AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 29 ऑगस्टनंतर…. म्हणाले, आता 7 कोटी मराठा…

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला 29 ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे.

मनोज जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 29 ऑगस्टनंतर.... म्हणाले, आता 7 कोटी मराठा...
| Updated on: Jun 16, 2025 | 4:03 PM
Share

मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गा लावावा अशी मागणी करत आहेत. मराठे आणि कुणबी एकच असून राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी ते करत आहेत. मात्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही, असं जरांगे यांनी म्हटलंय. तसेच जरांगे यांनी सरकारला यावेळी थेट अल्टिमेटम दिलंय. येत्या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा गुलाल घेऊन येतो. मी 29 ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मराठा आणि कुणबी एक आहे

मनोज जरांगे हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण तसेच त्यांची आगामी रणनीती याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 14 जून रोजीपासून फोन करणार आहे. आम्ही प्रत्येक आमदाराला अंतरवाली सराटीमध्ये बोलवणार आहोत. विधानपरिषदेच्या आमदारांनाही आम्ही बोलवणार आहोत. यात आजी-माजी आमदार, खासदारही असतील. मराठा आणि कुणबी एक आहे. त्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारीत करावा. सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या आम्ही त्यांना करणार आहोत.

मुंबईत आलो तर परत जाणार नाही

मी 29 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही शब्द बोलणार नाही. आजपासून तीन महिने मी कोणालाही काहीही बोलणार नाही. येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. आम्ही गुलाल घेऊन येतो. पण 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईत यायची वेळ येऊ देऊ नका. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी यावेळी मुंबई सोडणार नाही. माझ्या समाजाने वाशी येथून परत जाऊन तुम्हाला वेळ दिला होता. आता मात्र आम्ही वापस जाणार नाहीत. आमची अडवणूक करू नका, आमची फसवणूक करू नका. आमची मुलं फाशी घेत आहेत.

यावेळी दहापट मराठा…

सोपा विषय आहे. आमच्या नावावर सातबारा असेल तर शेत मोजून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. 29 ऑगस्टनंतर मी कोणलाही जवळ येऊ देणार नाही. यावेळी दहापट मराठा मुंबईत जातील. सर्व सात कोटी मराठा हे मुंबईत असतील, असा अशाराच मनोज जरांगे यांनी दिला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार