महायुती अन् महाविकास आघाडीत बिघाडी! शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर,कोण कुठून उतरलं मैदानात?
महायुती आणि महाविकास आघाडीत निवडणुकीतील उमेदवारीवरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतही बंडखोरी पाहायला मिळत आहे. तर युती-आघाडीत उमेदवारीवरून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काही इच्छुकांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीदरम्यान अमरावतीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आलं आहे.
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत पाहायला मिळत आहे. पुण्यासह अमरावतीच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत आधीच काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संकेत दिले होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांची मुलगी आहे. तर एका वृत्तापत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांची सून आहे. आदिती पोहरे यांच्या उमेदवारीचं काँग्रेस नेत्यांनी स्वागत केलं आहे. अमरावतीत आदिती पोहरे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाने वेगळी भूमिका घेतली आहे.
काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर अमरावती मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. काँग्रेसनंतर ठाकरेंच्या सेनेकडून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत . अमरावती मतदारसंघात देखील ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अमरावती मतदारसंघातून दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी करण्यात आली आहे. तर संभाजीनगर मतदारसंघातून दत्तात्रय घुगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून बंड पुकारण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचा मित्र काँग्रेसने देखील अमरावती मतदारसंघात उमेदवार घोषित केला आहे. या अगोदर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांची उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे.
महायुतीतही उमेवारीवरून मतभेद
अमरावती शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार किरण सरनाईक शिवसेनेकडून आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. महायुतीकडून अद्याप कोणाला तिकीट जाहीर नाही. भाजपचे शिक्षक आघाडीचे नेते तथा भाजपा आमदार राजेश वानखडे यांचे मेव्हणे शेखर भोयर देखील अपक्ष आणि भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरणा आहेत. शिंदे शिवसेना- भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस-उबाठामध्ये देखील मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
