AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : रेखा अंबुरे प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या आरोपांवर मोठा खुलासा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तिथे ते म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण हाच फक्त माझा एक ध्यास आहे. गेले तीन वर्षे समाजाला माय बाप मानून काम करत आहे.मी गद्दारी केली नाही, जो करेल तो मराठा जातीचा नाही"

Manoj Jarange Patil : रेखा अंबुरे प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या आरोपांवर मोठा खुलासा
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 10, 2026 | 11:41 AM
Share

बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविक रेखा अंबुरे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावरुन सुरु असलेल्या वादावर बीड प्रशासनाने खुलासा केला आहे. बीडच्या निवासी उप जिल्हाधिकारी यांचा अहवाल समोर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात आरोप केले होते. हे आरोप तथ्यहीन असल्याच आढळून आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत, असं निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आलेल्या पत्रानंतर जिल्हा प्रशासनाकडून फक्त चौकशी करण्यात आली.

नमुना-33 संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलं आहे. इतर कोणतीही कागदपत्रं संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी कार्यालयाच्या स्तरावर प्रलंबित नसल्याचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये केलेले आरोप चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांचे अधिकृत पत्र प्रसिद्ध झालं आहे. रेखा अंबुरे या माजलगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग महिला गटातून निवडून आल्या होत्या. रेखा अंबुरे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने जरांगे पाटील यांनी आरोप केले होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आरोप

माजलगावच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा अंबुरे यांनी नगरसेविका पदाची निवडणूक जिंकली होती. विरोधी उमेदवाराच्या तक्रारीनंतर त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं होतं. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यामुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आरोप केले होते.

सरकारविरोधात आक्रमक भूमिका

मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तिथे ते म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण हाच फक्त माझा एक ध्यास आहे. गेले तीन वर्षे समाजाला माय बाप मानून काम करत आहे.मी गद्दारी केली नाही, जो करेल तो मराठा जातीचा नाही” मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सध्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उडवून दिली आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा