AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाने राज्यातील मालवाहतूक ठप्प, व्यापार सापडला संकटात

मराठा आंदोलनाचा फटका राज्यातील अवजड माल वाहतूकीला बसला आहे. त्यामुळे कार्गो वाहतूकीला संरक्षण पुरवत आता त्यांच्या विशेष कॉरिडॉर मोकळा करावा अशी मागणी अवजड वाहतूक संघटनांनी केली आहे.

मराठा आंदोलनाने राज्यातील मालवाहतूक ठप्प, व्यापार सापडला संकटात
| Updated on: Sep 01, 2025 | 4:22 PM
Share

राज्यातील मराठा आंदोलनाने महाराष्ट्रातील मालवाहतूकीवर मोठा परिणाम होऊन मालवाहतूक ठप्प झाली आहे. दक्षिण मुंबईतून जाणारे मार्ग अटल सेतू, नवीमुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे अवजड वाहने आणि ओव्हर डायमेन्शनल कार्गोसाठी संपूर्णपणे बंद असल्याने मालवाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक संपूर्ण बंद पडलेली आहे. निर्यातदार, आयातदार आणि प्रोजेक्ट कार्गो ऑपरेटर्सना मोठ्या नुकसान झाले आहे. एक महत्वाचे उदाहरण म्हणजे जहाज जबल अली नाईनसाठी रवाना होणारी मोठी अवजड मशिनरी जिचे प्रस्थान उद्या सकाळी होणार होते. ही मशिनरी आज सायंकाळपर्यंत बंदरात पोहचणे गरजेचे होते. परंतू अवजड वाहनांना रोखण्यात आले आहे.जर ही मशिनरी लवकर पोहचली नाही तरी मोठा दंड आणि करार रद्द होऊन जागतिक बाजारात भारताच्या व्यापार धोरणावर परिणाम होणार आहे.

हे केवळ एकच उदाहरण नसून शेकडो ट्रक अडकलेले आहेत. निर्यात – आयात माल, ज्याची किंमत हजारो कोटी रुपयांचे आहे ते सर्व अडकून पडलेले आहेत. देशाच्या विविध प्रकल्प आणि विकास योजनांसाठी आवश्यक असलेले ही सामुग्री अडकून पडलेली आहे. रिकामे पडून असलेल्या कंटेनरवर डिटेंशन चार्ज, डेमरेज आणि मोठ्या प्रमाणावर दंड लावला जात आहे. अनेक वाहन विनाचालकांशिवाय ही वाहने उभी आहेत. ही स्थिती आर्थिक संकट, मानसिक ताण आणि अधिकाऱ्यांच्या मानसिक ताणाचे कारण बनली असल्याचेऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे.

या संदर्भात लवकर योग्य पावले उचलली नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का बसेल. कारण मालवाहतूकीचे खेपा रद्द होत असल्याने आणि व्यापारी करार रद्द होत असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे. आम्ही आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान करत आहोत, परंतू आवश्यक कार्गो आणि निर्यात- आयात माल वाहतूक ठप्प होणे कोणाच्याच भल्याचे नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

कार्गो वाहनांच्या वाहतूकीसाठी आवश्यक संरक्षण पुरवावे अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य परिवहन अधिकाऱ्यांना करत असल्याचे अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे. तसे एक आपातकालिन कॉरीडॉर मोकळा करुन अशा परिस्थितीत निर्धोकपणे वाहतूक सुरळीत राहील याची व्यवस्था करावी अशीही मागणी बल मलकीत सिंह यांनी केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.