मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली, आमदार सुरेश धस यांची ही विनंती केली मान्य

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे. नियमित त्यांच्या प्रकृतीची तपासणी वैद्यकीय पथकाकडून केली जात आहे. या वैद्यकीय पथकात जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप पाटील आहेत.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली, आमदार सुरेश धस यांची ही विनंती केली मान्य
मनोज जरांगे यांचे उपोषण पाचव्या दिवशी सुरु
Updated on: Jan 29, 2025 | 10:58 AM

Suresh Dhas and Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. २५ जानेवारीपासून त्यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी रात्री सलाईनद्वारे उपचार घेतले. अंतरवाली सराटीत उपोषण स्थळीच मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी सलाईन घ्यावी, अशी विनंती भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील केली होती.

मुख्यमंत्र्यांचा दिला संदेश

मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली होती. त्यामुळे डॉक्टरांकडून मध्यरात्री त्यांना सलाईन लावण्यात आली. त्यानंतर डॉक्टर आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी उपचारास होकार दिला. भाजपा आमदार सुरेश धस मंगळवारी अंतरवाली सराटीमध्ये आले होते. त्यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांनी मनोज जरांगे यांनी सलाईनद्वारे उपचार घ्यावे, अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी उपचार घ्याव, असा आग्रह केल्याचे आमदार धस यांनी सांगितले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे. नियमित त्यांच्या प्रकृतीची तपासणी वैद्यकीय पथकाकडून केली जात आहे. या वैद्यकीय पथकात जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप पाटील आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. ते दुपारी एक वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. विशेष म्हणजे कालच भाजपा आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजही आमदार सुरेश धस हे मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

पुण्यात आजपासून साखळी उपोषण

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवालीत उपोषण सुरु आहे. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने बेमुदत आमरण आणि साखळी उपोषण २९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी शासनाचा एकही प्रतिनिधी किंवा मंत्री भेट द्यायला आलेला नाही. त्यामुळे आता मराठा समाजाकडून पुणे शहरातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, धनंजय देशमुख यांनीही मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे. दादांना एकच विनंती आहे त्यांनी त्यावेळेस सलाईन घ्यावी, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीआम्हाला शब्द दिला आहे, त्यांना उचित वाटते ते करावे, असे त्यांनी म्हटले आहे.