AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला जाण्याचा फैसला कधी घेणार?, ‘या’ तारखेला होणार फैसला; मनोज जरांगेच्या निर्णयाने सरकारला टेन्शन

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याची तारीख ही या दिवशी ठरवणार असल्याचं म्हटले आहे.

मुंबईला जाण्याचा फैसला कधी घेणार?, 'या' तारखेला होणार फैसला; मनोज जरांगेच्या निर्णयाने सरकारला टेन्शन
| Updated on: Jul 13, 2024 | 8:59 PM
Share

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दरम्यान क्रांती चौक परिसरात दाखल झाली. याच क्रांती चौक परिसरात मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या संखेने जमलेल्या मराठा बाधवांसोबत संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला. मनोज जरांगे पाटील यांची पुढची दिशा काय असणार याकडे  सर्व मराठा बांधवांचं लक्ष लागलं होतं.

मी दिमागाने खेळतो – जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘मी थांबून निर्णय घेत असतो. मी सर्व दिमागाने खेळत असतो. प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नाही. बुद्धीचाही वापर करायचा असतो. फडणवीस, शिंदे, अजितदादा आणि महाजन यांनाही डावात हरवलं. सोपी गोष्ट नाही. भुजबळ आता काहीही बडबडताय. प्रत्येक वेळी सरकार फसलं. त्यांनी आपल्याला फसवण्याचं काम केलं. त्यांना मी जे वाटलो होतो, तसा मी नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे मला वेळ देत जा. एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही. समाज फसला तर मी स्वतला आयुष्यभर माफ करणार नाही. मला तुमच्या जीवावर काहीच कमवायचं नाही. मला तुमची पोरं मोठी झालेली पाहायचे आहे.’

20 तारखेला आमरण उपोषण

‘मी येडा आहे. पण आरक्षण दिलं ना मिळवून. भुजबळ पायावर चालत असेल मी डोक्यावर चालतो. पण माझ्यामुळे तुला औषधे सुरू केली ना फडणवीस साहेब शिंदे साहेब आरक्षण द्या. ही गर्दी फक्त संभाजीनगराची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल. सरकारला एकच संधी. २० तारखेला तारीखच जाहीर करणार आहे. २८८ उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. त्या दिवशी मराठ्यांनी अमूक अमूक मैदानावर यावं. २० तारखेला आमरण उपोषण सुरू करणार. पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचं या दोन तारखा ठरवायच्या आहेत. एकदा जे ठरलं त्यात बदल नाही.’

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.