AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजना बंद होणार का ? महायुतीच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असताना, एका महिन्यांत 5 लाख लाभार्थी कमी झाले आहेत. वय, वाहन आणि उत्पन्न या निकषांमुळे काही महिला अपात्र ठरल्या आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तथापि, योजना बंद होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केलं.

लाडकी बहीण योजना बंद होणार का ? महायुतीच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
| Updated on: Feb 07, 2025 | 10:05 AM
Share

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होऊन 7 महिने उलटून गेले असून आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र त्याची धास्ती अनेक महिलांच्या मानत असून अवघ्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 5 लाखांनी घट झाली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता महायुतीच्या एक नेत्याने यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झाली शिवसेना शिंदे गटाचे नेत, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं. या योजनेत काही नियम आहेत. ज्यांच वय 65 पेक्षा जास्त असेल, ती चालणार नाही , किंवा ज्यांच्याकडे चारचाकी असेल ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही. तसेच अनायवधानाने किंवा नजरचुकीने अशा महिला या योजनेत आल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत. जाणीवपूर्वी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही. ती आहे तशीच चालू राहणार आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

तसेच चारचाकीचा निकष, अडीच लाख इन्कम दाखवून कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याही महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतात, हे सर्व निकष आहेत. या सगळ्या नियमांत न बसल्यामुळे काही महिला कमी झाल्या असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाहीत, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घेणं ही काही लोकांची फॅशन – आव्हाडांना टोला

बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्या मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना दोषी ठरवलं होतं. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र आम्हाला हा खटला लढायचा नाही असे अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी सांगितल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. मात्र त्याच्या या मागणीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. ही केस मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची शंका आव्हाड यांनी व्यक्त केली. त्याबद्दलही सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला.

एखादी बाब न्यायालयात चालू असताना, त्यावर वकीलांकडून बाजू मांडण्यात येत असताना, त्याच्यावर बाहेर भाष्य अथवा ट्विट करणं योग्य नाही. न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचा, ही काही लोकांची फॅशन बनली आहे , मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाहीये, असं म्हणत सामत यांनी आव्हाडांना टोला लगावला.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.