबिंग ऑपरेशन केले आहे. या परिसरात नायजेरियन व्यक्ती मोठ्याप्रमाणात राहत असून, अंमली पदार्थची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणात करतात.
सांगली महापालिकामध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सत्ता स्थापन होणार असल्याचा स्पष्ट झालाय, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे, तसेच महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची देखील चंद्रकांत पाटलांकडून घोषणा करण्यात आली आहे.भाजपाकडुन महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्यांचे उपस्थितीमध्ये नावांची घोषणा करण्यात आली आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक, ज्या पद्धतीने अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध झाली,त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे,असा आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी केले.
गोंदिया धान जिल्ह्यात भाजीपाल्याची क्रांती. रावणवाडीच्या शेतकऱ्याचा लाखोंचा नफा. 8 एकरांत लवकीची शेती. दररोज 6 टन उत्पादनातून हजारोंची कमाई. सुशील तुलानी यांचा यशस्वी प्रयोग. पारंपरिक शेतीला पर्याय ठरली नगदी पिके. जीपाल्यामुळे गावातील महिलांना रोजगार, शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण. धानापासून भाजीपाल्याकडे वळत गोंदियात शेतीचा नवा ट्रेंड.
बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवकाचा तिढा सुटला. भाजपचे प्रवीण राऊत यांना देण्यात आलं स्वीकृत नगरसेवकपद. तुषार आपटे यांच्या राजीनामामुळे रिक्त होतं स्वीकृत नगरसेवकपद.
इगतपुरी तालुक्यातील बोरली येथे तरुणीने उचलले टोकाचे पाऊल. 400 फूट दरीत उडी मारून केली आत्महत्या.
सकाळच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन टीम, ट्रेकर्स आणि इगतपुरी पोलिस घटनास्थळी झाले दाखल. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरीच्या कपारीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश. राणी गंगाराम पारधी असे मृत युवतीचे नाव.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट. इगतपुरी पोलिसांनी पुढील तपास केला सुरू.
मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून त्या सध्या प्रचार दौऱ्यावर असून, काल लातूर येथून रात्री परळीत आगमन झाले होते. परळी येथील त्यांच्या यशस्वी निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता. आज सकाळी त्या हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.
विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची बैठक. बारामतीमध्ये जय आणि पार्थ पवारांची शरद पवारांसोबत चर्चा. आज दादांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
भारत-अमेरिकेमधील ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना फायदा होणार. ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. अमेरिकेसोबतच्या डीलचा सर्व वर्गाला फायदा होईल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाली असून भाजपाकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत. महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत अजित पवारांसोबत निधनाच्या आधी चर्चा झाली होती.
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मजबूत करणार आहोत. 2019, 2022 मध्ये भाजप-एनसीपीचं सरकार व्हावं ही दादांची इच्छा होती. शरद पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचा विषयच नाही, अशी प्रतिक्रिया देताना तटकरेंनी दादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर कोसळले आहेत. कांद्याचे सरासरी दर एक हजार रुपयांच्या आत आहेत. आठशे रुपये दर पुकारल्याने छावा क्रांतिवीर सेना आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. येवला बाजार समितीसमोर त्यांना रास्ता रोको केला आहे. कांद्याला सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला पाहिजे, आजच्या दरातून उत्पन्न खर्च निघत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. विलीनीकरणाबाबत दादांनी चर्चा केली असती. दादांनी चर्चा केली असती तर मला मान्य असतं, असं म्हणत असताना सुनील तटकरेंकडून प्रफुल पटेलांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला.
भाजपसोबत चर्चा करणं स्वाभाविक आहे. विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात होणार, हा माझा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDA चा मित्रपक्ष आहे. नेमका कोणता पक्ष विलीन होणार होता, असा सवाल सुनील तटकरे यांनी केला आहे.
बारामतीत गेल्या तासाभरापासून शरद पवार, पार्थ आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान इथं ही बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक, पक्ष विलिनीकरण आणि विश्वस्त पदासाठी बैठक सुरू असण्याची शक्यता आहे.
टँकर पलटी झाल्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास वीस ते बावीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय.
विमान अपघातात अकाली निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी रात्री उशिरा नांदेड येथील गोदावरी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. शहरातील काळेश्वर तीर्थक्षेत्रावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा विधी पार पडला. तत्पूर्वी, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अजित पवार यांच्या दर्शनासाठी अस्थिकलश यात्रा काढण्यात आली होती, जिथे हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. या विसर्जन प्रसंगी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदावरीच्या तीरावर ‘अजित पवार अमर रहे’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अखेर ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाकडे असलेला महापालिकेचा कारभार आता लोकप्रतिनिधींच्या हाती येणार असल्याने पालिका मुख्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. या विशेष निवडीसाठी पालिकेतील ऐतिहासिक महापौर दालन पूर्णपणे सज्ज करण्यात आले आहे. दालनाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि फर्निचरची डागडुजी पूर्ण झाली आहे. नवनिर्वाचित महापौरांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून, राजकीय वर्तुळात आता ‘मुंबईचा प्रथम नागरिक’ कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार आज विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारले जाणार असून, त्या स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी ही महत्त्वाची भेट असल्याचे समजते. सध्या शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये स्मारकाच्या नियोजनाबाबत महत्त्वाची बैठक सुरू असून, आजच या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य एकाच ठिकाणी आल्याने बारामतीमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मावळ परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. या अपघाताला तब्बल १६ तास उलटून गेले तरीही वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. याचा परिणाम केवळ एक्सप्रेसवेवरच नाही, तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही दिसून येत असून दोन्ही मार्गांवर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस गळतीचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून अत्यंत सावधगिरीने काम सुरू असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, लोणावळा ते थेट तळेगावपर्यंत वाहनांची कोंडी पाहायला मिळत आहे.
मिरा-भाईंदर शहरात गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच नवघर पोलिसांनी एका हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘इन्स्टा फूड कॅफे’ परिसरात हे रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या एका महिला दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, या व्यवसायाच्या दलदलीत ओढल्या गेलेल्या ४ पीडित मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नवघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. चिंचखेडे, दडपिंप्री, बोरखेडा आणि करगांव परिसरात बिबट्याने आपला मुक्काम ठोकला असून, नुकताच तरवाडे व करगांव परिसरातील हिंगण्या नाल्याजवळील मक्याच्या शेतात बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भरदिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. या वाढत्या धोक्याची दखल घेत वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले असून गस्तही वाढवली आहे. इच्छापुर तांडा, चैतन्य तांडा, तरवाडे, खरजई आणि वडगांव लांब परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि एकटे शेतात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे. 5 फेब्रुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहर मनपा नगर सचिवांच्या कार्यालयातून 10 उमेदवारी अर्जांची उचल झाली आहे. सर्वाधिक 8 अर्ज भाजप गोटातून नेले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर 2 अर्ज काँग्रेस गटाकडून उचलले गेले आहेत. 5 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून अर्ज भरतेवेळी महापौर पदाचा उमेदवार आणि सूचक व अनुमोदक स्वतः उपस्थित राहण्याची अट आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तेचा तिढा गुंतत चालला असताना कोणते पक्ष, कोणते गट, महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांच्याशी डर्टी डील करताना मोदी कुणाशी बोलत होते? पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं… प्रफुल्ल पटेल मोदी – शाहांचे भक्त… पटेलांना पवार कुटुंबियांचं मुखिया केलंय का? असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही… सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा करायची नाही… विलीनीकरणावर अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा होती… विलीनीकरण चर्चेत फडणवीस नव्हते… त्यांनी बोलण्याचा अधिकार काय? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केले…
भाजपकडून शिवसेना उबाठाला सव्वा-सव्वा वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेना उबाठा महापौर पद मिळण्याबाबत आग्रही असल्यामुळे आता भाजपकडून शिवसेनेला नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे. दोन्ही पक्ष पहिल्या अडीच वर्षांसाठी सव्वा-सव्वा वर्ष विभागून घेणार महापौर पद मात्र आधी कोणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू असल्याची भाजपच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी माहिती दिली आहे.
नाशिक भाजपात मोठा ट्वीस्ट. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चिती वर सुनील केदार नाराज असल्याची माहिती. प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती
नोटीसनंतर कारण समाधानकारक न ठरल्यास वेतन कपातीची कारवाई होणार.निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाईची शक्यता. निवडणूक प्रक्रियेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा.प्रशिक्षण व निवडणूक दिवशी गैरहजर राहणाऱ्यांवर लक्ष. दोषी कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा होण्याची शक्यता.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट कारवाईचे अधिकार.
महापालिका आयुक्त यांचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश सुरक्षेची काळजी घ्या. महापालिकेने पाड काम करण्यासाठी नियमावली तयार केली आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश. जुन्या इमारती पाडताना योग्य त्या नियमाची अंमलबजावणी केली जात नाही सुरक्षेची अंमलबजावणी केली जात नसल्याने आदेश
मेट्रोतून प्रवास केलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी स्टेशन पासून लगेच सुविधा व्हावे यासाठी प्रयत्न. यापूर्व महामेट्रो कडून ई सायकल पीएमपीएल सोबत करार आधी उपाय केले मात्र ते सोयीचे ठरत नसल्याने निर्णय. शहरातील सर्वच रिक्षाचालक आणि महा मेट्रोची प्राथमिक बैठक याबाबत चर्चा करण्यात आली आहे. शहरातील सर्वच रिक्षा संघटना आणि महा मेट्रोमध्ये करार करण्याचे हालचाली सुरू
काल मंगळवार दिनांक 03.02.26 रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खंडाळा घाटामध्ये मुंबई कॉरिडॉर ( मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ) आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर पलटी झाला आहे.
:धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार असा दावा माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी केलाय.धाराशिव मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असुन भाजपा पाठोपाठ आता शिवसेना देखील अध्यक्ष पदासाठी आग्रही आहे. आम्ही फक्त अपेक्षा करत नाही तर कृतीतून दाखवतो त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल धनुष्यबाणाचाच असेल असा दावा तानाजी सावंत यांनी पारा येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेतुन केला आहे.त्यामुळे अध्यक्ष पदावरून भाजप शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.