सर्वात मोठी बातमी! …तर मुंबईत येताच मनोज जरागेंना अटक? शुक्रवारी नेमकं काय घडणार?
मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांना हाय कोर्टानं आंदोलनासाठी आझाद मैदानाची परवानगी नाकारली आहे, त्यानंतर घडामोडींना वेग आला असून, मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, त्यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे होणार होतं, मात्र आता हाय कोर्टानं मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
आम्ही न्यायदेवतेचा आदर करतो , न्यायालय आम्हाला न्याय देईल, आमच्याही वकील बांधवांची टीम आहे, ते न्यायालयात जातील. आमचं लोकशाही मार्गानं आंदोलन होणार आहे. आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरीब लोकांच्या भवनांशी खेळू नये. शंभर टक्के न्यायालयाकडून आम्हाला परवानगी मिळणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयानं आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाकारल्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. ही भारतीय संविधानाची ताकद आहे. जरांगे पाटील यांना आझाद मैदानात नो नन्ट्री आहे. त्यांचं राजकीय आंदोलन सुरू आहे. कोर्टात सुनावणी सुरू असताना तुम्हाला आंदोलन करता येते नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणात हिंसकता दिसून येते. देशातील सर्वात मोठा सण आहे, आणि त्याची मनोज जरांगे पाटील यांना माहिती नव्हती का? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याचं सिद्ध झालं आहे, मी कालच सांगितलं होतं, जरांगे पाटील मुंबईत येणार नाहीत, मुंबईमध्ये कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. खासघर आणि नवी मुंबईमध्ये तरी जरांगे पाटील यांना परवानगी आहे का? जर आता जरांगे पाटील यांनी काही केलं तर थेट त्यांना जेलमध्ये जावं लागेल, असा दावा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे, त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
