एका मतदार संघात महायुतीच्या ‘दादां’ची दादागिरी, दुसऱ्या मतदार संघात उमेदवारच नसल्याने निवडणुकीपूर्वी हार
Malegaon Assembly Constituency: राज्यातील लक्षवेधी लढत घराणेशाही, नातेवाईकांमध्ये लढत, बलाढ्य उमेदवार यामुळे चर्चेत आहे. परंतु मालेगावच्या लढती त्या ठिकाणी सामाजिक परिस्थितीमुळे चर्चेत असतात. एकीकडे हिंदू मतदार तर दुसऱ्या मतदार संघात मुस्लीम मतदार आहे.

Malegaon Assembly Constituency: यंत्रमाग उद्योगाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालेगाव शहराचे नाव ऐकताच दंगल आणि बॉम्बस्फोट असे चित्र उभे राहते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे प्रमुख शहर आहे. यंत्रमाग उद्योगामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. हा उद्योग कसा वाढला? त्याची बिजे स्वातंत्र्यापूर्वी काळात आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटीश सरकारने उत्तर प्रदेशातील विणकरांवर अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे विणकरांना नवीन ठिकाणाचा शोध घ्यावा लागला. मग हजारो विणकरांनी मालेगाव शहरांमध्ये येऊन आपले बस्तान मांडले. त्यानंतर ते या ठिकाणचे झाले. त्यांनी या ठिकाणी यंत्रमाग उद्योग उभारले. दंगलीचा काळा इतिहास या शहरास आहे. यामुळे कोणत्याही निवडणुकीत मालेगावकडे विशेष लक्ष असते. संवेदनशील असलेल्या या शहरात मालेगाव मध्ये आणि मालेगाव बाह्य असे दोन मतदार संघ येतात. मालेगाव मध्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेचे वार्ड येतात. मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. तर मालेगाव बाह्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगाव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेचे वॉर्ड १ ते ७,...
