मोठी बातमी! धनंजय मुंडेंचं चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्वीकारलं, घेतला मोठा निर्णय, आता उद्याच…

धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिली, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला होता, त्यानंतर धनंय मुंडे यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, त्याला आता पुन्हा जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचं चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्वीकारलं, घेतला मोठा निर्णय, आता उद्याच...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2025 | 4:51 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असा आरोप होत आहे, या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे,  दरम्यान त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं, आता धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

हा साधा विषय नाही, चेष्टेत घ्यायचा विषय नाही.  परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली आहे.  राजकारण राजकारणच्या ठिकाणी, यामध्ये आठ दहा जण आहे, त्यांची चौकशी व्हायला नको का?  उद्या मीच कोर्टात अर्ज करणार आहे, नार्को टेस्ट करायला मी सर्वात आधी तयार आहे. नार्को टेस्टच्या मागणीसाठी सर्वात आधी माझा अर्ज  असणार आहे. तुम्ही सीबीया म्हणता, पण मी म्हणतो त्याच्या वरची देखील चौकशी झाली पाहिजे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  तू चुकीच्या ठिकाणी हात घातला आहेस, सीडीआर, सीबीआय आणि नार्को टेस्टसाठी मी तयार आहे. तुम्हीच घात-पात घडवून आणायचं ठरवलं होतं. तुमच्याकडे काहीही असू दे, तुम्ही कटापर्यंत आला तेव्हा मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं.  हे खरोखर वैरी झाले, डायरेक्ट सुपाऱ्याच द्यायला लागले आहेत.  मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे.  तुमच्यावरील संकट टाळण्यासाठी आता तुम्ही यामध्ये ओबीसीला देखील ओढणार का? अस सवालही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

इथे ना ओबीसी आरक्षणाचा विषय आहे, ना मराठा आरक्षणाचा, अजितदादांना देखील शॉक बसला असेल. फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे, शिंदे साहेबाला सुद्धा या प्रकरणात आता लक्ष घालावे लागणार आहे. मराठा समाजाला सांगतो,  मी सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही फक्त शांत रहा, मला तुम्हाला मोठं करू द्या, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.