रायगडात रिक्षाचा मोठा अपघात, शाखाप्रमुखासह तिघांचा मृत्यू
रायगड येथे रिक्षाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह तीन जणांचा जागीत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

रायगडातील म्हसळा तालुक्यातील खामगावनजीक रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासहीत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणघरचे शाखा प्रमुख संतोष सावंत यांचाही मृत्यू झाला आहे. संतोष सावंत हे आपल रिक्षा घेऊन गोरेगाव दिशेकडे जात असताना म्हसळा गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान त्यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाला आणि त्यांचे वाहन रस्त्यांच्याकडेला आदळले.
म्हसळा तालुक्यातील खामगावनजीक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणघरचे शाखा प्रमुख संतोष सावंत हे रिक्षा चालवत असताना त्यांच्या रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने त्यांचे नियंत्रण सुटून ही रिक्षा रस्त्याच्याकडेला आदळली. गोरेगाव दिशेकडे जात असताना म्हसळा गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान त्यांच्या वाहन रस्त्याच्या कडेला आदळले.या अपघातामध्ये शाखाप्रमुख संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील प्रवासी शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
या अपघातात रिक्षा चालक असलेले संतोष सावंत हे शाखाप्रमुख होते. त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संतोष सावंत शाखा प्रमुख होते. या अपघातात रिक्षातील प्रवासी शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे हे गंभीररित्या जखमी झाले होते. यांना जखमी अवस्थेत माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.तिघांच्या मृत्यूने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
